उपवासाची टनाटण साबू वस्त्रे !

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 September, 2017 - 17:10

उपवासाची टनाटण साबू वस्त्रे !

बाबू आणि बाबांसाठी,
साबू आणि साबांसाठी,
उपवासाची टनाटण साबू वस्त्रे !

आता सणासुदीला तामसी वस्त्रांना दूर सारा.
जनावरांच्या चामड्यापासून बनवलेली आभूषणे आणि रेशमाच्या किड्याची पिळवणूक करत बनवलेली वस्त्रे OLX वर विकून या.
आणि बदल्यात मिळवा,
हिमालयीन गंगेच्या पात्रात चोवीस तास भिजत ठेवलेल्या साबुदाण्यापासून बनवलेली पांढरी शुभ्र सोवळी साबू वस्त्रे !

दाणे दाणे पे लिखा है, पहनने वाले का नाम !
आता चमचमणार्‍या तीन रंगात उपलब्ध.
सिल्व्हर व्हाईट ! गोल्डन व्हाईट ! मोती व्हाईट !
बोले तो, आतून सात्विक बाहेरून हृतिक !

थरथराट, धडाकेबाज आणि दे दणादण
साबुदाणे उडाले टनाटण !
महेऽऽश महेऽऽश
रमेश सुरेश
जो पहने पवित्र हो जाये
- टनाटण पट अंजली यांच्या सौजन्याने

बाई वाड्यावर या !!
बाई साबू वस्त्रे घालून आल्या
आणि निळ्याचा वाल्मिकी झाला !!

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.maayboli.com/node/63626
तमिताभ ऊंचे लोग उंची पसंदच्या तीन पावडरी ऑर्डर करा.
आणि सोबत मिळवा तीन टनाटण साबू हातरुमाल फ्री फ्री फ्री !!!

तनाची ऊंची वाढवलीत, आता मनाची ऊंची वाढवा.
शुभरात्री !!!

________________________________
Not for sale स्पर्धेसाठी नाही Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे. Lol
स्पर्धेसाठी का नाही?

अगागा
साबुदाणा भिजला की त्याचे भुसकट निघायला चालु होते हो हळूहळू.
कपडे हे मार्जिन लक्षात घेउन बनवलेत ना? Happy

स्पर्धेसाठी का नाही?
चांगला प्रश्न..
माझ्या सई स्वप्निल शाखा वर अन्याय कसा करू..
किंबहुना तोच धागा वर काढायला काहीतरी केले पाहिजे असा विचार काल करत होतो.. तर हे ऑफर प्रॉडक्टची कल्पना सुचली.. आणि फारसा लोड न घेता भरभर लिहून काढली.. बाकी हे पण कोणाला आवडले तर तो बोनस.. याचेही मत मला तिथेच द्या. आणि एका प्रॉडक्टवर दुसरे फ्री मिळवा Wink

साबुदाणा भिजला की त्याचे भुसकट निघायला चालु होते हो हळूहळू.
कपडे हे मार्जिन लक्षात घेउन बनवलेत ना?
>>>>

हायला टेक्निकल शंका.... एका ईंजिनीअरवर?
स्टील मेंबर आम्ही corrosion allowance घेऊन डिजाईन करतो. 50-50 yrs design life period साठी.. तर हे सणासुदीचे आणि वार पाळून घालायचे कपडे त्या हिशोबात बनवणे काही कठीण नाही आम्हाला.

आणि डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ साबूदाणा! जेव्हा तुम्ही दिवसभर दुसरे काही खात नाही तेव्हा तुम्हाला काम करायची ताकद देतो साबुदाणा. मग विचार करा त्यात स्वत:त किती ताकद असेल Happy