अमेरिका: थंडी सुरु होण्याच्या अगोदर घरात कुंड्या आणताना तुम्ही काय काळजी घेता?

Submitted by अजय on 11 September, 2017 - 11:40

आयुष्यात दुसर्‍यांदा काहीतरी बागेत लावायचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात झणझणीत मीर्च्या लावल्या होत्या काही वर्षांपूर्वी. पण ज्या आल्या त्या काकडीसारख्या खाता येतील अशा सपक आल्या. त्याचं खापर बोस्टनच्या हवेवर फोडण्यात आलं. या वर्षी आलं लावलं, ते आलं. पण आल्याचं झाड खूप हळु वाढतं. जमीनी बाहेर कोंब यायला ५-६ आठवडे लागले. आता कुंडीत ४ आणि जमिनीमधे ६ अशी रोपटी आहेत. नेटवर बोस्टनच्या हवेत आले बाहेर जगते का नाही यावर दुमत आहे. त्यामुळे कुंडीतली घरात आणि जमिनीतली तशीच या हिवाळ्यात ठेवून प्रयोग करून पाहणार आहे. आल्याला काही झाले तरी चालेल पण घरात कुंड्याबरोबर एकही कीडा आला नाही पाहिजे असे फर्मान सुटले आहे. घरात पोर्च, सनरूम असे काही नाही. थेट वावराच्या खोल्यातच कुंड्या ठेवाव्या लागणार आहेत.

तुम्ही हिवाळ्यात घरात कुंड्या आणता तर काय काळजी घेता? कुठल्या प्रकारची किटक नाशके वापरता? इतर काही काळजी घ्यावी लागते का?

आला आला वारा च्या चालीवर

आलं आलं आलं
जेंव्हा कुणितरी गेलं
थंडीमधे कुंड्या आत
तरच ते टिकेल

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपी यांनी अर्धे बरोबर लिहिले आहे. आल्याचे झाड पेरेनियल आहे पण "वरचा भाग पेरेनियल" असे काही नाही. एक तर ते सगळे झाड एका भौगोलिक प्रदेशासाठी ,पेरेनियल असते किंवा अ‍ॅन्युअल , बायअ‍ॅन्युअल असते. झाडाचा एक भाग असे वर्गीकरण करत नाहीत.
पेरेनियल झाडाचे दोन प्रकार आहेत १) वुडी पेरेनियल : थंडीतही झाडाचे खोड, फांद्या टिकून राहतात. २) हर्बेशिअस पेरेनियल : थंडीत जमीनीच्या खालचा भाग जिवंत राहतो पण जमिनिच्यावर काही नसते.
काही झाडे एका भौगोलिक भागात पेरेनियल असू शकतात आणि दुसर्‍या भागात अ‍ॅन्युअल. पण तो या धाग्याचा विषय नाही.

मी सगळं बरोबरच लिहिले आहे पण अर्धेच ( अर्धी माहिती फक्त) लिहिले आहे.

वरचा भाग "पेरेनियलच" असतो. आणि खालचा भाग अ‍ॅन्युयल असतो. ह्याचाच अर्थ , वरचा भाग मरणार सिझन प्रमाणे पण रायझोम हा हार्वेस्ट होतो आन्युयली. हर्बेशियस पेरेनियल आहे तेच. ( मला मराठीत माहित नाही हार्वेस्ट) .
रायझोम हा वर्षाने हार्वेस्ट होतो.... म्हणून आन्युयल.

आमच्या गावी हळदीची शेती करायचे....

आलं लावलं तेंव्हा ही माहीती नव्हती. मी या ग्रूपमधे आधी लिहिल्याचे आठवत नाही . आलं जगणार की मरणार असा जन्ममरणाचा प्रश्न पडल्यावर याबद्दल माहिती काढायला सुरूवात केली.
पेरेनियल असले तरी आमच्या गावात ते नक्की जगणार का याबद्दल नक्की खात्रीशीर उत्तर अजून सापडले नाही. या थंडीनंतर कळेलच.

एखाद्या खोडाला सुप्तावस्थेत जायची खोड असेल तर त्याला जाऊ द्यावे. आले १ सप्टेंबरला बाहेरचे तापमान चांगले असतानाच झाडासकट काढून जमिनिवर वाळायला ठेवा. ते वाळले की जपून ठेवा,१मार्चला पुन्हा बाहेर कुंड्या ठेवून पाणी द्या. तोपर्यंत कुंड्या पिशवीत सिलबंद घरात ठेवा. सप्टेंबरपासून पाणी बंद केले की कुंड्यांतली माती वाळेल आणि काम सोपे होईल. ज्या किटकांना बेडकांना जायचे असेल ते कुंड्या सोडून जातील आणि १ मार्चला परत येतील.

अजय, कुंडीत लावलेले कंद बाहेर काढून जरा ड्राय करुन पुढच्या वर्षी पुन्हा लावू शकता. मी असे फुलांचे कंद पेपरमध्ये गुंडाळून ठेवले आहेत.

अजय, हार्डीनेस झोन ६ किंवा त्याहून कमी असेल तर आले आत आणा. कुंडी छान रुंद हवी, खोल नसली तरी चालेल . पॉटिग सॉईल्/मिक्स वापरा. उबदार कॉर्नर हवा पण खूप कडक ऊन नको. हार्डीनेस झोन ६ च्या वर असेल तर वरची पानं गेली तरी आल्याचे कंद जमिनीखाली नीट रहातील. हार्डीनेस झोन ५ मधे माझ्या मैत्रीणीची आई घरात आले वाढवते..

इथे तुमच्या राज्यातल्या मास्टर गार्डनरची हेल्प लाइन आहे. त्यांना फोन करुन विचारल्यास ते तुमच्या स्पेसिफिक झोन साठी अ‍ॅप्लिकेबल माहिती देतील.
http://massmastergardeners.org/what-i-do/

जर जमिनीतले कंद जमिनीतच पुढच्या स्प्रिंग पर्यंत नीट राहतील असे सांगितले तर कुंड्या सुद्धा बाह्रेरच ठेवल्या तरी चालतील. डेकवर किंवा अंगणात कुंड्या असल्या तर वर आणि बाजूने पण बर्फ साचून मुळांपाशी अतिशय लो टेम्प दीर्घ काळाकरता राहू शकते. त्यापेक्षा कुंड्या पण जमिनीतच पुरल्या तर कडेने बर्फात गाडल्या जाणार नाहीत. आणि विण्डचिल पासून पण प्रोटेक्टेड राहतील .

स्वाती Lol

अजय, लिंबं लावणार असाल तर मला सांगा. रोपं किंवा बिया काहीही पुरवू शकेन. आमच्या आधीच्या घरात एक अजब लिंबाचं झाड होतं. त्याला लेमन आणि लाईम दोन्ही यायचे . एका वर्षी लेमन जास्त आणि लाईम कमी आणि पुढच्या वर्षी उलट. त्याच्या बिया सेव करुन त्याची रोपं नवीन घरात लावलीयेत. बघू काय होते ते.
विषयांतराबद्द्ल सॉरी बर्का!

लिंबाच झाड पण थंडीत आत ठेवाव लागत का?>>> शुगोल लिंबांच्या बियांबरोबरच फिनिक्सचं वेदरपण पाठवणार असतील तर नाही Wink . ट्रॉपिकल हवामानात सिट्रस फळं चांगली येतात.

अंजली, थंडीत ब्रॅन्डी देऊन बघ लिंबाला>>> Lol आणि मग ती लिंबं बुवांनी केलेल्या मोहितोमधे घालायची (म्हणजे जरा तरी चव येईल Wink ).

धन्यवाद सायो, स्वाती२, मेधा, शुगोल
काल होम डेपोतून नवीन माती आणली. वेगळ्या कुंड्यात ती माती आणि आल्याची रोपं जुनी माती झटकून , मुळं धुवून परत लावली आहे. अनायसे रोपं जुन्या मातीतून काढलीच होती तर ज्या रोपांची वाढ होऊन आले वाढले होते ते कापून हार्वेस्ट केले. आता ५-७ दिवस पाहतो झाडं नवीन कुंड्यात जगताहेत का आणि तिथे काही किडे होतात का? किडे नाही झाले तर आत नेता येण्याची शक्यता वाढली आहे.

अजय, ती मुळं धुवून जरा वाळवून मग लावायला हवी होतीत असं वाटतंय.
माझ्याकडे काही फ्लॉवर बल्ब्ज मी गेल्या थंडीपूर्वी मातीतून काढून, जास्तीची माती झटकून पेपरमध्ये गुंडाळून ठेवले होते. या वर्षी उन्हाळ्यात ते पुन्हा कुंड्यांमध्ये लावायला काही जमलं नाही. पुढच्या वर्षी प्रयत्न करेन.

सायो,
अजून तरी नवीन कुंड्यात रोपे ठीक दिसत आहेत. घरात आणली आहेत. बघू जगतात का.

Pages