'टिनिटस' वर काही उपाय आहे का?

Submitted by हर्षल_चव्हाण on 22 August, 2017 - 20:32

मला गेल्या काही महिन्यांपासून उजव्या कानात आवाज येण्यास सुरूवात झाली आहे. घूंsssss असा आवाज येतो, ते ही फक्त कानात हवा ब्लॉक असेल तर. नाक दाबून कान मोकळे केले की बरं वाटतं, पण नंतर पुन्हा तसा त्रास होतो. कधी कधी झोप नीट झाली नसेल तर हा त्रास जास्त जाणवतो, आणि एरव्ही सुद्धा थोड्या-बहूत प्रमाणात होतोच आहे. या आधी कधीच झालं नव्हतं असं. इथे हिवाळा सुरू झाला आणि हा त्रास सुद्धा. पण मागच्या दोन हिवाळ्यात असं काहीच झालं नव्हतं. डॉक्टरांनी सुद्धा केवळ थंडीमुळेच असेल असं सांगितलं. ते काही अजून बरं होत नाहिये...
इथे कुणाला असं काही झालंय का, किंवा बरं होण्यासाठी काही (घरगुती) उपाय आहेत का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही, टिनिटस वर 'ठोस' उपाय काही नाही (माझ्या अल्प माहितीनुसार). पण तरीही, ध्यान, प्राणायाम, मनावरील ताण कमी करणे याचा उप्योग होऊ शकतो.

इकडे काही लोकांनी अनुभव लिहिले आहेत. ते व्हर्टिगो बाबत आहेत, तरीही वाचून पहा.
https://www.maayboli.com/node/63464

पुण्यात असलेले तज्ञ डॉ सुचवा प्लीज कोणाला माहीती असतील तर. इत्के दिवस जाणवले नाही पण आता खुप जास्त आवाज येतोय. दाव्या कानातुन.