राख होते जाळता

Submitted by शिवाजी उमाजी on 28 August, 2017 - 07:31

राख होते जाळता

वाटली खैरात त्याने चूक का
घेतले खेचून ते ही मूक का

जिंदगी होता जराशी मोकळी
संचयाची रे तुला ती भूक का

घेतला जो हात तुझा मी हाती
भावना झाली अशी नाजूक का

जिंकता तो डाव एखादा जरी
बोलतो कोणी तरी हे फ्लूक का

सोड रे मानापमाना माणसा
राख होते जाळता ठाऊक का

©शिवाजी सांगळे,
मो.+91 9545976589
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29378/new/#new

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद मि. पंडित,
तशी निखिल यांची सुचना योग्य होती, काही चुकां दुरूस्त करून सदरची गझल मी नव्यानं पोस्ट केली आहे.