अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - सनी लायनचे वीतभर कपडे - नाही फक्त प्रौढांसाठी.

Submitted by तुमचा अभिषेक on 2 September, 2017 - 16:29

सनी लायनचे वीतभर कपडे - नाही फक्त प्रौढांसाठी,
तर लायन द सिंहासारखे काळीज असणारया सर्वांसाठी..

फक्त वीतभर कपडे अंगावर नेसून घराबाहेर पडण्याचे धाडस कधी केले आहे का?

कधी तशी ईच्छा झाली आहे का?

जर पहिल्या प्रश्नाचे ऊत्तर "नाही" आणि दुसरयाचे "हो" असेल, तर आता तुमची प्रतिक्षा संपली आहे.

डाल डाल पे बेबी डॉल आता घेऊन येत आहेत फक्त एका काडेपेटीत मावणारे अंगभर कपडे.

दचकलात!

पण हे खरे आहे. काडेपेटी उघडून अंतर्वस्त्रासमान भासणारया त्या कपड्यांकडे पाहून दचकू नका.

हे घालून आपण चारचौघात गेलो तर आपली लाज नाही का जाणार या विचारांनी गचकू नका.

फक्त एवढेच करा. एखाद्या 'सनी डे' ला हे कपडे आपल्या अंगावर योग्य जागी जमेल तसे नेसा आणि सुर्यप्रकाशात जाऊन उभे राहा. बघता बघता तुमच्या अंगावरच कपडे वाढू लागतील आणि तुमची लाज लज्जा सारे काही झाकून टाकतील.

हबकलात !

पण हे खरे आहे.

आधुनिक विज्ञान आणि प्राचीन ग्रंथांतील ज्ञान वापरून आता हे शक्य झाले आहे.

हे कपडे परीधान करून सूर्यप्रकाशात जाताच या कपड्यांमधील वनस्पती पेशी सुर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करत भरभर वाढू लागतात आणि तुमच्या अंगभर पसरू लागतात. बघता बघता पापणी लवते न लवते तोच तुमचे वीतभर झाकलेले शरीर संपुर्ण वस्त्राच्छादित होऊन जाते.

जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी परततात तेव्हा सुर्याचे शेवटचे किरण पृथ्वीतलावरून गायब होताच हळूहळू संथपणे कपडे आपल्या पूर्व आकारावर येऊ लागतात. आणि तुम्हाला घरी पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ देतात.

कपडे छोटे होतानाच स्वत:हून त्यावर जमलेली दिवसभराची धूळ माती झटकून टाकतात. ज्यामुळे तुम्हाला कपडे न धुता, न सुकवता, न झटकता, न ईस्त्री करता आणि हो हो अगदी न घडी करता वाटेल तसे काडेपेटीत कोंबून ठेवता येतात. हॉस्टेलवर राहणारया मुलांसाठी तर ही पर्वणीच आहे. गृहीणींसाठी तर हे वरदानच आहे.

याची ईतर काही वैशिष्ट्ये :-

1) सनी लायनचे वीतभर कपडे वनस्पतीपेशींपासून बनवलेले असल्याने दिवसभर तुमच्या आसपासचा कार्बन डाय ऑक्साईड खेचत राहतात. आणि तुम्हाला ऑक्सिजन पुरवत राहतात. जेणेकरून तुम्ही राहतात सदैव फ्रेश आणि तजेलदार.

2) सनी लायनचे वीतभर कपडे तुमच्या शरीराच्या मापानेच वाढत असल्याने फिटींगचा प्रश्नच उद्भवत नाही. वाढत्या वयाच्या मुलांच्या पालकांची चिंता आता संपली आहे.

3) दहा बारा दिवसांच्या लांबच्या प्रवासाला जाताना आता सूटकेस न्यायची गरज नाही. फक्त रात्रीची सोय म्हणून नाईट सूट नेल्यास उरलेले दिवसा घालायचे सारे वीतभर कपडे एका पर्समध्ये भरता येतील.

4) पोपटी रंगाच्या दहा विविध छटांमध्ये उपलब्ध.
तुमच्या वीतेच्या आकारानुसार 4 ईंच ते 14 ईंच आकारांमध्ये ऊपलब्ध

5) स्त्री-पुरुष सर्वांसाठी एकच काडेपेटी असल्याने हे सनी लायनचे वीतभर कपडे वस्त्रोद्योग आणि भारतीय संस्कृतीच्या ईतिहासातील पहिलेच लिंगनिरपेक्ष वस्त्र ठरणार आहे.

**खुशखबर**
चंद्रप्रकाशातही वाढू लागतील असे कपडे बनवण्यासाठी आमच्या अतरंगी शास्त्रज्ञांचे सतरंगी संशोधन चालू आहे.

पण तो पर्यंत ....

***वैधानिक ईशारा -

सातच्या आत या घरात,
नाहीतर निघेल तुमची वरात !

Sunnylion@nopornplease.com

अधिक माहितीसाठी "सनी लायन वीतभर कपडे" असे टाकून गूगल करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या गरीब बिचारया सिंड्रेलाकडे कसले आलेत स्वत:चे काचेचे शूज..
बहुधा बॉडी कनेक्शन सेटींग असावी.. जे अंगावर होते ते बदलले, जे पायातून निसटले ते तसेच राहिले.

असो, फार अवांतर नको.
तरी जोपर्यंत आपण परीकथांवर बोलतोय तोपर्यण्त धागाकर्त्याला हरकत नसावी Happy

बाकी, या चर्चेच्या निमित्ताने स्त्रियांच्या पायांची सर्वसाधारण साईज समजली. आता या माहितीचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करतोय..

बाकी, या चर्चेच्या निमित्ताने स्त्रियांच्या पायांची सर्वसाधारण साईज समजली. आता या माहितीचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करतोय..
>>> शु फॅक्टरी काढताय की काय..

नाही हो.. गर्लफ्रेंडचा बड्डे जवळ येतोय. नेहमीसारखे तिला ब्रांडेड घड्याळ, हिरयाची अंगठी, सोन्याची चैन देण्यापेक्षा सरप्राईज सॅण्डल स्वस्त पडतील असा विचार करत.... श्या.. शेवटी धाग्यात गर्लफ्रेंड आणायला लावलीच तुम्ही मला Sad

ओ रीया मॅडम असे एखादे नेमके वाक्य कोट करून ईतके जबडाफाड हास्य करू नका ओ.. लोकं तुमच्या हसण्याचे चार अर्थ काढतील आणि तिघांचे गैरसमज दूर करता माझ्या नाकी नव्याण्णव येतील Sad

ओह हे गणपतीस्पर्धेचे प्रशस्तीपत्रक आले नंतर .. आता दिवाळीनंतर पाहिले .. Happy .. धन्यवाद संयोजक, मत देणारे, प्रतिसाद देणारे, वाचणारे, अभिनंदन करणारे .. आणि सगळेच Happy

Pages