Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परत एक भरपूर थरारक घटनांनी
परत एक भरपूर थरारक घटनांनी भरलेला एपि. ब्लू व्हेलचा मोठा ऊपयोग करून घेईल रागिणी अजून एखादा खून करायला. डाॅ. ला ती सगळं का सांगते पैसे मिळाले वगैरे, एक दिवस डाॅ सगळं पोलिसांना सांगणार. डाॅक्टर किती खडूस वाटतात. रा खरंच किक मध्ये गुंतत चालली आहे आणि कि कला कदाचित हेच हवे असेल. राची आई का बरे मारत असेल कमळाबाईंना. किक पेक्षा राची आई जास्त गूढ वाटायला लागली आहे. रा सगळ्या गोष्टींची माहिती सुहासला का विचारत असते, तो तर साॅफ्टवेअरमधेेेे आहे ना. धाड टाकायचा सीन धडकी भरवणारा होता. धाड टाकली तेव्हा पहिले कुणीच दिसले नाही, मला वाटलं सगळे पळून गेले की काय. मिठबावकरचा एकच सोर्स आहे बाहेर पडण्यासाठी हे पटले नाही. सरपोतदारांचा खूप राग आला. सदाला मरताना नाही बघू शकत. जगतापची दया आली, बिचारा रात्रभर खणत होता.
मिठबावकरचा एकच सोर्स आहे
मिठबावकरचा एकच सोर्स आहे बाहेर पडण्यासाठी हे पटले नाही. >>> मम.
मुक्ता डॉक्टरांना सर्व
मुक्ता डॉक्टरांना सर्व मुद्दामून सांगतेय असं वाटतंय. तिला सांगायचं तेच सांगते आणि लपवायचंय ते व्यवस्थित लपवतेय, असं मला तरी वाटतंय.
राची आई का बरे मारत असेल
राची आई का बरे मारत असेल कमळाबाईंना. >> हे कधि झाल?
मालिका लांबवण्यासाठी ब्लू
मालिका लांबवण्यासाठी ब्लू व्हेल आलेला दिसतोय>, मी असे म्हटलेय पण तसे नाही हे आता लक्षात येते आहे ...
ब्लु व्हेल मध्ये कसे ऍडमिन खेळणाऱ्याला ऑर्डर करतो आणि खेळणारा त्या ऑर्डर पूर्ण करतो ...
जरी प्रत्यक्ष कोण ऑर्डर देतो हे माहित नसले तरी ! तसेच हे अंडरवर्ल्ड चे प्रकरण आहे . मेन बॉस कोण आहे हे माहित नसले तरी लोक गुन्हे करत जातात आणि मग त्यात अडकत जातात . आणि त्यांचा शेवटही त्यातच होतो . असे काहीसे पण मुक्ता बोलेल असे वाटते .
आज चा एपिसोड भारी होता एकदम. सदा उगाच बोलतो ,मिठबावकर ला, मी कोण आहे माहिती नाही का ? ..वैगेरे ! मिठबावकर सुटला म्हणजे सदासाठी धोकादायकच नाही का ! नंतर कळलेच असते पण मिठबावकर ला पकडल्याच्या आवेशात बोलला असेल. जगताप अडकला बिचारा .
राची आई का बरे मारत असेल कमळाबाईंना>> हे कधी दाखवले ?
कालचा एपिसोड मध्ये संदीप पाठक ने बहिणीचा रेफरंस दिला होता , त्यामुळे असे वाटते कि मुली जिवंत असतील का त्या ? तसे पण रिपोर्ट बनावटच होते ना..
मारेकर्याचे आता काय होते
मारेकर्याचे आता काय होते याची उत्सुकता आहे.
राची आई का बरे मारत असेल
राची आई का बरे मारत असेल कमळाबाईंना. >> हे कधि झाल? >>> व्ह्यायचंय, आज दाखवणार आहेत.
खरंच मारते का, की कमळाबाई असंच सांगतायेत.
अरे, पुढच्या भागाचे आधीच लिहू
अरे, पुढच्या भागाचे आधीच लिहू नका प्लिज.
हो उद्याच्या भागात काय होणार
हो उद्याच्या भागात काय होणार अजिबात लिहू नका. आधीच कळल्याने मजा जाते.
जगताप कुठे असलेला दाखवला त्या दोन गुंडांशी मारामारी करतो ते काही कळलं नाही.
बाकी धुरतची ट्रीक मस्त त्या गोळी लागलेल्या माणसाला मिठ्बावकरच्या रुममधे ढकलण्याची.... बरं स्वतः डायरेक्ट आत नाही घुसला
तिकडे तुम्ही बघितल्यावर,
तिकडे तुम्ही बघितल्यावर, नेक्स्ट एपिसोडचं दिसत नाही का शेवटी.
बाकी धुरतची ट्रीक मस्त त्या गोळी लागलेल्या माणसाला मिठ्बावकरच्या रुममधे ढकलण्याची.... बरं स्वतः डायरेक्ट आत नाही घुसला >>> येस्स भारी होतं ते.
जगतापने मुद्दाम मार खाल्ला.
जगतापने मुद्दाम मार खाल्ला. म्हणजे सांगता येईल रघुने मारले व पळाला.
तिकडे तुम्ही बघितल्यावर,
तिकडे तुम्ही बघितल्यावर, नेक्स्ट एपिसोडचं दिसत नाही का शेवटी.>>>>> नाही दिसत अगं
मला वाटतं की सुहास, त्याचे
मला वाटतं की सुहास, त्याचे बाबा आणि कमळाबाई ही पापभिरू, सर्वसाधारण माणसं असावित. रागिणीच्या आजूबाजूला अशीही (कुठल्याही गुन्ह्याशी संबंधित नसलेली) माणसं हवीच. कालपर्यंत रागिणीची आई सुद्धा या लिस्टमध्ये होती. आता मात्र ती तळ्यात-मळ्यात. कारण मला अजूनही असं वाटतं की आजारी आहे म्हणून किंवा औषधांच्या अमलाखाली असं वागत आहे. पण १% आता शंका येत आहे.
कि क भोवती गुढतेचं वलय छान निर्माण केलय.
आई आजारी आहे, तिच्यावर असलेला
आई आजारी आहे, तिच्यावर असलेला ताण ती न दाखवता नॉर्मल राहतेय त्याचा तिला त्रास होतोय बहुतेक.
कालचा भाग ठीकठाक होता. किरणने जे मिठबांवकरासोबत केले ते त्या फिल्डमध्ये कायम होत असणार. डोईजड झाला की संपवा.
मिठबावकर स्वतःचा वकील बाळगून नाही याचे आश्चर्य वाटले. स्वतःला सोडवण्यासाठी त्याला किरणची मदत का लागावी. त्याला माहित आहे तो काय काम करतोय, वकील लागणारच कधीना कधी.
रागिणी खूप अस्वस्थ आहे. पर्सनल इस्युस आहेत, आशिष आहे, त्याचे अर्धवट काम आहे.
आधीच्या आनंदी रिलेशनशिपचा पार्टनर अचानक मृत्यू पावल्याने अंत झाल्यानंतर नवी रिलेशनशिप स्वीकारतानाचा अपराधी भाव हा आपल्या भारतीय संस्कारांचा भाग आहे की ह्या वर आपल्या संस्कारांचा काहीही प्रभाव नसून जगातल्या कुठल्याही व्यक्तीला असे वाटू शकते?
काल रेड टाकण्याचा भाग खूप
काल रेड टाकण्याचा भाग खूप उत्कंठावर्धक होता. सदाला गोळी लागते की काय उगाच वाटतं होतं.
आता कमलाबाई सुद्धा गूढ वागायला लागल्या, रा ची आई त्या म्हणतात तसं करत असेल असं वाटत नाही. बघू काय आहे खरं.
मिठ चे इतर सोर्सेस असतील, पाहिले त्याने किरणला वापरून पाहिलं जो नक्की सोडवू शकेल अस त्याला वाटलं असणार.
मोरे एकदा दाखवले होते काल किंवा परवा, डायलॉग नव्हता पण दिसले.
कमळाबाई खूप गोड आहेत. टीव्ही
कमळाबाई खूप गोड आहेत. टीव्ही सिरीयलमध्ये काय चाललंय हे सांगताना चेहरा किती फुलून येतो. आई मात्र लगेच पाणी ओतते त्यांच्या आनंदावर. आई व कमळाचे ह्याच विषयवरन वाजत असणार. त्यात आता कमळाबाईंना रात्री पण राहायचेय. कसे सहन करू शकणार दोघी एकमेकांना.
किरण करमरकर आत्ता एबीपी
किरण करमरकर आत्ता एबीपी माझावर चॅट कॉर्नरमधे आलाय.
कालचा भाग छानच. ब्लु वेल
कालचा भाग छानच. ब्लु वेल बद्दल किती चर्चा....!!
अरे एक व्यक्ति म्हणुन तिला अस्वस्थ वाटतयं त्या मुलाने आत्महत्या केली तर.. म्हणून ती त्यावर शो करतेय. इतकच असू शकतं.
जगताप आता काय करतो काय माहित..
रागिणीला माखिजा आवडतोय..!!!
डॉक्टरांना जेवढं सांगायचंय तेवढच सांगितले तिने.
आता रागिणी मखीजा लवस्टोरी
आता रागिणी मखीजा लवस्टोरी असेल असं indirectly वाटतंय. कि क मुलाखत बघतेय. पण अर्थात त्याने सस्पेन्स असल्याने स्टोरी नाही सांगू शकत असं सांगितलं.
ब्लु वेल बद्दल किती चर्चा....
ब्लु वेल बद्दल किती चर्चा....!! >>> रागीणीला वाटत असावे ती जे काय करते आहे हे ब्लु व्हेल सारखेच addiction आहे.
वर स्वरालीने लिहिलेली ब्लु
वर स्वरालीने लिहिलेली ब्लु व्हेलचे अंडर वर्ल्डशी तुलना बरोबर आहे. आता अनाम मारेकरी त्याच लेव्हलला पोचलाय, गेम सोडायचा तर मरायला हवे, एकदा खेळायला सुरू केले की सुटका नाही.
रागिणीला माखिजा आवडतो????????
रागिणीला माखिजा आवडतो????????? का का का ? सस्पेन्स थ्रिलर सुरू असताना मध्ये लव्हस्टोरी नको बाबा!
ते माखिजाचा हॉटेल . त्याने
ते माखिजाचा हॉटेल . त्याने ठेवलेले सगळॆ अंध वेटर्स ह्या सगळ्यांनी ती इंप्रेस झालेय . पण म्हणून ती त्याच्या प्रेमात पडेलच असं नाही. कदाचित तिला हळू हळू तो आवडायला लागेलही किव्वा ती त्या डॉकटर समोर पण स्पष्ट करतेच आहे कि एखादा पूरूष तिला आवडायला लागला असेल तर आशिषशी ती प्रतारणा करतेय असं असेल का ? त्याच्या आठवणी पुसट होत आहेत का ? वगैरे पण हि प्रोसेस ( आवडणं वगैरे ) इतकी धीम्या गतीने घडेल आणि मध्येच अचानक असं काहीतरी घडेल कि तिच्या मनात संभ्रम निर्माण होईल कि हाच का तो माखिजा ? तो पर्यत मालिका संपेल पण
तिकडे तुम्ही बघितल्यावर,
तिकडे तुम्ही बघितल्यावर, नेक्स्ट एपिसोडचं दिसत नाही का शेवटी.>>>>> नाही दिसत अगं >>>> ok ok
ओझीवर पुढच्या भागात हा प्रकार
ओझीवर पुढच्या भागात हा प्रकार दुसऱ्या दिवशी दिसतो. ज्या दिवशी अपलोड करतात तेव्हा नाही दिसत. आता जाउन पाहिले तर सोमवारचा भाग म्हणून जो भाग दिसेल तीच पुढच्या भागाची झलक.
मि.कु.. +१ मधेच लव स्टोरी नको
मि.कु.. +१ मधेच लव स्टोरी नको..
चला, सोमवार आला
चला, सोमवार आला
हो ना, आज रुद्रम कधी बघतेय
हो ना, आज रुद्रम कधी बघतेय असं होतंय.
रूद्रम मध्येे काहीही दाखवलं
रूद्रम मध्येे काहीही दाखवलं तरी बघायची ऊत्सुकता असेल, शेवटी रूद्रम आहे ती, आपला दर्जा नाही सोडणार.
१,२,३,४...........४३,४४,४५ ..
१,२,३,४...........४३,४४,४५ ............हुश्श....पहिले सगळे एपि. मी...मी पण आता तुमच्यासोबत चर्चा करायला मोकळी...
मागचे ३-४ दिवस अक्षरशः रोलर कोस्टर राईड होती माझ्यासाठी...काय दमछाक करणारी सिरीअल आहे ही..अगदी छोट्यात छोटा सीन असुदेत, एखादा १ शब्दाचा डायलॉग असुदेत, कितीही छोटं पात्र असुदेत प्रत्येका मागे काहीना काही कारण आहे..अज्जीबात फालतूपणा नाही....मस्त मस्त मस्त...
आता आज काय होतं बघु..
Pages