Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नविन चेहेरे घेऊनपण एक टायटल
नविन चेहेरे घेऊनपण एक टायटल साॅंग बनवायला पाहिजे होतं जसंं जगताप, मिठबावकर, डावा, रघु, विवेक, मानसी ई. मखिजा खरंच फार गूढ आहे.
डावा ह्या शब्दाचा उलगडा पण
डावा ह्या शब्दाचा उलगडा पण व्हायचाय अजून.
<<इतर सिरिअल्स मधे वाटीभर
<<इतर सिरिअल्स मधे वाटीभर दुधात बादलीभर पाणी ओतत एपिसोडस वाढवतात, इथे रोजचे पेढे बर्फी खायला घालतायत.
मुक्ता आणि बच्चनचा एकत्र सिनेमा बघायला मिळायला हवा कधीतरी. फार गुणी आहे ती
धुरत क्लोजअप मधे खरं तर जरा कुरुपच दिसतो, पण तरीही पर्सनालिटी सॉलिड आहे त्याची. हल्ली तर त्याच्या तडफदार व सदाचारी स्वभावामुळे तो सुंदर वाटायला लागलाय.
काय काम करत आहेत एकेक जण. कुठे ठेवू असे झालंय सगळ्यांनाच>>
मनातले बोललात मेधावी !
मुक्ता ची ऍक्टिंग आधीपासून आवडते .पुण्याला असताना तिचे नाटक आवर्जून पाहायची मी . ती इतकी कूल आहे ना मध्यंतरात प्रेक्षकांशी भेटून छान गप्पा मारायची ! मला दोनवेळा ऑटोग्राफ बरोबर फोटो पण काढायची संधी मिळाली आहे .
धुरतची एनर्जी पण जबरदस्त.
धुरतची एनर्जी पण जबरदस्त. त्याच्या बोलण्या -चालण्यातून सतत जाणवते ती. सतत अॅलर्ट आहे तो. हाडाचा व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दिसतो तो. सिस्टीममधे त्रास असूनही, न वैतागता, मिळेल त्या (शक्यतो नैतीक पद्धतीने )प्रकारे शोध चालू आहे त्याचा.
रागिणीने निळ्या प्लास्टिक बॅग
रागिणीने निळ्या प्लास्टिक बॅग मधे काय भरून गॅलरी बाहेर टांगले??
धुरतची एनर्जी पण जबरदस्त.
धुरतची एनर्जी पण जबरदस्त. त्याच्या बोलण्या -चालण्यातून सतत जाणवते ती. सतत अॅलर्ट आहे तो. हाडाचा व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दिसतो तो. सिस्टीममधे त्रास असूनही, न वैतागता, मिळेल त्या (शक्यतो नैतीक पद्धतीने )प्रकारे शोध चालू आहे त्याचा. >>> अगदी अगदी.
काल रागिणी-मखिजाचा सीन
काल रागिणी-मखिजाचा सीन जबरदस्त होता. दोघंही एकमेकांना जोखतायत. आंधळ्या वेटर्सच्या मुद्द्यामुळे प्रेक्षक आणि रागिणी दोघंही कन्फ्यूज होऊ शकतात की मखिजा नक्की कसा आहे? चांगला? वाईट? अधला-मधला?
रागिणीला पैसे काळ्या पिशवीत भरून परत खालीच आणायचे होते तर त्या दोन माणसांना तिने बॅगा वर का न्यायला सांगितल्या?
प्लस गॅलरीच्या बाहेर बांधलेल्या निळ्या पिशव्यांचं आणखी एक नवीन गूढ.
माखिजा बद्दल काहीच सांगता येत
माखिजा बद्दल काहीच सांगता येत नाही. त्याच्या वर संशयाला पुर्ण वाव आहे.
रागिणीने निळ्या पिशव्यांमध्ये काय भरले असेल?
पुढील भागात तो मारेकरी किरणभाऊच्या घरी आलाय बहुतेक आता उलगडा होईल.. वॅनचा अॅक्सीडेंट कसा झाला. त्याने किरणभाऊला फोन केला होता मी ह्या मुलींना तुमच्या कडे आणतो काय करायचे ते करा.. यानंतर काय झालं ते कळेल..!
माखिजाने अतिशय चतुराईने
माखिजाने अतिशय चतुराईने स्वतःची मालमत्ता, आवड व तो एकटा असल्याचे रागिणीच्या कानावर घातले. तो हार त्याने देण्यासाठी आणला नव्हता तर रागिणी घेते का हे पाहम्यासाठी आणला होता. म्हणून त्याने ती नको म्हटल्यावर ठेव म्हणून आग्रह केला नाही. तिने घेतला असता तर त्याने तिला लिस्टवरून खोडुन टाकले असते. पण घेतला नाही म्हटल्यावर त्याने स्वतःबद्दल जास्तीची माहिती दिली.
आता एवढेच पहायचे की त्याला खरेच इंटरेस्ट वाटतोय की काही वेगळा हेतू मनात बाळगून तो ही चाचपणी करतोय.
फ्लॅटचा मालक कदाचित तोही असू शकेल, पण रागिणी हाच फ्लॅट घेईल हे त्याला प्लॅन करता नाही येणार. मला फ्लॅट हवाय हे रागिणी कोणालाच बोलली नाहीय. चदूदादा सोडून अजून कोणाला तिने विश्वासात घेतले नाहीय अजून.
फ्लॅटचा मालक कदाचित तोही असू
फ्लॅटचा मालक कदाचित तोही असू शकेल, पण रागिणी हाच फ्लॅट घेईल हे त्याला प्लॅन करता नाही येणार. मला फ्लॅट हवाय हे रागिणी कोणालाच बोलली नाहीय. चदूदादा सोडून अजून कोणाला तिने विश्वासात घेतले नाहीय अजून. >>>करेक्ट, रा ने बरोब्बर त्याचाच फ्लॅट रेंट करणे हा फारच योगायोग होईल.
त्या निळ्या पिशव्या खुणेसाठी असतील का ? तिचे घर कोणते हे ओळखायला ? पण कशासाठी ?
आईला रात्री एकटं सोडणं हे जरा रिस्की आहे ना ? तसही ती माखिजाला भेटायला जाते तेव्हा नवीन घरी रहायचं काही कारण नव्हतं, ती कपडे बदलून घरातले घालते म्हणजे रात्र तिथे काढायचा प्लॅन असणार. त्या बाईंवर आईला सोडायला ती काही कामगिरीवर जाणार असती तर ठीक होतं.
संदीप पाठक त्या अभय ला ऑर्डर देणार्याला मारायला तर आला नसेल ?
संदीप पाठक त्या अभय ला ऑर्डर
संदीप पाठक त्या अभय ला ऑर्डर देणार्याला मारायला तर आला नसेल ? मला वाटतं ते मुलींच्या वॅनचा अॅक्सीडेंट विषयी असेल.
आता एवढेच पहायचे की त्याला खरेच इंटरेस्ट वाटतोय की काही वेगळा हेतू मनात बाळगून तो ही चाचपणी करतोय. पण त्याला रागिणी वर संशय असता तर त्याला शोधून काढ्णं सोप आहे की..ती काय करते कुणाला भेटते..! आणि ती सांगत नाहीच बातमीचा सोर्स. माखिजाही सोडून देतो विषय. माखिजा जर या सग्ळ्यात ईनवॉल्व असेल तर तो रागिणीचा काटा सहज काढु शकतो..! गुढ वाढत चाललयं..!
भारी होता कालचा भाग. निळ्या
भारी होता कालचा भाग. निळ्या पिशव्यांमध्ये पैसे नाहीयेत ना? पैसे काळ्या गार्बेज बॅगमध्ये भरले ना? निळ्या पिशव्यांचं नीट दाखवलंच नाही काही. पैसे नसावेत त्यात. असे कोण पैसे टांगून ठेवेल? मग आहे तरी काय त्यात?
किरण करमरकर काय काम करतोय! वा वा, इम्प्रेस्ड. बरेच दिवसांनी त्याला चांगल्या रोलमध्ये पाहिलं. त्याचा पहिला सीन तर खिळवून ठेवणारा होता. मखीजाचा नक्कीच काहीतरी हात असणार आहे. न्युज चॅनल त्याच्या ताब्यात, मॉल्स, हॉटेल्स, प्रॉपर्टी- सगळ्यावर होल्ड आहे. तोच मास्टरमाइंडही असेल. रागिणीला खेळवतो आहे फक्त. रागिणीच्या प्रेमात पडून अचानक उपरती होऊन सगळं गिव्ह अप तर करणार नाही ना?
माझे आईबाबा या सिरियलचे फार
माझे आईबाबा या सिरियलचे फार तारीफ करत असतात .
गेल्या लंब विकांताला बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली .
आता बेसमेन्ट मिळते , तिथपर्यन्त पोचले आहे .
परत कधी निवांत वेळ मिळतो ते बघते . तुम्हा लोकांची चर्चा वाचून लवकर गाठावं या विचारात आहे
सगळ्यातच काही ना काहि क्लू
सगळ्यातच काही ना काहि क्लू आहे असं वाटतंय. .. अंध वेटर्स वगैरे >>> पाइंट आहे. हे होटेल देखील सातवच्या होटेल सारखे असु शकते.
बटरफ्लाय चे वाक्य भारी होते
बटरफ्लाय चे वाक्य भारी होते . ती विषयच बदलते.
निळ्या पिशव्यांचे गुढच आहे. काय आहे त्यात आणी अश्या का बाधल्या तीने ?
रागीणीच्या डोळ्यात हल्ली सटल
रागीणीच्या डोळ्यात हल्ली सटल खुनशी झाक दिसते. तिला पैशाबद्दल अजिबात आसक्ती नाहीये. फक्त माध्यम म्हणून बघते पैशाकडे. बिनधास्त पायाने आत ढकलते ती पैशाची बॅग. डिटेलिंग मस्त आहे.
मला वाटतेय पैसे थोडे काळ्या व
मला वाटतेय पैसे थोडे काळ्या व काही निळ्या बॅगांतून विभागून ठेवलेत. कारण निळ्या बॅगा पण पैशाच्या बॅगांसारख्याच जड होत्या.
तो बाथरूमला जायचंय म्हणतो
तो बाथरूमला जायचंय म्हणतो तेव्हाच अंदाज आला पुढचा. आत्तापर्यंत शंभर वेळा तरी पिक्चर मधे, सिरीअल मधे ही ट्रीक वापरून झालीये >>>>> हो ना, काहीतरी वेगळं, हटके दाखवायला हवं होत....
शुक्रवारपासून मालिका जिथे
शुक्रवारपासून मालिका जिथे पहाते तिथून गायब झाली होती. धुरत रागिचा पाठलाग करत होता तेव्हा. जीव घाबराघुबरा झाला होता. आज सापडली व चारही भाग पाहून घेतले आणि शांत वाटले.
.... माखिजा खुप गुढी आहे.
जीव घाबराघुबरा झाला होता >>>
जीव घाबराघुबरा झाला होता >>>
डिटेलिंग मस्त आहे. >>> अगदी! जिन्यावरून जड पिशव्या खाली ओढत आणल्यावर परत ताठ उभं राहताना मुक्ताने किती परफेक्ट दाखवलं. वाकून वजनाचं काही काम केलं की आपण परत असेच उभे राहतो.
तसंच धुरत त्या बंगल्यात प्रथम पोचतो, जगतापशी बोलता बोलता फेर्या मारत असतो, ते कुण्डीतलं झाड मधे येतं, ते एकदा शांतपणे बाजूला सारतो, दुसर्यांदा त्या झाडावरही वैतागतो, ते पण मला आवडलं. पात्रांची मनःस्थिती अशा बारकाव्यांमधून परफेक्ट उभी राहते.
त्या निळ्या पिशव्यांच काही
त्या निळ्या पिशव्यांच काही कळत नाहीये
तिनी घरातून एवढ काय समान आणल तेपण नाही कळत
सामानात काळ काळ काहीतरी होत
सामानात काळ काळ काहीतरी होत ते विग असतील का ? तिने सगळं अगदी पसरून ठेवलं. बंदूक फ्रिजमधे ? कोणी आलं घरी आणि उघडला फ्रिज तर ?
निळ्या लटकवलेल्या पिशव्यांचं गूढ भारी आहे. कि क पण मस्त करतोय अॅक्टिंग.
बंदूक फ्रिजमधे ? कोणी आलं घरी
बंदूक फ्रिजमधे ? कोणी आलं घरी आणि उघडला फ्रिज तर ?>>>मला वाटतंय फ्रीझ बंद असावा आणि या घराबद्दल कुणालाच माहित नाहीये सो मला नाही वाटत या घरात रा सोडून अजून कोणी येईल
कि क पॉझिटीव्ह असूदे बाबा,
कि क पॉझिटीव्ह असूदे बाबा, तोच मेन दाखवला तर काही मज्जा नाही, सर्वांनी आधीच ओळखलं आहे, त्यापेक्षा मस्त काहीतरी जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न हवा.
अंध वेटर्समुळे माखिजावर संशय
अंध वेटर्समुळे माखिजावर संशय येतोय.. illegal गोष्टींसाठी ते रेस्टॉरंट वापरत असेल तो.. अक्खा स्टाफ अंध असण्याचं दुसरं काय लॉजिक असेल..
रागीणीच्या डोळ्यात हल्ली सटल
रागीणीच्या डोळ्यात हल्ली सटल खुनशी झाक दिसते. तिला पैशाबद्दल अजिबात आसक्ती नाहीये. फक्त माध्यम म्हणून बघते पैशाकडे. बिनधास्त पायाने आत ढकलते ती पैशाची बॅग. डिटेलिंग मस्त आहे.>>> +१
पैसे पाहून डोळे लकाकत नाहीत तिचे. तिला विषय संपावयचा असेल तर ती ज्या तुसडेपणाने पटकन् 'नाही' म्हणते ते जाम आवडते मला. डोक्यात अनेक विचार चालू असताना जी अस्वस्थता असते ती छान दाखवते ती बॉडी लॅग्वेज मधून.
जिन्यावरून जड पिशव्या खाली ओढत आणल्यावर परत ताठ उभं राहताना मुक्ताने किती परफेक्ट दाखवलं. वाकून वजनाचं काही काम केलं की आपण परत असेच उभे राहतो. >> +१
वंदना गुप्ते तर मस्तच काम करत आहेत.
कि क ची व्यक्तिरेखा पॉझिटिव्हच दाखवली तर आवडेल खरे तर. प
धुरतची भुमिका करणारा अभिनेता कोण आहे? आधी कधी कसा नाही दिसला तो कुठे? खूपच छान काम करतो.
अंध वेटर्समुळे माखिजावर संशय
अंध वेटर्समुळे माखिजावर संशय येतोय.. illegal गोष्टींसाठी ते रेस्टॉरंट वापरत असेल तो.. अक्खा स्टाफ अंध असण्याचं दुसरं काय लॉजिक असेल..>>> हो मलाही तसंच वाटतंय .रागिणी अर्थातच भुलणार नाही ..नाहीतर "हुरळली मेंढी लागली लांडग्यापाठी" असे व्हायला नको. मला आत्तापर्यंत कि क पॉझिटिव्ह नाही बुवा वाटलेला. बोलून छाप पाडण्याचं कसब बरोब्बर दाखवलय त्याने .
<< मला आत्तापर्यंत कि क
<< मला आत्तापर्यंत कि क पॉझिटिव्ह नाही बुवा वाटलेला
मलासुद्धा
. तो पाताळयंत्रीच वाटतोय मला 
इंस्पेक्टर धुरत यांचे नाव -
इंस्पेक्टर धुरत यांचे नाव - आनंद अलकुंटे
इन्स्पेक्टर धुरत नी वन्स अपोन
इन्स्पेक्टर धुरत नी वन्स अपोन टाइम इन मुम्बइ मधे काम केले होते. इन्स्पेक्टर चव्हाण चे
Pages