आमच मिनी अभयारण्य

Submitted by कविता९८ on 11 August, 2017 - 10:25

आमच्या परिसराच नाव अशोकवन.
आणि खरच एखाद्या वनासारख इथे बरीच हिरवळ आहे.
आमच्याकडे रोज सकाळी बरोबर 5.30 वाजता कावळ्यांची हजेरी असते,एका पध्दतीने आमचा गजरच आहेत ते..
बर्याच वेळा घरी येऊन ताटात सुध्दा खातात.
आता फक्त कावळेच नाही तर खारूताई,चिऊताई,पोपट,बुलबुल,मैना असे बरेच पक्षी येतात.
एकदा तर बिल्डींग च्या समोरच्या झाडावर माकड होत.मार्गशीष महिना असल्याने घरात बरीच केळी
होती. सहजच खिडकीवर केळ ठेवलं तर हे साहेब कधी तिथून उतरून कधी आमच्या खिडकीवर आले समजल नाही.
पप्पांना ससुनवघरला ऑन ड्युटी असताना जखमी कासव मिळालेल पप्पा ते घरी घेऊन आले.नंतर ते आम्ही एका संस्थेला दिले आणि त्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला सुखरूप जंगलात सोडलं.खर सांगायचं तर मुड ऑफ असला की त्याच वेळी जर हे सर्वजण असतील तर आपोआप बरं वाटतं.
त्यांना कदाचित आमची भाषा समजते कारण ते ओरडत असतील आणि त्यांना शांत बसा बोलले तर ते गप्प बसतात.
दूध आणि ब्रेड तर या काऊंच आवडतं.जर यांना नाश्ता,दुपारच जेवण द्यायला जरा उशीर झाला तर सरळ वाटी खाली फेकून देतात.
(रागाच्या बाबतीत अगदी माझ्यावर गेले आहेत.)

एक सवय लागली आहे यांची,
रोज न चुकता आमच्याकडे येणारे हे पाहुणे आता हवेहवेसे वाटतात.

तुम्ही पण gallery मध्ये पक्ष्यांसाठी पाणी , दाणे ठेवत जा.
(आम्ही भात ठेवतो,त्यात डाळ भात तर असतोच शिवाय मालवणी कढी वगैरे मिक्स केलेला भात पण असतो.)

IMG_20161125_100625_HDR_1480048860570_1502459927636.jpgIMG_20170529_112656_HDR_1502459869496.jpgIMG_20170501_092054_HDR_1502459884093.jpgIMG_20170623_083716_HDR_1502459842685.jpgIMG_20170614_171908_HDR_1502461324100_0.jpgIMG_20170411_085643_HDR_1502461349101.jpg20170609_212405-BlendCollage.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

निरु, कावळ्याचे वाचून तुमच्या घरात येणार्‍या कावळ्याची आठवण झाली होतीच.

बाकी कावळ्याचे मला अजिबात कौतुक नाही.अवचित कधीतरी डोळा लागलाच तर त्याच्या आवाजाने वैताग येतो.काव कावच्या मधे कर्र्र्र्र्र्र्र्रेर्र्र्र्र्र्र्र्र असा आवाजाला धार लावल्यासारखा तो ओरडतो, त्याचा जास्त कंटाळा येतो.

काय भारी..कालच पु ल देशपांडेंची माझे शेजारी हि चित्रफित तूनळीवर पाहिली आणि आज हा धागा..मस्तच कऊ..
कावळ्याला बघुन मलापन निरुंच्या घरात येत असलेल्या कावळोबाची आठवण झालेली Lol

छान संग्रह.
नशिबवान आहेस कऊ!!!
असे सोबती असणं खरंच भाग्यशाली. Happy

खूप छान लिहिलयं,
भाग्यवान आहेस यासर्वांच्या सानिध्यात राहतेस... Happy
पु.ले.शु. Happy

Pages