ज्युनियर मास्टरशेफ - झटपट ब्रेडची रसमलाई- श्रावणी - वय ११ वर्षे.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2017 - 15:11

आई आणि किचन हे समिकरण श्रावणीला समजू लागल्यापासून कळू लागल होत. आईची जागेपणीची जास्तीत जास्त सोबत किचन मधेच. बाळ असताना जेवण करताना घरातली चमचे, वाटी, बशी देउन किचन मधेच खेळात गुंग असलेल बाळ कधी आईच अनुकरण करू लागल ते कळलही नाही. खेळण्यातल्या चपात्या करता करता आई शेवटची चपाती मी करते अस करत करत श्रावणी आता बरेचसे खाद्य पदार्थ बनवू लागली आहे. चहा, गरज पडल्यास वरण-भात , पिझ्झा, ऑमलेट, कांदेपोहे, बिस्कीट केक, सॅडविच असे अनेक पदार्थ त्ती बनवतेच पण आता यूट्युबवरच्या तिला झेपतील अशा पाकक्रियेच्या विविध रेसिपीजही ती ट्राय करते. बनवलेले पदार्थ बहुतांशी चविष्टच असतात. खालची रेसिपीही तिने यू ट्युबचा आधार घेउन केली आहे.

साहित्यः
अर्धा लिटर दूध
अर्धा वाटी किंवा आवडीनुसार कमी जास्त साखर
थोडे ड्राय फ्रुट्स
१ चमचा दूधाचा मसाला किंवा केसर, वेलची पावडर
ब्रेड (तिने पुरी कापतो तसे धारदार वाटीच्या सहाय्याने ब्रेड गोल कापून घेतले)

कृती
प्रथम दूध थोडे आटवा. त्यात साखर व ड्रायफ्रुट घालून अजून थोडे उकळा.

दूध गार करा. साधारण झाल्यावर थोडावेळ फ्रिज मधे ठेवा.

सर्विंग डिश मधे ब्रेड लावून घ्या. त्यावर आटवलेले दूधाचे मिश्रण ओता.

तयार आहे झटपट ब्रेड रसमलाई. चव अप्रतिम लागते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे व्वा. कित्ती सुंदर दिसतीये डिश.
चवीलाही छानच असेल.
शाब्बास श्रावणी.
Like mother like daughter..great!

वा! श्रावणी ,सुगरण आईची लेक शोभतेस खरी.>>>>+१

जागू,लेकीला सांग की ब्रेडचे तुकडे साजूक तुपत तळून घेतले तर शाही तुकडा नामक स्वीट डिश तयार झाली.अर्थात ती लहान आहे अजून

श्रावणी आईच्या पावलावर पाऊल टाकून चालणार हे निश्चित. तिच्या ह्या आधीच्याही काही रेसिपीज पाहिल्यात.

मस्त रेसिपी. नक्की करून पाहणार.

वा मस्त . शाब्बास श्रावणी . काय सुंदर दिसतेय .
सुगरण पणात माँ से बेटी सवाई होणार हे निश्चित.

या रेसीपीला 'शाही तुकडा' असे नाव आहे, खुप मस्त लागत खाताना. यात ब्रेड थोडा तळून अथवा भाजून घेतल्यास अजून जास्त छान चव येते.

नाही....ही रसमलाईच आहे. शाही टुकडा मधे ब्रेड तळलेली असते व (खूपदाच) चिवट होऊन चांगली लागत नाही.
यात ती मऊ होऊन दुधात विरघळून जाईल व अगदीच रसमलाई प्रमाणे लागेल (असे वाटते!) Happy

मस्त जमलीये. फोटो पण मस्त. शाही टुकडा थोडा मॉडिफाय केलाय. तळून घेतलेला नाही त्यामुळे कदाचीत जास्ती आवडेल मला Wink

Pages