अंदाज आरश्यांचा वाटे खरा असावा माझ्याच यातनांचा तो चेहरा असावा

Submitted by निखिल झिंगाडे on 25 August, 2017 - 00:54

अंदाज आरश्यांचा वाटे खरा असावा
माझ्याच यातनांचा तो चेहरा असावा

वेडात भावनांच्या का तो वहावलेला
तो यार दिलदार माझा बावरा असावा

आवेग आसवांचा डोळ्यात दाटला हा
जोरात कोसळे जेथे आसरा असावा

आघात बातमीचा माझ्या मनात झाला
आवाज सांगतानाही कापरा असावा

रागात बोललो मी लोकात भांडलो मी
हृदयात वेदनेचा तोच निचरा असावा

बोलावयास आलो होतो जुनेच काही
बोलून गेलो शब्द माझा बोचरा असावा

Group content visibility: 
Use group defaults

गझल हे साहित्य चोरी होऊ शकत नाही कृत्रिम बुद्धिमान आपण पूर्ण वाचले का? मी आताच ऐकली आणि पूर्ण वेगळी आहे

आवडली.

रागात बोललो मी लोकात भांडलो मी
हृदयात वेदनेचा तोच निचरा असावा
+१

त्या युटुब लिंकवर (लिखित) गझल दिली आहे.
खरे खोटे मला माहिती नाही व ते करायचे ही नाही.
ही निखिल यांची कवीता / गझल मात्र मला आवडली.

एकाच वस्तु, व्यक्ती किंवा घटनेवरुन प्रेरीत झालेल्या कलाकॄती या एकसारख्या दिसणा-या-वाटणाया असु शकतात. त्याल थेट चोरीच म्हणने अति व असभ्य आहे.
आधी या लेखकाशी / कवीशी बोलुन खात्री करुन घ्यायला हवी होती थेट आरोप करण्या आगोदर.
काही सिद्ध होण्याआधीच असे कुणाचे खच्चीकरण करु नये.

गझल छानच आहे.
लिखाणात प्रतिके सारखी येवु शकतात.
वाद नसावा, चर्चा व्हावी.

गझल आवडली.
प्रतिभा चोरली जाऊ शकत नाही. रचनेत सारखेपणा येऊही शकतो आधी कुठलाही संबंध नसताना.