संपदा- ज्युनिअर मास्टर शेफ- पास्ता सॅलड- मैत्रेयी- वय १३ वर्षे

Submitted by संपदा on 1 September, 2017 - 10:35

गणेशोत्सव आला की मायबोलीचे उपक्रम जाहीर होतात हे आमच्या पाल्याला आता व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे लगेचच विचारणा झाली आणि सॅलड आवडत असल्याने ह्या पाककृतीवर पटकन एकमत झाले. मूळ कृती जेमी ऑलिव्हरची आहे. त्यात थोडे फेरफार करून आमच्या घरी हे सॅलड नेहमीच बनत असते. आज मैत्रेयीने ते बनवले आहे. फोटो काढून इथे अपलोड करण्याचे आणि सर्व स्टेप्स लिहिण्याचा आग्रह केल्याने पूर्ण पाककृती लिहिण्याचे काम मी केले आहे Happy

लागणारा वेळ- १/२ तास

लागणारे जिन्नस-
१. राईस शेप्ड पास्ता
२. टोमॅटो, मला काल बेबी टोमॅटोज मिळाल्याने ते घातले आहेत. साधे टोमॅटो घालायचे असल्यास आतील बिया काढून छोटे तुकडे करून घ्यावेत.
३. बेल पेपर्स ( हव्या त्या रंगात) छोटे तुकडे करून
४. मक्याचे दाणे, इथे वापरलेले कॅन्ड आहेत, फ्रेश वापरायचे असल्यास थोडे वाफवून घ्यावेत.
५. काकडी, बारीक चिरून
६. फेटा चीज, छोटे क्यूब्सच विकत आणले होते, तुकडे करून सुद्धा वापरता येतील.

सॅलड ड्रेसिंगसाठी-
१. १ लसूण पाकळी, मोठी असल्यास १ पुरते, लहान असल्यास २-३ चालतील.
२. राईस व्हिनेगर, साधे व्हिनेगरसुद्धा चालेल- १टी.स्पून
३. ऑलिव्ह ऑईल- ३टी स्पून.
४. मीठ
५. मिरेपूड

क्रमवार पाककृती-
१. भरपूर पाण्यात पास्ता उकळून घ्यावा, पास्ता शिजत आला की त्यात लसूण पाकळी घालून शिजवावी.
२. पास्ता ड्रेन करून त्यावर थोडे ऑईल घालून ठेवावे.
३. सर्व भाज्या कापून घ्याव्यात.
४. एका खलबत्त्यात लसूण, व्हिनेगर, ऑलिव्ह ऑईल, मीठ, मिरेपूड घालून एकसंध सॅलड ड्रेसिंग बनवून घ्यावे.
५. पास्त्यात भाज्या आणि सॅलड ड्रेसिंग घालून सर्व करावे.
६. हे सॅलड थंड सुद्धा छान लागते.

अधिक टीपा- इटालियन हर्ब्स आवडीनुसार वापरता येतील, इथे वापरलेले नाहीत.

DSC_0972.JPGDSC_0980.JPGDSC_0996.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद!
सर्व्ह करण्यासाठी चिकोरी नावाच्या सॅलडचे पान वापरले आहे. चिकोरी असे दिसते, त्याची एक एक पाने काढता येतात आणि ती पाने बर्‍यापैकी कडक असतात. सॅलड त्या पानासकटच खायचे Happy , फिंगरफूड म्हणून.
Chicoree.jpg