"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे सगळ्यांनी असं का ठरवलंय की सगळे ओहोळ शेवटी किक नामक सागराला मिळणार आहेत असं?>>>>>

हिंदी चित्रपट व एकता कपूरचे संस्कार यांचा एकत्रित परिणाम...

पण किरणचा बॉस ज्या तर्हेने रागिणीचा काटा काढायची परवानगी देत नाहीये, त्यावरून संशय बळावतोय. माखिजाला रागिणी आवडलीय व तो रागिणीसमोर आपली गुड बॉय प्रतिमा उभी करतोय. बघू काय होते ते.

कदाचीत तो बॉस तिसराच कोणीतरी असेल आत्ता पर्यंत न दाखवलेला अन शेवटि रागिणीला कि क ची मदत होईल त्याच्या पर्यंत पोचायला.

आजचा भाग पण भारीच!!!

रागिणी सगळीकडे खडे टाकून बघतेय पण त्यामुळे तिला धोका वाढलाय किंवा ती Calulated risk घेतेय

रागिणीला मरणाची घाई झालीये (दोन्ही अर्थाने).
संदीप पाठक कुठे गेला? नवीन सुपारी किलरची एंट्री काहून?
वंदना गुप्ते आणि रागिणी असलेले सीन्स मस्त इमोशनल करतात.

आपली मराठी वाल्यानी फालतु मानबा अन अ‍ॅवार्ड अपलोड केल पण रुद्रम नाही, ...काय वैताग आहे ,आमच्याकडे ओझी दिसत नाही .... भ्याअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅ!

ओझीवर सुदधा अजून केले नाही अपलोड. मी फराळ करून दमले, म्हटले आता रुद्रॅम बघून झोपावे, तर फुसससस... नेहमी 10.15 ते 10.30 दरम्यान अपलोड करतात.

हो ना, अजून का नाही केला अपलोड. घरी मानबाचा रिपीट बघताहेत म्हणून म्हटलं ओझीवर बघावा तर अजून टाकलाच नाहीये.

मुग्धा गोडबोलेची एन्ट्री झाली.

कदाचीत तो बॉस तिसराच कोणीतरी असेल आत्ता पर्यंत न दाखवलेला अन शेवटि रागिणीला कि क ची मदत होईल त्याच्या पर्यंत पोचायला. >>> असं व्हायला हवंय. जर positive chara असेल कि क चं तर तो प्रत्येक वळणावर मदत करेल तिला.

दिसला दिसला! हुश्श, आज एपिसोड बघितल्यावर वाटल रा अग! अशी कशी ग तु बाई?किति ती घाई सगळ्याचीच , सगळिकडे पोहिचायचि पण आणी सगळ्याना सग्ळ सान्गायचीही!

बहुतेक ती खरं काय ते काढून घेण्यासाठी सगळ्यांना सगळं सांगत सुटली पण बिचाऱ्याला धोका निर्माण झाला ना ज्याच्याबद्दल सांगतेय त्याला आणि तिलाही.

हो काल मुग्धा गोडबोलेंची एंट्री झाली पण तिच्या मुलाकडे ते आबा खेळणं आहे असं दाखवलाय. त्या मुळे ती खेळणी कोणाकोणाला वाटून टाकली असं संस्थावाले म्हणताहेत त्यात ते तिच्या ( मुग्धा गोडबोले ) च्या दत्तक मुलाला मिळालं असेल असं वाटत . रागिणी अर्थात ते शोधून काढेलच . त्यातून रागिणी समन्वय चेतना मध्ये त्या मूर्ती बद्दल सगळ्यांना सगळं का सांगत बसलेय. तिला सगळ्यांच्या रिऍक्शन्स बघायच्या आहेत पण कशाला . ? एकदा का खेळणं मिळालं कि तुझं काम झालं ना ?

कालचा भाग भारी होता.
नर्सचा ट्विस्ट जबरी. ते इतके दिवस डोक्यातच आलं नव्हतं. रागिणीची त्यावरची रिअ‍ॅक्शनही भारी होती. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी रूपं बदलून गेल्यामुळे कुठे कोणत्या रूपात होतो याचा कधीकधी गोंधळ उडून पटकन काहीतरी चूक होऊ शकते हे काल अगदी ओघात आणि थोडक्यात सूचित केलं ते आवडलं.

(अजून काही जणांनी एपिसोड पाहिला नसेल त्यामुळे स्पष्ट उल्लेख टाळून लिहिलंय. Proud )

हो, नर्सची एन्ट्री दाखवलीय म्हणजे पुढे काहीतरी होणार. आईचे आजारपण त्यासाठी दाखवले बहुतेक.

तो खेळणेवाला मुलगा छायाचा होता का?

पुढच्या भागात जे संक्षिप्त पाहिले त्यात रागिणी माखिजाबरोबर हॉटेल मध्ये होती असे वाटले, तिच्याबरोबर जो कोणी होता त्याने कोट घातलेला. तो जर माखिजा असेल तर आज बॉस कोण याचा पर्दाफाश आपल्यासाठी होईल, जरी रागिणीला कळले नाही तरी.

लोकहो, मालिका शेवटाकडे पळतेय..
रावसर यात आहेत हे कळालं.
सदाला डायरीत काय लिहीलय हे ही कळेल.
नर्स कधी ना कधी रागिणीला ओळखेल.
रागिणीने सगळ्यांना राजेशबद्दल सांगून स्वतः ची अॉडर काढून घेतली.
असं काय असणार त्या फ्लॅश ड्राईव मध्ये? आशिष ने पण पाहिला नव्हता तो. त्यामुळे तो कसं काय डेटा टाकणार त्यात?
नवीन मारेकरी आणला कारण जुन्या मारेकर्याचा वर विश्वास नाहीये आता त्यांना..

असं काय असणार त्या फ्लॅश ड्राईव मध्ये? आशिष ने पण पाहिला नव्हता तो. त्यामुळे तो कसं काय डेटा टाकणार त्यात?>>>>

रागिणीला हे माहितेय पण समोरच्याला माहीत आहे की नाही, कितपत माहिती आहे हे ती जाणून घ्यायचा प्रयत्न करतेय. रिस्क आहेच पण ती घेतली तरच पुढचा मार्ग मिळेल.

मुलीच्या डायरीत कानडी अक्षरे आहेत, दि किंवा धी असे काहीतरी लिहिलेय, विवेकमधला व दिसला नाही. मागे 1 मुलगी विवेक हा शब्द उच्चारताना दाखवलेली.

मला पण नाही बघता आलाय कालचा भाग .. आमच्या रात्री १० पर्यंत नव्हता आलेला .. मी पण भ्याअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅअ‍ॅ... !
आता आज रात्री बघणार दोन्ही . पण इथे फोडला तरी मला चालणार आहे .. बाकीच्यांसाठी थांबणार असाल तरी ओके ..

माझा एक अंदाज -

1. राव सर त्या रात्री तिथे होते कारण त्यांना काहीतरी कुणकुण लागलेली. त्यांचा तेव्हाचा वावर थोडा संशयास्पद वाटतो, काहीतरी शोधत असल्यासारखे, कुणी येतंय का बघितल्यासारखे. ते दारात गेटवर उभे दाखवलेत. आग नुकतीच लागलेली, पसरली नव्हती त्यामुळे ती लागलीय याचा अंदाज त्यांना बाहेरून आला नसेल. एकूण ह्या प्रकरणात त्यांचा सहभाग नसेल पण संस्थेत काहीतरी घडतेय याचा अंदाज असेल.

2. विवेक मुद्दाम आडमुठ्या दाखवलाय, आपल्याला त्याचाच संशय यावा म्हणून. रागिणी जे करतेय त्याच्या जास्त खोलात जाताना तो दाखवला नाही. कर काय हवे ते, सांगायचे तर सांग असा त्याचा पवित्रा असतो. तो रागिणीला फारसे सिरियसली घेत नाही.

3. मानसी - बहुतेक ही किरणशी संपर्क ठेऊन आहे. रागिणी जे बोलते ते सगळे ऐकून घेते, त्यावर ही विचार करते आणि नंतर अचानक घाईत असल्याचे दाखवून तिथून सटकते.

हे माझे अंदाज. बघूया काय होतेय ते.

विवेक नाही घाबरला म्हणजे त्याचा सहभाग नसावा. ती त्याची एक्स gf घाबरली आणि राव सर. विवेकचा स्वभावच समोरच्याच्या डोक्यात जाईल असा आहे, तुसडा, फटकळ आहे पण जे आहे ते त्याचं संपूर्ण रूप असावं. दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे नसावेत बहुतेक त्याचे.

हो ना. मूर्ती बद्द्ल का सांगितले तिने? आता त्याच्या जीवाला धोका आहे. पण त्याला ईतकं काय माहित आहे ज्या करता त्याला किरण भाऊ शोधतोय..!

त्याला काही माहीत नाहीय. पण हे किरण भाऊला माहीत नसावे.

जर किरणभाऊ आपण आशिषला धमकवताना हा होता या थेअरिवर त्याला शोधत असेल तर ठीक आहे. पण आपल्या सिस्टिमचा बॅकअप कोणी तरी घेतलाय हे विवेकला कळल्यावर ते किरणच्या कानी गेले, मूर्ती ऑफिसात झोपायचा हेही त्याच्या कानी गेले तर तो दोन्ही बिंदू जोडून मूर्तीने बॅकअप घेतला हा निष्कर्ष काढून त्याच्या मागे लागू शकतो. अपघाताच्या रात्री लॅपटॉपची चोरी झाली त्या मागचा उद्देश चोरलेला डेटा व त्यावरच्या आशिष्च्या टीपा मिळवणे हाच असू शकतो.

बॅकअप घेतला गेला हे विवेक उघड बोलतो तेव्हा तिथे मानसी व राव दोघेही होते. मूर्ती ऑफिसात झोपतो हे या तिघांपैकी कोणालाही माहीत असू शकते.

नर्सचे दिसणे एकदम अनपेक्षित.... मस्त कलाटणी.
अन्जु हो, विवेकच्या वागण्यावरून तो नुसताच टोमणेदार असावा असेच वाटते.
मुग्धा गोडबोले कोणी महत्वाची कलाकार आहे का? कधी पाहिले नाही.

मुग्धा गोडबोले कोणी महत्वाची कलाकार आहे का? >>> हो फेमस आहे, असते बऱ्याच सिरीयलमध्ये. लेखिका मंगला गोडबोले यांची मुलगी. सध्या ती झी वरची नवीन सिरीयल पण लिहितेय बहुतेक, ब्रेकअप वाली.

पुढील भागात काय दाखवणार आहेत हे लिहा ना इथे कुणी तरी.. ओझी वर दिसत नाही.
आजच्या भागावरुन असं वाटतं की माखिजा सुत्रधार नाही.. तो कदाचित प्रपोज करणार रागिणीला..

हा प्रतिसाद नंबर १५००
कदाचित संदिप पाठक ची एंट्री होईल आज रा ला वाचवायला. काल दाखवला त्याला

Pages