ज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब

Submitted by नानबा on 5 September, 2017 - 01:11

साहित्य -
जिलेटीन २ चमचे
साखर २ वाटया
पाणी १.२५ वाटी
खादय रंग
इसेन्स

KRutee:
१/२ कप पाण्यात जिलेटीन विरघळून घेतल.
उरलेलया पाण्यात २ वाटया/कप साखर घालून गैस वर, मंद आचेवर १० मिनिटे ढवळले.
तयात जिलेटीन चे मिश्रण मिसळले.
अजून २० मिनिटे गैस वर ठेवले.
इसेन्स , रंग घालून , ग्लास मोल्ड मधे घालून फ्रिज मध्ये ठेवले.
निम्मा भाग तासाने काढून वड्या पाडल्या. निम्म्या जास्त वेळाने (दुसर्‍या दिवशी). दुसर्‍या दिवशीपर्यंतच्या वड्या जास्त खुट्खुटीत झाल्यात. काढून झाल्यावर वड्या साखरेत रोल केल्या.

मी केलेली मदत:
सामान काढणे. सामान ओळख.
गैस वरून वर खाली करणे.
पातेले गरम आहे ह्याची सतत आठवण करून देणे.
गरम पातेले धरणे.

IMG_20170905_104030.jpgIMG_20170905_104752.jpg

फायनल प्रॉडक्टः
IMG_20170905_105523.jpg

तळटीप १: सगळ्यात अवघड काम मिश्रण फ्रीज मधे टिकून देणे. सतत फ्रीज उघडून "आई खाऊ का?" "आई खाते ना."
तळटीप २: फोटो मोबाईल फोन वरून काढले असल्याने, लॅपटॉपवरून स्ट्रेच झाल्यासारखे दिसताहेत. ओवरॉल फोटो क्वालिटी खूप उत्तम नाही, पण कल्पना यावी म्हणून टाकलेत.
तळटीप ३: शाळेत मुलाबरोबर खाऊ करण्याचा प्रोग्रॅम असतो दर गुरुवारी. ज्यात मुले सोलणे, निवडणे, चिरणे आणि इतर कामे करतात. मी गेलेल्या गुरुवारी मुलन्नी डोसे देखील केले (त्यान्ना झेपेल इतपतच काम देतात). त्याचा परिणाम म्हणून लेक घरी स्वैपाकघरात मधेमधे स्वतःहून मदत करते हल्ली.
सोपे पदार्थ करायलाही उत्सुक असते.
हा पदार्थ खरेतर तिने मागे लागून केलाय दुसर्‍य.दा.
तेव्हा मायबोलीवर टाकायचे लक्शात नव्हते. पाकृ होत आली असताना माझ्या लक्शात आले की इथे टाकू शकतो, त्यामुळे अगदी स्टेप बाय स्टेप फोटोज नाहियेत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!!
हे काय आहे? जेली स्वीट सारखं काही आहे का?इतक्या छोट्या मुलीने केले कौतुकास्पद.

Hoy. Jelly sweet ch.
School madhe every Thursday mulanchya madatine khau tayar hoto. Tyamule cooking madhe ras nirmaN hotoy aapoaap.

Photo sandhyakali laptop varun try karate.

सॉलिड दिसतंय!!
बरंच सीनफुल असल्याने खाणार नाही,पण लुक्स जबरदस्त आलेत.

सहीच

करून बघणार हे (मी नाही. लेक करेल. मी मदत करेन)

सना, मस्तच!
पातेले गरम आहे ह्याची सतत आठवण करून देणे. > सगळ्यात अवघड काम मिश्रण फ्रीज मधे टिकून देणे. > Lol

सगळे प्रतिसाद +१

शाळेत असताना अशा गोळ्या यायच्या जेलीच्या साखर लावलेल्या त्याची आठवण झाली. एकदा करुन बघेन मी हे Proud

तुझी लेक एवढी मोठी झाली?
> >
हो. फक्त ती सोयीनुसार लहान मोठी होते आता. Happy

धन्यवाद सगळ्यांना - तिला नक्की वाचून दाखवेन.
साईड एफेक्ट म्हणून ती पुन्हा एकदा जुजुब्स करू म्हणून मागे लागेल. Happy