"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई रानडेचं एकतर्फी असावं. तो नारद चॅप्टर आहे, मुद्दामून खुसपटं काढतोय मुक्तासमोर.

पुढे आलेलं नाव सॉलिड, संशय होताच. शोभा एंट्री व्ह्यायचीय अजून. सर्वात वरच्या लेवलवर राजकारणी असेल का कोणी.

जबरदस्त मालिका. दिवसेंदिवस मस्त खुलतेय. अशा हव्यात सिरीयल्स, थोडक्यात गोडी.

हो

रा च्या आईने धुरतला न मागता जी बित्तंबातमी पुरवलीये, तर मला परत त्यांच्यावर संशय यायला लागलाय.
नशीब पिस्तुल व विगची माहिती नाही पुरवली.

पण मला वाटतं उत्तम केलं त्यामुळे मालिका पुढे जायला धुरतची मदत होईल. तो खोदून काढेल सर्व out of the way जाऊन. मुक्ताने खून केला हे पण त्याला कळेल पण कदाचित तो तिला पकडणार नाही.

विवेक हा चांगला क्लू आहे. धुरतला अजून कळले नाहीय की या मुलींना कोणीही नाही , त्या अनाथ आहेत. तो बिचारा त्यांचे कोणी कॉन्टॅक्ट करेल याची वाट पाहतोय. जेव्हा कळेल तेव्हा ट्यूब पेटेल.

ऑफ द रेकॉर्ड तपास करतोय तो आता, मुक्ताचा गुन्हा कळला तरी तिला अटक करणे न करणे आता तो स्वतः ठरवू शकतो.

किरण करमरकर वकील आहे हे वर लिहिलय ते खरे आहे, तो वकिली कोटात दिसतोय.

news प्रकरणानंतर चंदू दादा रागिणीला झापतील असं वाटलं होतं पण त्यांनाही अंदाज नाहिये प्रकरण किती मोठं आहे त्याचा. रागिणीने आता लवकरात लवकर त्या विग, पिस्तुल ची विल्हेवाट लावावी
वंदना गुप्तेंंनी acting मस्त केली काल..

कालचा भाग मस्त होता. कथा खूप वेगाने पुढे सरकते.. फाफटपसारा काही नाही.. प्रत्येक व्यक्ति, प्रत्येक संवाद, प्रत्येक घटना महत्वपूर्ण आहेत..
सदाला आवश्यक ती माहिती मिळाली म्हणून तो रागिणी घरी येईपर्यंत थांबत नाही.. पुढे अनाथालय मध्ये ती बाई म्हणते.. वेळेच्या आधी आलात..
रागिणी च्या आईने माहिती दिली ते बरच झालं कारण सदाला कळालं.. ह्या सर्व गोष्टी छायाने रागिणी ला सांगितल्या.. त्यामूळे कदाचित तो रागिणी ची जास्त चौकशी करणार नाही..
बायदवे रागिणी च्या आईचं मालिकेतलं नाव काय आहे?

काल रागिणीच्या आईने सदाला सगळं सांगितलं ते बरंच झालं. तो आपल्या साहेबाला सांगत असतो की सगळे फोटो एकाच आल्बममध्ये आहेत म्हणजे काही ना काही कनेक्शन असणारच, ते कनेक्शन त्याला कळलं.

सई रानडेचा एकतर्फी प्रेमाचा ट्रॅक असण्यापेक्षा मला आणखी एक शक्यता वाटतेय - आशीषला नेमक्या कोणत्या स्कँडलची माहिती कळली ते तिलाही कळलं असेल आणि तिने तेव्हा काळजीपोटी आशीषला ते उघडकीस आणण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असेल.
किंवा दुसरा मेजर टर्न-अराऊंड म्हणजे ती पण त्या स्कँडलमधली एक हस्तक असेल.

धुरतला अजून कळले नाहीय की या मुलींना कोणीही नाही , त्या अनाथ आहेत.

>>> त्या मुली अनाथ आहेत किंवा कसं हे प्रेक्षकांना तरी कुठे सांगितलंय?

पुढच्या भागात दाखवलं ना सई रानडे रागिणीला सांगते की आशिषच्या शेवटच्या प्रोजेक्ट बद्दल मला सांगायचं आहे म्हणून.

पकडलेल्या मुली मोठ्या दाखवल्या आहेत. अभयची बायको भावाला सांगताना अभय लहान मुलीशी अXX चाळे असं म्हणाली होती. अनाथालयातली मुलं आणि पकडलेल्या मुलींचे व्हिडिओ ही २ वेगळी प्रकरणं आहेत का ?

लहान म्हणजे तेरा-चौदा. पोलीस असे कोणाच्या घरात जाऊन ऊचकापाचक करू शकतात का काहीही आॅर्डर नसताना जशी काल सदा करत होता. चंदूदादा आता राला सांगतील सगळे पुरावे फेकून दे म्हणून, होपफूली.

>>>बायदवे रागिणी च्या आईचं मालिकेतलं नाव काय आहे?>>> बी एस, व्हेरी गुड क्वेशन.... बाप रे...त्यांचं नाव तर नाही ना शोभा ताई वैगेरे... अस असू नसावं अस मनापासून वाटतंय..

अरे बापरे, हे फार भयानक होईल.

रागिणी पकडली जाईल पण कि क पॉझिटीव्ह वकील असेल तर तिला निर्दोष सिध्द करेल.

वेगवेगळ्या बातम्या आपण बघत असतो, ऐकत असतो. ते एकत्र केलंय. अनाथाश्रम किंवा मध्ये गतिमंद मुलाचं पण शोषण होत होतं मध्ये पनवेलला एका आश्रमात. ठाणा बेसमेंट वेश्याव्यवसाय असं सर्व एकत्र घेऊन मालिका कथानक सादर केलंय.

रागिणी पकडली जाईल पण कि क पॉझिटीव्ह वकील असेल तर तिला निर्दोष सिध्द करेल. >> +१

मलाही हेच वाटले. अनेक मुव्हीजमध्ये हा फंडा वापरला गेला आहे. मोस्टली अमिताभने त्यात वकिलाची भूमिका केलीये. पिंक म्हणा किंवा शुटाऊट ऍट लोखंडवाला इ.

पण मुळात मी कि क ला वकिलाच्या वेशात पाहिलेच नाहीये. टायटल सॉंग मध्ये दाखवतात त्यात तो साधा कोट / ब्लेझर आहे. वकिलाचा वगैरे नाही वाटला मलातरी.

माझ्या मते रागिणी ची आई शोभा ताई नसाव्यात. नाहीतर त्यांनी मग रागिणीला अनाथालयात काम करायला कशाला सुचवलं असत ? रागिणी सगळं खणून काढणारी आहे त्यांना माहिती आहे . मग त्याच जर का शोभाताई असतील तर ती सगळे त्यांचे काळे धंदे खणून नाही का काढणार ? माझ्या मते शोभाताई सातव ची बायको असू शकते किव्वा परवा त्या इन्स्पेकटर वर डाफरत असलेल्या बाई Happy

किव्वा तो मानसोपचार तज्ञ् . त्याने स्वतःच नाव शोभाताई ठेवल असेल " कोड वर्ड " च्या स्वरूपात पण प्रत्यक्षात आहे तो बुवाच Proud

पण त्या मुली 'शोभाताई मारतात' म्हणाल्या ना. म्हणजे त्यांनी त्या बाईला पाहिलय. मग मो.आ.(पुरुष), एक बाई बनुन कसा वावरेल?
ती डाफरणार बाई शोभाताई असती तर मुलींकडुन स्वतःच नाव ऐकल्यावर दचकलेली दाखवली असती व मुलींनी तिला ही ओळखलच असतं की. पण तिचा काहीतरी संबंध आहे हे नक्की. धुरतला बोलुच देत नाहीये ती मुलींशी.
ती सरकारी कामात अडथळा आणतीये म्हणुन तो काही कारवाई करु शकत नाही का तिच्यावर? 'लवकर आलाय, बाहेर थांबा', कागद पेन देत नाही त्याला (धुरत बरोबर आलेल्या महिला पोलीस कडे असतं की कागद पेन), मुली घाबरल्यात तुम्हाला आता काही बोलऩार नाहीत, जा तुम्ही' Lol कशीही बोलतीये..
रा ची आई स्वतःच्याच मुलीचं आयुष्य ऊध्वस्त का करेल?
पण तो परवाचा संवाद 'बाबा असायला पाहिजे होते असं का म्हणतेस, आशिष ही असायला हवा होता असं म्हण' ह्यावरुन परत तिच्या आईचा संशय यायला लागलाय. शिवाय धुरतला न मागता दिलेली माहिती.

किव्वा कदाचित दोन दोन शोभाताई असतील एक बाई आणि एक पुरुष . मुलींना दिसणारी आणि मारणारी शोभाताई बाई आणि एक बुवा पण शोभा ताई या "कोडवर्ड" ने फक्त फोन वर बोलण्यापुरता वावरत असेल कन्फयुज करायला Happy

भारी चाललंय इथे! Happy
मालिकेत सस्पेन्स असूनही समजा इतके गुंते नसतील तर लेखक इथलं वाचून गरगरतील! Proud Light 1

Pages