Submitted by अनन्त्_यात्री on 4 September, 2017 - 01:55
मी शोधात आहे अशा कवितेच्या,
तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे,
असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात
हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता
जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव –
हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा,
थंड दुधारी कट्यारी इतका
खराखुरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा वा
वा वा
अनंतजी सुंदर !
अनंतजी सुंदर !
अजून एक नवा दृष्टीकोण !
Pl. take it easy - Joint venture करुया !
मलाही रंगहीन, बंधमुक्त कविता हवीय !
वावा सुंदर!
वावा सुंदर!
तुम्हाला हवी असलेली कविता तुमच्याकडूनच बनेल अशी आशा आहे शुभेच्छा
बेफिकीर, आपल्या
बेफिकीर, आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!
दत्तात्रयजी, आपल्या
दत्तात्रयजी, आपल्या सहसंवेदनेबद्दल आभार!
बघूया, माझा शोध मला कुठे नेतो ! Joint venture करायला मी तयार आहे
अक्षय,प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अक्षय,प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मुक्त-छंदातल्या कवितांना मायबोलीवर फार कमी वेळा प्रतिसाद मिळतो.
वाह्!! हुलकावण्या देईल ती, पण
वाह्!!
हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता
जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव >>>
शुभेच्छा!!!
कवितांना मायबोलीवर फार कमी
कवितांना मायबोलीवर फार कमी वेळा प्रतिसाद मिळतो. >>>
न येई जादा प्रतिसाद येथे
लिहीणे आम्ही सोडत नाही
असेल गुणगुणण्याजोगे जेथे
कविता आमच्या सांडत राही
राहुल, शुभेच्छांबद्दल आभार !
राहुल, शुभेच्छांबद्दल आभार !
प्रतिसादाबद्दलचा प्रतिसाद
राहुल सुंदर प्रतिसाद !
राहुल सुंदर प्रतिसाद !