संभाजी : येत आहेत

Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50

संभाजी : येत आहेत

झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.

Upcoming Sambhaji Maharaj serial teaser

https://www.youtube.com/watch?v=AjKvkh1Qweo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित नकटीच्या लग्नाला .कारण पहिले पाच -सहा एपिसोड बघितल्या नंतर कधीच बघितली नाही ती मालिका. प्रेक्षक नसतानाही खूप ताणून धरली ती मालिका. त्याचे निर्माते झी च्या खूप जवळचे आहेत बहुतेक

तरुण संभाजी च्या भुमिकेत कोण कलाकर आहे ह्याची जाम उत्सुकता आहे.टायटल सॉंग काय कस असेल ह्याची पण उत्सुकता.
आय विश अ‍ॅण्ड प्रे कि ही मालिका सरस ठरावी.शिवाजी मालिकेपेक्षाही.झी वाल्यानी मानबा,खुकखु,नलसा, वगैरे मालिका नंतर हा विषय निवडला म्हणजे जरा तरी जागेवर येत आहे असे म्हणायचे.

काहे दिया परदेस संपून संभाजी येतेय . हो अमोल कोल्हेच आहे संभाजी . कुठलीहि मालिका जास्ती जास्त १ वर्ष २ महिन्यापासून एक वर्ष ६ महिन्यापर्यंत चालते असं आपलं निरीक्षण . काही काही अपवाद Happy

पण अमोल कोल्हे आवडतो मला. तो शिवाजी महाराजांची भूमिका असो इतर कुठली राजांची, शोभुन दिसतो. औरंगजेबाच्या भूमिकेत राहुल सोलापूरकर आहे की काय?

ही मालिका आधी कलर्स मराठीवर येणार होती, तिथे दाखवत होते, लवकरंच संभाजी असं. मग मटाला पण वाचली होती बातमी सहा महीन्यापूर्वी की 'तू माझा सांगाती' संपून संभाजी येणार. माशी शिंकली वाटतं कुठेतरी. तू माझा काही संपेना आणि संभाजी गेली दुसरीकडे.

"तू माझा सांगाती" ची अॅड पाहिली गेल्या आठवड्यात.
भरत जाधव तुकाराम किंवा पांडुरंग आहे.
चिन्मय मांडलेकर तुकाराम महाराज होता. तीच ना ही सिरियल??

अमोल कोल्हे राजांच्या भूमिकेत खरंच खूप शोभून दिसतो. Happy

शिवाजी महाराज आणि संभाजी राजांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक होता.. अमोल कोल्हेला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे संभाजी करताना..

अमोल कोल्हे आता बोअर झाला स्टिरीओटाईप एकच रोल करतोय. नाटकात पण तोच, चित्रपटात पण तोच, सिरीअल मध्ये पण तोच. अभिनय चांगला करतो त्यासाठी प्रत्येकवेळी त्यालाच घेणे बरोबर नाही. नविन चेहरा असता तर लोक त्यासाठी तरी बघतील. नाटक पाहीलेल्या लोकांना कंटाळवाणा होणार.
ऊस गोड आहे म्हणून तो मुळापासून थोडी खायचा असतो

माझा हिरमोड झाला Sad अमोल कोल्हे सोडुन कोनीही चालला,पळला असता खरं.मराठी इंडस्ट्री मधे बरेचसे चांगले चेहरे आहेत.

अमेोल कोल्हे स्टिरिओटाईप रोल करतो >> पण नेहमी असच असत इंडस्ट्रीमध्ये . एखाद्याचा एक रोल हिट गेला कि त्याच त्याच प्रकारचे रोल मिळतात. दुसरे रोल कोणी त्यांना ऑफर करतच नाही . काम न मिळण्यापेक्षा स्वीकारणं कधीही चांगलं . त्याचीही मजबुरी असेल आणि निर्माता आणि दिग्दर्शक हि त्याला त्या रोल मध्ये घेण्यात सेफ असतातच Happy

आता लक्षात आलं किंवा यु ट्यूब वर बघितलं . चार चार निर्माते आहेत त्यात ला एक अमोल कोल्हे आहे . अतिशय सुरेख बोलला अगदी डोळ्यात पाणी आलं . महा मालिका आहे हि . आधी कलर्स वर येणार होती पण तिथे काहीतरी बिनसलं आणि झी मराठीला मान मिळाला आणि माझ्या मते झी मराठी वर जी कुठली मालिका येते त्या मालिकांना आणि त्यातल्या सगळ्या कलाकारांना नाव मिळत Happy

हो खरे आहे सुजा. पूर्वीची ई टिव्ही, आताच्या कलर्स वरल्या मालिका भयाण होत चालल्यात. सरस्वती ही सिरीयल साबा-साबु पहातात म्हणून मधून डोकावते. पण नीच पणाचा कळस दाखवलाय या मालिकेत. म्हणून लोक झी कडे वळतात.

'झी' चे निखील साने आता कलर्स चे हेड आहेत असं वाचलं मागे.. त्यामुळे दर्जा सुधारण्याची अपेक्षा आहे

झी मराठी वर जी कुठली मालिका येते त्या मालिकांना आणि त्यातल्या सगळ्या कलाकारांना नाव मिळत>>>आणि नावे (वाईट) ठेवलीही जातात Lol

पण नीच पणाचा कळस दाखवलाय या मालिकेत. म्हणून लोक झी कडे वळतात.>>> झीमराठी सुद्दा बेकार झालय सध्या.

हि महामालिका आहे तर ७ किव्वा ८ वाजता ठेवायला हवी होती. जास्त लोकान्ना बघायला मिळेल.

जबरी आहे कन्सेप्ट! आधी हा स्लॉट कारेदु चा होता जी office setting मधली टोटली मुंबईकर मालिका होती (हल्लीच्या मालिकांपेक्षा बरीच बरी होती असं आता वाटतं. ) त्याआधी काय होतं आठवत नाही बहुधा तुझं माझं जमेना - अगेन मॉडर्न कपलची स्टोरी होती. पण त्याच स्लॉटमध्ये इतिहास मालिका म्हणजे एकदम गेम चेंज आहे. वेगळा प्रेक्षकवर्ग खेचावा लागेल.

Pages