संभाजी : येत आहेत

Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50

संभाजी : येत आहेत

झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.

Upcoming Sambhaji Maharaj serial teaser

https://www.youtube.com/watch?v=AjKvkh1Qweo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जनरली ७ ते साडे नऊ मधल्या सगळ्या मालिका बघितल्या जातात ना ? असं वाटत. झी युवा सुरु झाली तरी झी ची लोकप्रियता ओसरली नव्हतीच .पण रुद्रम ने झी युवा कडे सगळ्यांचं लक्ष खेचून घेतलं . आजकाल झी मराठी मधल दळण फारस आवडलं नाही तर मी झी युवा मध्ये पण डोकावते Happy

काल लोकसत्तेत आलेला प्रोमो पाहिला. उगीच असं वाटलं की काहीतरी मिसिंग आहे. नक्की काय ते कळत नाही. बायकांच्या नऊवारी साड्या हा मात्र गंभीर प्रश्न दिसतोय. फक्त प्रतिक्षा लोणकर आणि पूर्वा अशा दोघीच जरा नीट दिसत होत्या. तान्हं शंभूबाळ फार गोड आहे. पण शिवाजी महाराज अगदीच.... Sad अमोल कोल्हे काही चांगलं करेल अशी आशा. येसूबाई बघायचीपण उत्सुकता आहे.

http://www.loksatta.com/videos/manoranjan/1549225/sambhaji-zee-marathi-s...

डोहाळेजेवणाचं गाणं पारंपरिक चालीत नाही वाटत. स्टार प्रवाह वर राजा शिवछत्रपती लागायची त्यामुळे ती डोक्यात ठेवून ही बघितली गेली तर अवघड! पण तरी आत्ताच अंदाज नओ करायला. Happy

शिवाजी राजे शंतनू मोघे आहेत . श्रीकांत मोघेंचा मुलगा आणि प्रिया मराठे चा नवरा प्रिया मराठेची सगळ्यात पहिली मालिका " या सुखानो या " . गिरीश परदेशी , ऐश्वर्या नारकर , राजन भिसे , शर्वरी लोहकरे आणि विक्रम गोखले होते ना त्या मालिकेत ती .तर शिवाजी राजांच्या भूमिकेत शंतनू मोघे Happy

किती वाजता असणारे ही मालिका?
Submitted by आंबट गोड on 15 September, 2017 - 11:23

२४ सप्टेंबर रविवार २ तासाचा विशेष भाग.
२५ सप्टेंबर पासून रात्री ९.०० वाजता.

सगळा बायोडेटा सांगितलात की. शिवाजी अमोल कोल्हे आणि संभाजी म्हणून शंतनू असंही चाललं असतं >> Happy
त्याच त्याच ऐतिहासिक सिरीयल बघून कंटाळा नाही येत का? >>माझ्या मते झी मराठी वर बर्याच वर्षांनी येत असावी अशी ऐतिहासिक मालिका. मला तरी आधी कधी झाली असेल तर आठवत नाही . इतर चॅनल्स वर आल्या आहेत पण कधी बघितल्या गेल्या नाहीत ( झी वरच्या मालिका बघण्यापायी ) झी वर आल्याने थोडी तरी बघितली जाईल Happy

@ सुजा..सहमत.. मलाही नाही आठवत संभाजी वर एखादी मालिका या पूर्वी.. शिवाजी महाराजाप्रमाणे संभाजी राजेही माझे आवडते आहेत.पुस्त्क वाचलं आहे. मालिकाही ईंट्रेस्टिंग असावी..

संभाजीबद्दल जास्त माहिती नाही. वाचन झालं नाही. स्वामी, ययाति, राऊ वगैरे वाचली पण का कोण जाणे संभाजीवरची पुस्तकं नाही वाचली. शालेय ईतिहासाच्या पुस्तकातूनही फक्त पेटा-यातून वडिलांबरोबर पळून गेले एवढीच माहिती मिळाली. त्यांना खूप हाल हाल करून मारलं आणि ते खूप शूर आणि पराक्रमी होते हे ऐकून माहित आहे. अजून जाणून घेण्याची ईच्छा आहे पण ऐतिहासीक मालिका बघायचा कंटाळा येतो.

महाएपिसोड चांगला वाटला.
प्रतिक्षा लोण्कर - जिजाऊ, जरा जास्त अ‍ॅक्टींग करतेय असं वाटलं.
शिवाजी झालेला मला आवडला नाही. त्याचा आवाज संवाद वेगळेच वाटले काल.
बायकांचे कॉश्च्युम (बाब्बो Happy ) म्हणजे साड्या भरजरीच नेहमीच. आणि त्या दागिन्यानी मढलेल्या कायम.
बाकी सई बाई धरुन सात राण्या आणि बाल संभाजी मस्त वाटलेत.

मला पहिला महाएपिसोड आवडला.
वाक्यांच्या मधेच एखादा हिंदी शब्द बोलत होते का त्याकाळी ??? खफा झाल्या वगैरे.
सई बाई ची भुमिका केलीली अभिनेत्री आवडली.तिच्यासाठी कालचा एपिसोड म्हणजे >> मी आलो,मी पाहिल आनि जिंकुन घेतल सार.आनि एक्झिट पण घेतली लगेच असा होता.
बाकी सगळ्या राण्या झोपताना पण डोक्यावर पदर घेऊन का झोपतात हा प्र्शन पडला ??
महाएपिसोड जरी असला तरी सगळ्या घटना जोरात पळवुन सादर केल्या.बहुधा फक्त मोठ्या (अमोल कोल्हे )संभाजीराजे ना फोकस करणार असावेत पुढचे भाग.

शिवाजी महाराज झालेला actor किती भावशून्य आहे!! त्याचे डोळे एकदम कादिप मधल्या गौरी सारखे वाटले.. अमोल कोल्हे शोभला होता शिवाजी महाराज म्हणून

शिवाजी महाराजांवर फोकस नाहीच आहे..म्हणून यथा तथा अ‍ॅक्टर घेतला झालं!
आणि सई बाई महाराजांशी दोन हात करण्या इतक्या निडर आणि धट्ट्याकट्ट्या नव्हत्याच कधी!

काल दाखवलं........ सईबाई राजां सोबत तलवार बाजी करत होत्या..... म्हणजे इनडोअर.... डोहाळे म्हणून!

नेमका स्टार प्रवाहने कालच शिवाजी महाराज सिरियलचा महाएपिसोड ठेवला होता. Happy

बाकी सगळ्या राण्या झोपताना पण डोक्यावर पदर घेऊन का झोपतात हा प्र्शन पडला ?? >>> मी एकदा ससुराल सिमर का मध्ये त्या दादीमा ला डोक्यावर पदर घेऊन झोपताना पाहिले. Proud

डॉ अमोल कोल्हेंची या मालिकेसंदर्भाने मुलाखत लोकसत्तेत वाचली. ते छत्रपती शिवरायांवरची मालिका करायच्या आधीपासून छत्रपती संभाजींवर आधारित एका नाटकाचे खेळ करताहेत. टीव्हीवर संभाजीराजे आणायची त्यांची इच्छाही जुनीच आहे म्हणे.
पेपरातल्या नाटकांच्या जाहिराती पाहिल्या तर त्यांचे ते नाटक अजूनही चालू आहे. आणि साधारण त्याच संचातले दुसरेही एक नाटक चालले आहे. (शंतनू मोघे हे नाव लक्षात राहिलं.)

मराठीत संभाजीराजांवर नाटकंही आलीत : राजसंन्यास, बेबंदशाही (मुंग्या, मेरूपर्वत यातलेच बहुतेक), कानेटकरांचं इथे ओशाळला मृत्यू (ज्यात प्रभाकर पणशीकर औरंगजेबाच्या एंट्रीला टाळ्या घेत).
नक्की आठवत नाही, पण थोरातांची कमळा या चित्रपटातही संभाजीराजे आहेत.

हो बघतेय. तो छोटूला फारच गोडुला आहे . खुलता कळी मधल्या ईशा सारखाच . एकदम समजून उमजून काम करतोय . कुठून शोधून काढला असेल. मालिका नक्कीच इंटरेस्टिंग आहे Happy

ट्रेलर पाहिले... संभाजींचा बाहुबली करतायत का कोल्हे.
नका नासवू रे इतिहासाला.
खेळ करुन ठेवलाय डोंबार्‍याचा..

जिजाबाई म्हणुन दुसरं कोणी हवं होतं. चेहर्यावर करारीपणा, बोलण्यात जोश असणारं. सु.मो, रो.ह.
प्रतिक्षा लोणकर नुसतीच प्रेमळ आजी वाटतीये.

आणि ती सुंदरा दासी, खरच अशी कोणी होती का मंथरे सारखी?

Pages