Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालचा भाग छानच. मी मागे
कालचा भाग छानच. मी मागे म्हटलं तसं.. राजेश कडूनच कळालं आबाबद्दल.विवेक आणि रावसर आहेत यात नक्की..
राव सर खोटं बोलले रागिणीला.. राजेश ला जास्त पगाराची नोकरी मिळाली म्हणून तो गेला. वास्तविक तो किरणभाऊ पासून वाचण्यासाठी पळाला आहे.
दोन तीन वर्षात किरणभाऊंची प्रगती झालेली दिसते. पहिले स्वतः कामं करायचे. आता फोनवर आॅडर देतात
आता सस्पेन्स संपणार.. लवकर..
दोन तीन वर्षात किरणभाऊंची
दोन तीन वर्षात किरणभाऊंची प्रगती झालेली दिसते. पहिले स्वतः कामं करायचे. आता फोनवर आॅर्डर देतात >>>
कालचा एपिसोड सुरू असताना डाव्या कोपर्यात वर 'कमिंग सून' असं एक टीझर दिसत होतं. म्हणजे मालिका अखेरच्या टप्प्यात आली म्हणायची.
ललिताप्रिती, तुम्ही खरंच
ललिताप्रिती, तुम्ही खरंच डिटेक्टीव्ह होउ शकता.
कालच्या दृष्ग्यात किरणभाऊं
कालच्या दृष्ग्यात किरणभाऊं जरा जाड वाटले. बहुतेक आता दाढी मिशी मुळे चेहऱ्यावरची जाडी दिसत नाही. आता जास्त तरुण वाटतो तो 2 वर्षांपूर्वी दिसत होता त्यापेक्षा.
डेटा मध्ये काय मिळेल? फारतर सगळी दत्तक माहिती. पण बाकी प्लॅन विवेक किंवा जो कोणी असेल तो/ती कॉम्प्युटर वर का ठेवेल? आशिष्च्या चोरी गेलेल्या लॅपटॉपवर काय माहिती असेल?
मला वाटलेले आबा मध्ये आशिष ने कोणाचे चोरून केलेले रेकॉर्डींग असेल.
रागिणी आशिषच्या प्रेमात पडून लग्न करते पण लग्न मूल वगैरे झाल्यावर त्याच्याकडे इतके दुर्लक्स? तो तिला सांगायचा प्रयत्न करतो तेही ती दुर्लक्षित करते.
रागिणी संसार आणि बाळ ह्यात
रागिणी संसार आणि बाळ ह्यात रमलेली दाखवलीय म्हणून ती फार interest दाखवत नसते नवऱ्याच्या कामात म्हणून तो बहुतेक तिला सांगायचं बंद करतो.
आबा देऊ नको, आबाची आठवण तिची आई जास्त काढते परत आबा कोण तर ते खेळणे हे पण सांगते तर हीच लक्ष देत नाही. आता आबा लवकर मिळणार नाही बहुतेक, किमान एक आठवडा घालवतील त्याच्या शोधात.
काल रागिणी किती हाड तुड करत होती राजेशला, ते जरा अति वाटलं.
हो हो! ते हाड्हुड जरा जास्त
हो हो! ते हाड्हुड जरा जास्त वाटत होत खर पण एक्दम कुणी आवेश बदलुन जरा नरमी दाखवल तर जास्तच सावध व्हायला होत
रागिणिला आषिशआवडत असतो बाकी सामाजिक कार्यात तिला काही रस नसतो तस तिने आग्दी सुरवातीला म्हणल सुधा
लग्नानतर तो तिला त्यात सामिल करुन घ्यायचा प्रयत्न करतो पण तिला फार रस नाही हे कळत त्याला मग तो तिला फार फोर्स करत नाही
मला पण तरिही ते खटकलच कारण कामाची नाव्द असु श्कते पण नवरा बायकोच तरिहि जन्रल शेअरिन्ग असु शकत की
रा आता परिस्थितीमुळे खूप
रा आता परिस्थितीमुळे खूप मच्युअर झालीय, पण लग्नाआधी आणि नंतर जराशी अल्लडच असते. आठवा तिला मॉडेलिंगमधे करीअर करायचे असते. पण ते काही वर्काअऊट होत नाही. तेव्हा नवर्याच्या करीअरमधे रस नसणे, त्या बाबतीत त्याच्याशी शेअरींग नसणे वगैरे अनुशंगानी आलेच की!
रागिणीचं मूर्तीला हाडहुड करणं मला तरी बरोबर वाटलं. तो तोच आहे याची खात्री नसणे, आशिषचे आणि त्याचे संबंध कसे होते हे माहित नसणे आणि संभाव्य दुष्कृत्यांनधे त्याचा सहभाग आहे का नाही याचा अंदाज नसणे यामुळे ती ताक फुंकून पीत असेल तर योग्यच आहे ना?
हो शुगोल हा सर्व विचार पण आला
हो शुगोल हा सर्व विचार पण आला माझ्या मनात नंतर कारण सिरीयल संपल्यावर थोडं चिंतन केलं जातंच ह्या सिरीयलबाबत, पण समहाऊ अजूनही मला ती हाडतुड जरा अतीच आहे असं वाटलं.
पण समहाऊ अजूनही मला ती हाडतुड
पण समहाऊ अजूनही मला ती हाडतुड जरा अतीच आहे असं वाटलं. >> त्याने आग लावली असा तीचा पहिला समज असतो त्यामुळे त्याला तसे वागवणे ठिक वाटले.
मला वाटलेले आबा मध्ये आशिष ने कोणाचे चोरून केलेले रेकॉर्डींग असेल. >> आबा मध्ये बहुतेक लिस्ट आहे फक्त.
पण रागीणी आता किरणच्या मागावर जाइल. सदा शोभाताइंच्या . आणी शेवेटी या दोन वेगळ्या धाग्यांकडुन किक कडे (किंवा दुसरे कोणीतरी किंवा तिसरे कोणीतरी
) पोहोचतील
आबामधे फक्त दत्तक दिलेल्या
आबामधे फक्त दत्तक दिलेल्या मुलांची लिस्ट नाहिये तर विवेकच्या काॅंप्युटरचा पूर्ण डेटा बॅकअप आहे.
हो, त्याच्या कॉम्प्युटरचा आहे
हो, त्याच्या कॉम्प्युटरचा आहे हे खरे, पण कोणी गुन्हेगार अशी पब्लिक कॉम्प्युटरवर माहिती ठेवेल का असे मला वाटते. ऑफिसचा कॉम्प्युटर जो कोणीही पाहू शकतो, जरी पासवर्ड टाकला तरी. विवेकने माहिती टाकलीय म्हटले तरी मानसीला तो माहीत आहे हेही त्याला माहित होते आणि मानसी आशिषच्या जवळची आहे हेही त्याला माहित होते.
आता कळेलच काय आहे त्यात ते. आधी ते खेळणे सापडायला हवे.
खेळणं सापडणार. त्यासाठीच तर
खेळणं सापडणार. त्यासाठीच तर छाया खताळचा मुलगा त्याच संस्थेत दिलेला दाखवलेला आहे. आबा त्याच्याकडेच सापडेल बहुधा.
खरंतर मी ही मालिका बघत नाही
खरंतर मी ही मालिका बघत नाही पण माबोवरचे प्रतिसाद वाचून बघायची खूप ईच्छा आहे..पण आता मधूनच पाहिली तर storyसमजेल का? किंवा कोणत्या siteवर सगळे भाग बघता येतील..
कोणत्या siteवर सगळे भाग बघता
कोणत्या siteवर सगळे भाग बघता येतील..>> @ मोक्षू, ओझी रुद्रम असं गुगल वर टाका
रागिणीला ते लगेच पाहिजे ना.
रागिणीला ते लगेच पाहिजे ना. त्यासाठी ती तिथल्या बाईच्या घरी जाऊन पोचली.

रा ला सगळंच लगेच हवं असतं.
रा ला सगळंच लगेच हवं असतं. आठवा ती रात्री छाया च्या घरी जाते विचारायला जेव्हा शिवा येतो तिकडे.
हो आणि शिवाच्या घरी पण अशीच
हो आणि शिवाच्या घरी पण अशीच जाते रात्री.. बिनधास्त.!
हो रागिणी फार घोड्यावरून जाते
हो रागिणी फार घोड्यावरून जाते, अति घाई. त्यामुळे कधी गोत्यात येईल असं वाटतं.
ओझी रुद्रम असं गुगल वर टाका >
ओझी रुद्रम असं गुगल वर टाका >>धन्यवाद सुजा
मोक्षू, मधूनच वगैरे अजिबातच
मोक्षू, मधूनच वगैरे अजिबातच बघू नका. काहीच कळणार नाही. अगदी पहिल्या एपिसोडच्या पहिल्या शाॅटपासून अजिबात पुढे न ढकलता बघा. तरच सगळे क्लू लागत जातात.
मोक्षू, मधूनच वगैरे अजिबातच
मोक्षू, मधूनच वगैरे अजिबातच बघू नका. काहीच कळणार नाही. अगदी पहिल्या एपिसोडच्या पहिल्या शाॅटपासून अजिबात पुढे न ढकलता बघा. तरच सगळे क्लू लागत जातात.>>हो नक्की...
मोक्षू, मधूनच वगैरे अजिबातच
मोक्षू, मधूनच वगैरे अजिबातच बघू नका. काहीच कळणार नाही>> हो हो! हे अगदि मस्ट कारण ही झीमराठीच्या इतर मालिकासारखी अजिबात नाही किबहुना त्याच्या आसपासही जात नाही मालिका..
त्याच काय हे प्रेक्षकाना निर्बुद्ध समजुन ज्या काही बत्थड मालिका झी बनवते आणी प्रेक्षकाच्या शिव्याशाप खाते त्याच्या पापक्षालनार्थ बनत काही अस चान्गल..
मोक्षू, मधूनच वगैरे अजिबातच
मोक्षू, मधूनच वगैरे अजिबातच बघू नका. काहीच कळणार नाही. अगदी पहिल्या एपिसोडच्या पहिल्या शाॅटपासून अजिबात पुढे न ढकलता बघा. तरच सगळे क्लू लागत जातात >> +११११११११
आणि तुम्ही ओझी वर पहिला भाग पाहिलात ना की त्यात अपोआप गुंतत जाता....मी ३-४ दिवसात ४५ भाग पाहिले....
सोमवार आला
सोमवार आला
<< मी ३-४ दिवसात ४५ भाग पाहिले.
जबरी!
स्मिते भारीच आहे की तुझा
स्मिते भारीच आहे की तुझा स्पिड.
मी पण तितकेच एपिसोड पाहिले पण इतक्या फास्टात नाही.
मालिका भलतीच भारी होत चाललिये. राजेश ला रा पहिल्यांदा हाडहुड् करते ते मलाही योग्य वाटलं.
पण त्याने दिलेली माहिती रा ला उपयोगी ठरतेय ते भारी.
इथे सगळ्यांनी असं का ठरवलंय की सगळे ओहोळ शेवटी किक नामक सागराला मिळणार आहेत असं?
तो नसेल सुत्रधार तर? तिकडून वेगळा अपेक्षाभंग व्हायचा.
स्मिते भारीच आहे की तुझा
स्मिते भारीच आहे की तुझा स्पिड. >>
अग पहिला भाग पहिल्यावर पुढे काय पुढे काय असे करत करत सगळेच भाग पाहुन काढले पटपट....सकाळ दुप्पार सन्ध्याकाळ...वेळ मिलाला कि तेच....
त्यात आणि एक दिवस अचानक ऑफिसात यु ट्युब सुरु झालं कसं कोण जाणे..मग काय घेतला करुन सदुपयोग
आपण सगळ्यांनी ठरवूनच टाकलाय
आपण सगळ्यांनी ठरवूनच टाकलाय कि मुख्य सूत्रधार " कि क " च असणारे आणि तसच निघेल बहुतेक
त्याच्यापर्यंत सहज पोचायला
त्याच्यापर्यंत सहज पोचायला प्रेमात पडणे वगैरे असेल कदाचित, किंवा तिला त्याचा संशय आला असेल तर जवळ जायचा प्रयत्न करेल.
मुख्य सूत्रधार माखिजाच असेल
मुख्य सूत्रधार माखिजाच असेल तर मालिका प्रेडीक्टेबल आहे असं म्हणू शकतो आपण..!
कोणी वाचत असतील तर दुसरा
कोणी वाचत असतील तर दुसरा दाखवतील ऐनवेळी
. किंवा जे ठरलं असेल तेच दाखवतील आणि सस्पेन्सपेक्षा रागिणीचा मुख्य सूत्रधारापर्यंत पोचण्याचा प्रवास कसा उत्कंठावर्धक होईल हा उद्देश असेल जास्त करून मालिकेचा. खिळवून ठेवणे आपल्याला.
Pages