अमेरिका: थंडी सुरु होण्याच्या अगोदर घरात कुंड्या आणताना तुम्ही काय काळजी घेता?

Submitted by अजय on 11 September, 2017 - 11:40

आयुष्यात दुसर्‍यांदा काहीतरी बागेत लावायचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात झणझणीत मीर्च्या लावल्या होत्या काही वर्षांपूर्वी. पण ज्या आल्या त्या काकडीसारख्या खाता येतील अशा सपक आल्या. त्याचं खापर बोस्टनच्या हवेवर फोडण्यात आलं. या वर्षी आलं लावलं, ते आलं. पण आल्याचं झाड खूप हळु वाढतं. जमीनी बाहेर कोंब यायला ५-६ आठवडे लागले. आता कुंडीत ४ आणि जमिनीमधे ६ अशी रोपटी आहेत. नेटवर बोस्टनच्या हवेत आले बाहेर जगते का नाही यावर दुमत आहे. त्यामुळे कुंडीतली घरात आणि जमिनीतली तशीच या हिवाळ्यात ठेवून प्रयोग करून पाहणार आहे. आल्याला काही झाले तरी चालेल पण घरात कुंड्याबरोबर एकही कीडा आला नाही पाहिजे असे फर्मान सुटले आहे. घरात पोर्च, सनरूम असे काही नाही. थेट वावराच्या खोल्यातच कुंड्या ठेवाव्या लागणार आहेत.

तुम्ही हिवाळ्यात घरात कुंड्या आणता तर काय काळजी घेता? कुठल्या प्रकारची किटक नाशके वापरता? इतर काही काळजी घ्यावी लागते का?

आला आला वारा च्या चालीवर

आलं आलं आलं
जेंव्हा कुणितरी गेलं
थंडीमधे कुंड्या आत
तरच ते टिकेल

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एका जपानी चानेलवर( nhk world - japan. पाहिलेलं (At Home with Venetia )
दक्षिणेला काचेची पेटी किंवा काचेच्या झाकणाचा हौद करून हर्बज ठेवलेले॥ ग्रिनहौस इफेक्टने आतली झाडं जगतात.

घरात आले की बाहेर आले? Lol
पुढच्या जीटीजीला मला रोप मिळेल का?
(हे सगळं विषयाला धरूनच आहे. Proud )

जोक्स अपार्ट, घरात हीटिंगचे व्हेन्ट्स जवळ नसतील आणि चांगला उजेड मिळेल अशा ठिकाणी झाडं ठेवा.
दिवसातलं किमान तापमान चाळीस डिग्री फॅरनहाइटच्या खाली जाण्याआधी झाडं घरात घेते मी.

सिंडरेलाने आजच 'घरात घेण्याआधी आठवडाभर पाणी तोडून माती कोरडी होऊ द्यावी' असा सल्ला दिला होता.

नॉर्थ कॅरोलिनामधे कुंड्या घरात आणताना-
१. जिथे कुंड्या ठेवणार असू त्याच्यावर/ खाली/ आजूबाजूला सेंट्रल हिटरचा व्हेंट थेट येणार नाही याची काळजी घेतो.
२. हार्डवुड/कार्पेटवर आधी वर्तमानपत्रे, त्यावर जाड प्लास्टीकच्या पट्ट्या (साधारण १२" x ४ किंवा ५ किंवा हवे तेव्हढे फूट लांब असणार्‍या) पट्ट्या घालून त्यावर अशा प्लास्टिकच्या बशा ठेवतो. या बशा जास्त खोलगट (२" ते ३") असल्यास चांगले. कुंडी फार मोठी असल्यास या बशांच्याखाली चाकं असलेला स्टँड ठेवावा म्हणजे कुंडी हलवणे सोपे जाते.
३. कुंंड्या आत आणण्याअगोदर बाहेरची बाजू स्वच्छ धुवून पुसून, पूर्ण कोरड्या झाल्यावर आत आणतो. आधी तयार करून ठेवलेल्या बशांमधे ठेवतो.
४. गरज भासल्यास 'ग्रो लाईटस' लावतो पण उन्हे आत येणार्‍या खिडकीशेजारी ठेवल्यास गरज नाही.
५. आठवड्यातून एकदा किंवा गरज असेल तसे 'मॉडरेट अमाऊंट' मधे पाणी देतो. खत द्यायची गरज नाही.

अजूनपर्यंत तरी घरात कुठले किडे आलेले नाहीत. आमच्याकडे मोगरा, ज्वासंद, कडिपत्ता इत्यादी झाडं कुंड्यांमधे आहेत. आल्याला कुठली किड लागणार नाही पण लागलीच तर ती कुंडी isolate करून ठेवावी. नीम तेल स्प्रे केल्यास किड आटोक्यात येईल.

घरात हीटिंगचे व्हेन्ट्स जवळ नसतील आणि चांगला उजेड मिळेल >>> +१

पुढच्या जीटीजीला मला रोप मिळेल का? >>>> आले तर मिळेल की Proud

Lol

बाय द वे, रंगीत मिरच्यांचा (माझ्याकडे सध्या पिवळ्या आहेत, एकदा लालही होत्या) रंग बदलण्याआधी (हिरव्या असतानाच) काढल्या तर त्या काकडीसारख्या लागू शकतात. तसं काही झालं असेल का? (बोस्टनची हवा अशी काय स्पेशल लागून गेली आहे नाहीतर?! Proud )

सगळ्याना धन्यवाद.

@अंजली
कुंड्या आत आणायच्या आत कुठले किटकनाशक वापरता का? मी नीम तेलापासून तयार केलेले वापरतो आहेत पण कुंड्यांमधे अजून बारीक कीडे आणि अगदी बारीक गोगलगाई दिसताहेत.

@स्वाती
हो मिळेल की. पण तुम्हा लवकर हवे असल्यास तो पर्यंत थांबायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी करू शकता. मी अमेरिकन ग्रोसरीतून आणलेल्या आल्यापासून रोपं बनवली. मी वेगवेगळ्या मातीत , वेगवेगळ्या सूर्यप्रकाशात, वेगळ्या पाण्यात, वेगळ्या स्टोअर मधून आणलेल्या आल्यापासून २३ रोपं बनवायचा प्रयत्न केला. १० रोपटी जोरात वाढताहेत, ४ रोपट्याना कोंब यायला ३ महिने लागले ते जगतील असे वाटत नाही. उरलेल्या ९ चं काय झालं माहिती नाही. पण आता आल्याला काय हवंय त्याचा अंदाज आलाय. पुढच्या वर्षी ५० आल्याची झाडं लावायचा विचार आहे. जमीनिचा काही भाग आहे तिथे आलं जोरात फोफावेल असं वाटतंय आणि तसंही तिथे काही नाही. इतर झाडे टिकत नाही कारण ससे आणि खारी खाऊन टाकतात. अजून तरी आल्याला काही धक्का लावला नाहीये. बघू.

चांगल्या झणझणीत मिर्च्या भारतीय ग्रोसरीतून आणल्या होत्या. त्यातल्याच काहींच्या बीया वापरून झाडे लावली पण तरी ज्या मिर्च्या आल्या त्या सपक निघाल्या.

@प्राण
आल्याचं झाड अनेक वर्षं राहतं त्यामुळे कधीतरी हिवाळ्याला तोंड द्यावं लागणारंच. तशातही हे इथल्या हवेतलं झाड नाही.

कुंड्या आत आणायच्या आत कुठले किटकनाशक वापरता का? >> नाही. थंडी सुरू होता होता बारीक बारीक किडे नाहिसे झालेले पाहिले आहेत. पण नीम ऑईल अणि insecticidal soap यांच्या मिश्रणानं किड नाहिशी होईल.
बारीक किडे म्हणजे aphids आहेत का? असल्यास आमच्या गावातल्या गार्डन क्लबमधे हळद आणि मिरची घालून उकळलेलं पाणी आणि नीम ऑइल यांचे मिश्रण फार उपयोगी आहे असं सांगितले होते.
गोगलगाईंविषयी (slugs) अनुभव नाही. पण इथे काही माहिती आहे. बिअर पसरट भांड्यात ठेवून कुंड्यांमधे ठेवल्यास गोगलगाई नाहिशा होतात (असं म्हणे Happy ).

रोपट्यावर अजिबात कीड नाही. पण कुंडीतली माती चांगलीच जिवंत दिसते. It is happening place Happy बरेच जण तिथे गुण्यागोविंदाने नांदताना दिसताहेत. रोपटी निरोगी आहेत. तुम्ही सुचवलेले उपाय करून पाहतो आणि लिंक्सही पाहतो.

रोपट्यावर किड नसेल तर / रोपटी निरोगी असतील तर काळजीचे कारण नाही. ओलसर माती उन्हाळ्यात उबदार होते म्हणून किडे/गोगलगाई आल्या असतील. थंडी वाजायला लागली की तिथून बाहेत पडतील. बिअर ठेवून बघा ...

अजय आले रुजायला वेळ लागतोच. नीम तेल लावल्यानंतरही gnat वाढणे हा प्रकार अनुभवला आहे. त्यावर एक उपाय चालला तो म्हणजे कुंडी मधे मातीवर वाळूचा २ इंचाचा थर देऊन ठेवणे. असे करणार असाल तर वाळू मधून पाणी देण्यासाठी फनेल्स घालून ठेवा. वाळू वर पाणी ओतलेत तर ती माती मधे मिक्स होत जाते.

असामी, मी ते "अजय आले. आता त्यांना रुजायला वेळ लागतोय" अश्या अर्थाने वाचलं आधी Lol

सुतारपक्षी Rofl

अजय, तुमच्या कुंड्या म्हणजे एक वेगळी इकोसिस्टिम दिसतेय Happy

>>>>अजय आले. आता त्यांना रुजायला वेळ लागतोय" अश्या अर्थाने वाचलं आधी<<<

मला तेच वाटलं की त्यांना मायबोलीवर रुजायला वेळ लागतो.

@ असामी
धन्यवाद. तुम्ही आल्यासाठी हा उपाय केला आहे का? कारण आलं खाण्यासाठी मधून मधून माती उकरावी लागली तर काय करणार? तेंंव्हा वाळू मिक्स होणार नाही का?
@ शुगोल
धन्यवाद. तुम्हाला मीठाचे प्रमाण माहिती आहे का? नाहितर मीठाने गोगलगायी मरायच्या पण माती क्षारयुक्त होऊन नापीक व्हायची.

आल्याला काही झाले तरी चालेल पण घरात कुंड्याबरोबर एकही कीडा आला नाही पाहिजे असे फर्मान सुटले आहे >> घरात हे पहिलेच रोप आहे का ? बाहेर कुंडीत लावले तेंव्हा अंगणातलीच माती उकरुन लावली होती का ?

घरात / अंगणात आत बाहेर करायच्या कुंड्यांमधे कंटेनर मिक्स वापरावे . त्यामुळे कुंड्यांचे वजन पण आटोक्यात रहाते आणि वर्म्स/ स्लग्स पण कमी होतात. अंगणातली माती उकरुन घातली तर ती जास्त जड असते आणि अळ्या / अंडी जास्त असतात.

आत आणायच्या आधी एक- दोन दिवस गराज मधे ठेवून नंतर घरात आत आणू शकता.

घरातले येऊ शकणारे हे पहिलेच रोप आहे. आतापर्यंत कुणीच आत "आले" नाही Happy

परसाच्या टोकाला एक जंगलासारखा भाग आहे. त्यावर वर्षानुवर्षे पानांचे ढीग, इतर ऑरगॅनि़क गोष्टी साचत गेल्याने नॅचरल कॉम्पोस्ट झाले होते. कुंडीत लावताना तिथली माती घेतली म्हणूनच त्या भरपूर हालचाल आहे. वजन तसे कमी आहे. कारण माती कमी आणि Humus जास्त आहे

घरातले येऊ शकणारे हे पहिलेच रोप आहे. आतापर्यंत कुणीच आत "आले" नाही >> वेमा, आता तुमचा सगळा विंटर प्रथमच घरात आलेल्या "आल्याच्या" कौतुकात जाणार तर!

गोगलगायी मिठानी पण मरतात. >> हा प्रयोग मी कुंडीतल्या मातीमधल्या गोगलगायींवर केलेला नाही. त्यामुळे प्रमाण वगैरे सांगणं अशक्यच आहे. तुमची शंका रास्त आहे. क्षाराचं प्रमाण वाढू शकतं.

मला खरं तर ही झाडं आतबाहेर करण्याचा अजिबात अनुभव नाही. एक तुळस काय ती आत घ्यावी लागते. ती देखील अनेकदा बाहेर विसरुन मरुन गेली आहे. पण समर आला की खाली पडलेल्या मंजिर्‍यांनी नवी रोपं आपोआप येतात.

मोगरा, कढीलिंब, गवती चहा ही झाडं तर "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि.. याप्रमाणे १२० फॅ ते दोन - चार दिवसांचं फ्रॉस्ट टेंपरेचर एवढ्या रेंजला देखील चांगली टक्कर देतात.
असो. तुमच्या आलं प्रयोगाला शुभेच्छा.

दर वर्षी कुंड्या घरात घेतल्या की थोड्या दिवसांनी सेंटिपीड्स दिसायला लागतात घरात. कारण ओल्या मातीत त्यांची अंडी असतात. यावर उपाय म्हणून कुण्ड्या घरात घ्यायच्या एक आठवडा आधी पाणी तोडायचं. त्या आधी हळद+मीठ मिश्रणाचं पाणी पानांवर आणि मातीच्या सरफेसवर फवारायचं. पाण्यासाठी सॉसर्स असतात त्या वेगळ्या काढून धुवून ठेवायच्या. कुंड्या आणि सॉसर्स २ दिवस तरी कडकडीत उन्हात राहिल्या पाहिजेत. माती चांगली वाळली की मगच कुंड्या आत घ्यायच्या. एवढी उठाठेव केल्यावर सेंटिपीड्स खूपच कमी दिसले गेल्या वर्षी.

मातीतली जीवसृष्टी मारण्यासाठी बाजारात बरीच औषधं मिळतात.

तुम्ही आल्यासाठी हा उपाय केला आहे का? कारण आलं खाण्यासाठी मधून मधून माती उकरावी लागली तर काय करणार? तेंंव्हा वाळू मिक्स होणार नाही का? >> नाही अजय. मी आल्यासाठी हा प्रयोग केलेला नाही. (आले आत आणायची इथे गरज पडत नाही) शोभेच्या झाडांवर नि तुळस, मोगरा वगैरे वर हा केला जी उपटायची गरज लागत नाही. पण वसंत सुरू होण्याआधी ही झाडे बाहेर नेऊन ठेवल्यावर हलक्या हाताने वरची वाळू सहज बाजूला काढता आली होती. आले काढताना तसे करता येउ शकेल.

अजय,
अगदी ताजा किस्सा.

आमच्य इथे इर्मा ताईंच्या स्वागताप्रित्यर्थ सगळ्यांनी झाडांच्या कुंड्या आत आणल्या. तर आमच्या शेजार्‍यांकडे कुंडीत लपून एक बेडूक पण आत आला. गेले दोन दिवस तो रात्री मोठ्याने ओरडत बसतो. दिसत मात्र नाही दिवसाही जाम सापडत नाही. त्याला शोधून बाहेर काढावं कसं तेच कळत नाही. आम्ही आज सकाळी बघितलं त्यांच्या घरात कुठे दिसत नाही.

त्यामुळे बी केअरफूल बर्का ! Happy

Lol आत्ताच्या आत्ता बेडकाचा आवाज बंद करण्याचे फर्मान सुटल्यामुळे अजय मध्यरात्रीचे घर भर बेडूक शोधत आहेत असे दृष्य डोळ्यापुढे आले!

अबे आता बस्स करा नाहितर आज रात्री बॉस्टनमधे कुंद्या फुटतील नि उद्या चार्ल्स मधे आल्याच्या चहाचा महापूर येईल (नि त्यात गोगलगायी पोहतील) Wink

Lol सापडला एकदाचा.
अजय, मी कॉस्कोतून आणलेल्या सॉईलमध्ये फंगस नॅट्स असल्याचं नोटीस केलं आहे. (कारण बरंच पौष्टीक आहे सॉईल). पण वर असामी म्हणालाय तसं वरच्या सर्फेसवर वाळू किंवा पुमीस रॉक्सवगैरे पसरून ठेवल्यास जरा कंट्रोल होईल प्रॉब्लेम.
तसंच नीम ऑईल, अ‍ॅपल सायडर विनेगर्+डीशसोप+पाणी असं स्प्रे बॉटलमध्ये घालून फवारल्यास फरक पडेल. सॉईलमध्ये बोट घालून ड्राय आहे हे जाणवलं तरच पाणी घाला, अन्यथा नको.

Pages