अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक कपडे- मॅगी

Submitted by मॅगी on 26 August, 2017 - 08:53

भारतात प्रथमच!   प्रथमच!   प्रथमच!

2017-08-26-19-53-50-370-800x800.jpg

जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर 'मिस लवंगलतिका' आणि 'कर्माचीफळे रसशाळा' खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत सुंदर नैसर्गिक रंग वापरलेले, ऍलर्जी प्रतिबंधक, शीत ते उष्ण सर्व प्रकृतीसमावेशक, मधु-तीक्ष्ण चवीचे, भूक लागली असता वेळेला केळे ठरणारे 'वनंजली आयुर वेअर'!

दुष्यंत : प्रियेss शकुंतलेss कुठे हरवली आहेस तू.. मज पामराला त्वरित दर्शन दे प्रिये..

कमला दासी: राजन, देवी शकुंतला तर वनंजली जीन्स घेण्यासाठी आपण दिलेले क्रेडिट कार्ड घेऊन गेल्या आहेत. केळीच्या सोपटापासून बनवलेली ती सुंदर शुभ्र जीन्स देवीच्या मनात केव्हाची भरली होती आणि काल तो अनंतमुळापासून बनवलेला बँडेज ड्रेस देवींना फार आवडला. त्यातच आज गणेशोत्सवानिमित्त 50% ऑफ सेल लागल्यामुळे देवी त्यांच्या प्रिय सखीसह 'चीप थ्रील्स' गाणे गुणगुणत खुशीत तत्वमसी मॉल लुटूनच येणार आहेत, असे म्हणाल्या.

दुष्यंत : काय सांगतेस कमला! माझ्याही शॉपिंग लिस्टवर वनंजलीचे दालचिनी जॅकेट होतेच, हा मी निघालो खरेदीला लगेहाथ ते लवंग-मिरी स्टड्स घेऊन शकुंतलेला गिफ्ट करतो. वनंजली कपड्यांबरोबर ऍक्सेसरीजही आहेत बरं का!

शाकाहारी, वेगन आणि इतर सर्व लोकहो ऐका, वाचवू नका पैका! सायकल हाणा आणि सेल संपण्यापूर्वी वनंजलीच आणा!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूक लागल्यावर कपडेच खायचे.. जान प्यारी है या ईज्जत.. Proud

जुन्या काळी आदिवासी लोकांमध्ये पानांची नाहीतर हाडांची अंतर्वस्त्रे असायची ते आठवले. खरे तर त्याला अंतर्वस्त्रे बोलू नये, कारण त्याबाहेर काही नसायचेच Happy

मॅगे..हाहाहा Proud

जुन्या काळी आदिवासी लोकांमध्ये पानांची नाहीतर हाडांची अंतर्वस्त्रे असायची ते आठवले.>> कुठं वाचलस तू हे?

Pages