नवीन ऑफरसह.. फोटोसह.. अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - ऊंचे लोग ऊंची पसंद तमिताभ - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 August, 2017 - 08:55

जाहीरातीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उल्लेखलेल्या सुपर्रस्टार कलाकारांबद्दल मनात प्रचंड आदर आणि प्रेम आहे, त्यांची माफी मागूनच प्रकाशित करत आहे Happy

____________________________________

"काय हो स्वप्निलची आई, कश्या आहात?"

"मी बरी आहे हो सईची आई, पण आमच्या स्वप्निलची ऊंची काही वाढतच नाही. तुमची सई आणि मुक्ता आहे म्हणून ठिक आहे. पण बाकीच्या मैत्रीणी त्याला खेळायला घेतच नाहीत"

"तुम्ही त्याची ऊंची वाढायला काय करता?"

"अहो रोज बाटलीने दूध पाजते"

"अश्याने बाटलीतले अल्कोहोल त्याला मिळत असेल. पण दूधातले कॅल्शिअम त्याला मिळतेय का?"

"हो तर, मी त्यात "शशशशश् शाहरलिक्स" पावडर सुद्धा टाकते. त्यात कककककॅल्शिअम खूप असते. आमचा पोरगा शाखाहारी आहे ना"

"हो पण ते कॅल्शिअम त्याला योग्य दिशेत मिळतेय का?"

"आई ग्ग, आता हे आणखी काय नवीन?"

"ते तुम्हाला आमची सई सांगेल"

"अय्या, सई डॉक्टर झाली? कपड्यांवरून वाटत नाही"

"हो ती जरा दुनियादारी करायला लागल्यापासून ...."

"
(टिंगटाँग टाईमप्लीज - अवांतर गप्पांनी जाहीरात मोठी होतेय आणि खर्च जास्त होतोय. पण करणार काय. तीन बायका, गपचूप आईका. कोण रोखणार त्यांच्या अवांतर गप्पा)
"

"तर काकू मी तुम्हाला सांगते. कॅल्शिअम योग्य दिशेत न मिळाल्याने तुमचा स्वप्निल उभा न वाढता आडवा तिडवा वाढलाय. पण तरीही मला तो आवडतो. इश्यss..
पण तुम्हाला सांगते या शाहरलिक्स आणि सल्लूरिक्सने काही होत नाही. त्यापेक्षा तुम्ही त्याला 'तमिताभ' चालू करा.
नाहीतर तुमचा स्वप्निल कककक् करन अर्जुन बनून राहील. त्याला 'आज का अर्जुन' बनवायचे असेल तर तमिताभला पर्याय नाही.

........... हसताय काय? स्वप्निलच्या आईला समजले. तुम्हाला कधी समजणार?? तुम्हाला आपल्या पोरांना 'डॉन' बनवायचे आहे की 'डॉन' 'डुप्लिकेट' हे आजच ठरवा.

तरुण तुर्क असाल किंवा म्हातारे अर्क असाल, फक्त एक गोळी तुम्हाला बनवू शकते 'बादशाह' पासून 'लाल बादशाह'.

ऊंची सोबत आपल्या मैत्रीणींची कक्षा देखील वाढवा.
केवळ जया वर समाधान मानू नका. सोबत जयाप्रदा देखील मिळवा.
बिंदू'पासून रेखा'पर्यंतचा प्रवास, फक्त नव्याण्णव रुपयात.
रोज फक्त एक चमचा पावडर, एक बाटली दूधात!

सर्वप्रथम बूकींग करणारया शंभर ग्राहकांना एका तमिताभ पावडर डब्यासोबत एक निप्पल बाटली फ्री! फ्री! फ्री!

बंटी, बबली आणि पिंट्यासाठी तीन आकर्षक फ्लेवरमध्ये उपलब्ध -
वॅनिला, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट.
यम्मी टम्मी आय लव्ह यू मम्मी

चिंकी, पिंकी आणि मोनासाठी तीन आकर्षक कलरमध्ये उपलब्ध -
पीकॉक ग्रीन, बेबी पिंक आणि लॅवेंडर.
खा, प्या, अंगाला चोळा..

रुक्मिणी, यशोदा आणि सखूबाईंसाठी तीन आकर्षक सुवासांमध्ये उपलब्ध - बकुळा, मोगरा आणि सदाफुली.
सुवास भरा जीवनात आणि जा दोन फूट गगनात.

सर्वच वयोगटातल्या पुरुषांसाठी खास घेऊन येत आहोत टॉल एण्ड हॅन्डसम 'वोडका तमिताभ'
फुल्ल टाईट, वाढू दे हाईट!

दूध प्यायचा कंटाळा करणारया पोरांसाठी खास 'तमिताभ बाकरवड्या'
एकच बाईट, वाढली ना हाईट !

आणि लवकरच घेऊन येत आहोत आपल्या मराठमोळ्या लोकांसाठी खास 'मिसो तमिताभ!'
बघतोस काय, पगडी सांभाळ.
हाईट वाढवलीय वाघाने !

तर आजच संपर्क करा.
दक्षिण मुंबई, प्रेमगली, खोली नंबर चारसो बीस Happy

before.jpg

....
...
..

after.jpg
.

ऑफर ! ऑफर ! ऑफर !
आता तमिताभ ऊंचे लोग उंची पसंदच्या तीन पावडरी ऑर्डर करा. आणि सोबत मिळवा तीन टनाटण साबू हातरुमाल फ्री फ्री फ्री !!!
ईथे पहा - https://www.maayboli.com/node/63763

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

before.jpg

....
...
..

after.jpg

कडक..

ऑफर ! ऑफर ! ऑफर !
आता तमिताभ ऊंचे लोग उंची पसंदच्या तीन पावडरी ऑर्डर करा. आणि सोबत मिळवा तीन टनाटण साबू हातरुमाल फ्री फ्री फ्री !!!
ईथे पहा - https://www.maayboli.com/node/63763

Lol

मेघा आणि दत्तात्रय, धन्यवा द !

मतदान सुरू झाल्याने तुम्हाला धन्यवाद बोलायचे टाळले होते - आचारसंहिता. ... काही तत्व आहेत आपली.
पण आता बहुतांश मतदान झाले असल्याने धन्यवाद बोलून घेऊ ईच्छितो Happy

तरी जाता जाता एक ऑफर द्यायचा मोह आवरत नाही,
जर नंबरात आलो तर माझे पहिले अभिनंदन करणार्‍या पहिल्या पाचांना पावडरीचा एकेक डब्बा उपवासाच्या साबू वस्त्रात लपेटून देण्यात येईल. भले तुम्ही मला मत दिले असो वा नसो Happy

धन्यवाद Happy
मी स्वतः देखील स्वतःलाच मत दिलेय. काय करणार नार्सिस्ट आहे ना, माझ्यापेक्षा चांगले मला कोणी वाटतच नाही Happy

मला सापडत नाहीये तो धागा.. कुठल्यातरी ग्रूपात असावा आणि तो ग्रूप जॉईन करणे गरजेचे असावे.. कुठे आहे?

Pages