रिपोर्ताज पद्धतीचे लेखन किंवा चित्रपटनिर्मिती नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असते. लेखक अथवा दिग्दर्शकाने होता होईल तो ठाशीव भावनात्मकता टाळून, केवळ संदर्भ वाचकां-दर्शकांसमोर ठेवून, भाष्य अथवा निष्कर्ष त्यांवर सोडावे अशी अपेक्षा असते.
राजकुमार राव प्रमुख भूमिकेत असलेला दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' हाही बहुतांशी याच पठडीतील प्रभावी चित्रपट आहे. नूतन कुमार उर्फ न्यूटन कुमार हा एक सरकारी कर्मचारी. कामात आणि जगण्यातही नियम, रीतीरिवाजांचे पुरेपूर पालन करणारा. सभोवती सगळीच मूल्ये ऱ्हास पावत असताना स्वतःच्या सचोटीबद्दल त्याच्या मनात साहजिकच अनेक शंका येऊ लागलेल्या असतात.
लोकसभा निवडणुकीत दुर्गम नक्षलग्रस्त भागात, केवळ शहात्तर मतदार असलेल्या एका प्रभागात, निवडणूक कक्ष स्थापन करण्याची जबाबदारी त्याच्यावर येते आणि भारतातील असूनही कुठला परग्रह वाटावा अशा त्या प्रदेशात निवडणुकीच्या एका दिवशी काय काय घडते याची विनोद, उपहास आणि वास्तववादी दृष्टीने मांडलेली कहाणी म्हणजे 'न्यूटन'.
न्यूटन, त्याचे दोन सहकारी (त्यापैकी एक रघुवीर यादव, नेहमीप्रमाणे टॉप फॉर्मात) आणि स्थानिक मदतनीस म्हणून नियुक्त झालेली सुशिक्षित आदिवासी युवती 'मालको नेताम' (अंजली पाटील) यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल टास्क फोर्स ऑफिसर 'आत्मा सिंग'च्या (पंकज त्रिपाठी) तुकडीवर असते. मणिपूर, नागालँड आणि आता छत्तीसगढमध्ये कामगिरी बजावलेला आत्मा सिंग कामात चोख आहे, कर्तव्यतत्पर आहे पण सततच्या जोखमीमुळे त्याच्यामध्ये एक विचित्र निर्ढावलेपणा, थोडा माज आणि हताश कर्मबुद्धी फोफावली आहे. शहरात बसून ठरवले जाणारे नियम आणि न्यूटनचे पुस्तकी आदर्श त्याच्यामते कुचकामी आहेत.
विपरीत स्थितीतही स्वतःची सचोटी न सोडणारा न्यूटन आणि ह्या नसत्या जबाबदारीतून शक्य तेवढी लवकर सुटका व्हावी म्हणून जंगजंग पछाडणारा आत्मा सिंग यांमधील सुप्त, उघड संघर्षाची कथा आणि मुळात ज्यांच्या भूमीत हे सर्व चाललंय त्या आदिवासींना या खेळात असलेले नाममात्र स्थान यांचे चित्रण करत न्यूटन शेवटाकडे जातो.
जागतिक दहशतवाद किंवा भारतासाठी काश्मीर म्हणा वा नक्षलवाद, या समस्या गंभीर असल्या तरी इतक्या चिघळल्या आहेत की यांवर नजीकच्या काळात ठोस उपाय निघतील ही अपेक्षा अवास्तव ठरावी. सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक गुंत्यात कित्येक वर्षे रुतून राहिलेले हे पेच. या स्थितीचे भान येऊन अस्वस्थ झालेला विचारी माणूस राजकुमारने नेहमीप्रमाणे झोकून देऊन साकारला आहे. त्याच्यासमोर तितकाच तोडीस तोड उतरलाय तो ('बरेली की बर्फी'तील खुशमिजास वडील झालेला) आत्मा सिंग अर्थात पंकज त्रिपाठी.
अनेक छोट्या घटनांतून समस्येची मूलगर्भता मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. परदेशी पत्रकारासमोर भारतीय लोकशाहीचा मोठेपणा दाखवायला उतावीळ सरकार, नक्षलींशी लढता लढता आदिवासींनाही पाण्यात पाहू लागलेले सुरक्षकर्मी, निसर्गाचा पर्यायाने निरागसतेचा होत असलेला नाश आणि चराचरात भरून राहिलेला निराशावाद उद्धृत करणारे अनेक संवाद, प्रसंग मनात राहून जातात. आकडेवारी साधावी म्हणून धरून आणलेले मतदार, जळालेली गावे-घरे, पैशाचे खेळ, केवळ वेगळी भाषा बोलतात आणि प्राथमिक अवस्थेत राहतात म्हणून आदिवासींना माणूसही न मानणारे बहुसंख्य पाहून विषण्ण व्हायला होतेच पण यावर उपाय काय हे न सुचून चडफड होणाऱ्या नायकासारखीच अवस्थाही होते.
एक उत्कृष्ट चित्रपट असला तरी न्यूटन आणि आत्मा सिंग या दोन विरोधी विचारधारांतील ताण अधिक टोकेरी करून दाखवायला हवा होता. मराठीतील सामना किंवा इंग्रजीतील देअर विल बी ब्लड, अ फ्यू गुड मेन सारख्या चित्रपटांत तो जसा उच्चतम पातळीवर आहे तितक्या चरमगतीला तो शेवटचा एक प्रसंग सोडला तर फारसा पोचत नाही. अर्थात ही काही तासांची कहाणी असल्यामुळेही झाले असेल किंवा इथे या दोघांहूनही परिस्थिती अधिक बलवान असेल पण स्वतःच्या विचारांवर अतूट श्रद्धा असलेली दोन पात्रे अधिक जोरकसपणे एकमेकांशी विचारयुद्ध खेळायला हवी होती असे जरूर वाटले.
ही बाब सोडली तर सांगायचे आहे ते कुठलाही अतिरंजकपणा टाळत, प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर ठेवण्यात चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आहे. अथांग जंगल, आदिवासींचे कोरे चेहरे आणि काही करण्याची इच्छा असणारे लोक सूनही एकूण व्यवस्थेतील फोलपणाने कायम असमतोलात राहणारा मूळ प्रश्नांचा तराजू या गोष्टी पुढे खूप वेळ टोचत राहतील. चित्रपटाने उपाय सुचवण्याची अपेक्षा नसावीच पण निदान जटिल प्रश्नांचा आवाका प्रेक्षकाला दाखवून दिलाय हेही कमी नाही.
ऑस्कर वगैरे जरा आवाक्याबाहेर वाटले तरी मनोरंजनाच्या नावाखाली सवंग होणाऱ्या चित्रपटांच्या गर्दीत असे चित्रपट माध्यमाची ताकद दाखवून देणारे म्हणूनच वेगळे. त्याबद्दल त्याच्याशी संबंधित सर्वांचे आभार नक्की मानले पाहिजेत.
-- अमेय
छान परिक्षण!
छान परिक्षण!
छान परिक्षण !
छान परिक्षण !
मस्त परीक्षण, बघायचा आहेच..
मस्त परीक्षण, बघायचा आहेच..
ट्रेलर बघूनच काहीतरी वेगळी
ट्रेलर बघूनच काहीतरी वेगळी आणि ईंटरेस्टींग स्टोरीलाईन वाटलेली. कलाकारही चांगले असल्याने उत्सुकता होतीच. आता हे परीक्षण वाचून ट्रेलर पाहून निर्माण झालेल्या किमान अपेक्षा पुर्ण करणारा असेल हे समजले. धन्यवाद, आता नक्की बघितला जाईल
वाह अमेय, मस्त लिहिलंय.
वाह अमेय, मस्त लिहिलंय.
अमेय, छान लिहिलंय....
अमेय, छान लिहिलंय....
बघायच्या यादीत आहेच हा
बघायच्या यादीत आहेच हा चित्रपट . छान लिहिलंस
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
राजकुमार रावचे किती पिच्चर बघायच्या लिस्टीत आहेत
मस्त लिहिलंय. आवडलं, पटलं.
मस्त लिहिलंय. आवडलं, पटलं. विशेषतः विचारधारांमधला ताण अजून टोकेरी हवा होता हे
परीक्षण आवडले. कालच एका
परीक्षण आवडले. कालच एका मैत्रीणीचा मेसेज आला जरुर सिनेमा पहा कारण ती व तिची मुलगी ह्या सिनेमात दिसणार आहे. २००९ ते २०११ मध्ये आम्ही दल्ली राजहरा ( छत्तीसगढ) ला होतो तिथे ह्या सिनेमाच चित्रीकरण झालंय. मिस्टर भुवैद्नानिक होते व रावघाट आर्यन ओरच्या कामसाठी नेमणूक झाली होती पण नक्षलवाद्यांमुले तसभरही काम झालं नाही. तिथे मी पण फिरले अगदी अबुजमहाड एरिया वै. तिथला सन्नाटा आजही आठवला तरी अंगावर येतो...
एकदा दल्ली राजहरा ते नारायणपूर जात होतो. पाचसहा कीमी जात नाही तो एक दोन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी उडवलेला पूर पार करून गेलो. आता नक्षलवाद्यी परवानगी देतील तेव्हा तो बनेल. रावघाट ते दल्लीराजहरा ही रेल्वेलाईन मेजूर होऊन कैक दशके उलटली त्यांच सगलं सामान पटर्या वै. पडलेलं दिसत होतं. सिरापीफ व इतर छावण्यांच्यामधून तपासण्या पार करत पूढे गेलो. नारायणपूरच्या आधी एक रस्ता रावघाटकडे जातो तिथे एक देऊल होतं तिथे गाडी थांबवायचीच. तिथला पुजारी म्हणजे 'खबरी' तुरलक रहदारी. एकंदरीत रहस्यमय गुढ प्रवास एखाद्या सिनेमात शोभेल असा! त्यामुले नक्की पहाणार आहे.
वेमा अवांतर वाटल्यास प्रतिसाद उडवा....
छान लेख. चित्रपट नेट
छान लेख. चित्रपट नेट फ्लिक्स किंवा अमेजॉन प्राइम वर आल्यावर बघेन. त्या साठी रविवारी उन्हात बाहेर जाणे शक्य नाही.
छान परिक्षण अमेय!
छान परिक्षण अमेय!
बघाय्ची उत्सुकता होतीच.
मन्जुताई, प्रत्यक्ष भेटीत तुमच्याकडुन या थरारक प्रसन्गान्चे वर्णन ऐकाय्ला आवडेल. !
वा ! पिक्चर बघायचाच आहे.
वा ! पिक्चर बघायचाच आहे.
मंजूताई , या सगळ्या अनुभवांवर एक लेख लिहा. मस्त वाचनिय लेख होईल तो.
मंजूताई , या सगळ्या अनुभवांवर
मंजूताई , या सगळ्या अनुभवांवर एक लेख लिहा. मस्त वाचनिय लेख होईल तो.
>>>>
+७८६
धनि +१
धनि +१
सुंदर परिक्षण. बघायला हवा.
मन्जुताई, प्रत्यक्ष भेटीत
मन्जुताई, प्रत्यक्ष भेटीत तुमच्याकडुन या थरारक प्रसन्गान्चे वर्णन ऐकाय्ला आवडेल.>> +१