" मला काहीच प्रॉब्लेम नाही " हाच तर खरा प्रॉब्लेम आहे

Submitted by सुजा on 17 August, 2017 - 01:17

काल " मला काहीच प्रॉब्लेम नाही " बघितला . सिनेमा अजिबातच समजला नाही हाच आम्हाला प्रॉब्लेम झाला. नायक नायिका दोघंही आईवडिंलाच्या मनाविरुद्ध जाऊन कोर्टात लग्न करतात. दोन्ही पालकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात पण समजाऊ शकत नाहीत. मग काय लग्न करतात आणि स्वतःच घरकुल उभारतात . कष्ट चालूच असतात आणि काहीतरी बिनसतं अस नायिकेला जाणवत पण ते काय आहे ते प्रेक्षकांना समजतच नाही कारण काही प्रॉब्लेमच दाखवला नाहीये . बिनसण्याकरता काय प्रॉब्लेम असतो तो सशक्तपणे अधोरेखितच होत नाही . सगळं वरवरचं वाटत राहत. नायक सरळ मार्गी आहे . तो ऑफिस मध्ये काही अफरातफर/झोलझाल करत नाही . त्याच कुणाशी लफडं नाही. तो नायिकेच्या कह्यात राहून वागतो कारण त्याला त्याच मतच मांडता येत नसत. त्यांच्या मुलाला काही प्रॉब्लेम नाही. त्यांचा मुलगा नॉर्मल आहे. मुलाला काही आजार नाहीये . नायक नायिकेला काही आजार नाही. नायिकेचं पण सगळं नीट चालू आहे . सगळं व्यवस्थित आहे . मग प्रॉब्लेम तरी काय आहे ? तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये हाच प्रॉब्लेम आहे. काहीही प्रॉब्लेम नसताना नात्यांमधली दरी वाढतेय हि वन लाईन स्टोरी असावी बहुतेक पण ती कुठेच नीट फुलत नाही

सिनेमाचा रिव्ह्यू चांगला आलाय. कलाकार चांगले आहेत म्हणून बघायला गेलो. कलाकारांचा अभिनय नेहमीप्रमाणे चांगला . दिग्दर्शकही समीर विद्वांस सारखा चांगला निवडलाय . पण कथानक ? कथानक असं काही आहे का ? काही तरी संदिग्ध वरवरचं. प्रसंग पण नीट उभे करू शकले नाहीत . त्यामुळेच संवाद लिहिणार्याची पण गोची झालेय. काय लिहायचे तरी काय संवाद ?.संवाद कौस्तुभ जयंत सावरकरांचे आहेत . . स्टोरी एक लाईन मध्ये आहे . स्टोरी निर्मात्याचीच आहे . काही स्टोरीच नाही म्हणून तोच स्वतः निर्माता झाला बहुतेक . पैसे आहेत त्याच्याकडे पण कथानक ? सगळे प्रसंग ओढून ताणून आणलेले . बोअर झालं.

कलाकार – गश्मीर महाजनी, स्पृहा जोशी, निर्मिती सावंत, विजय निकम, सतीश आळेकर, मंगला केंकरे, कमलेश सावंत, विनोद लव्हेकर, सीमा देशमुख, साहिल कोपर्डे, स्नेहलता वसईकर.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोघं आपापल्या कामात व्यस्त होतात आणि एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत हा प्राॅब्लेम आहे बहुतेक. मी बघितला नाही पण परिक्षणात म्हटलय की मध्यंतरानंतर देवदेवस्की, गंडेदोरे असंं काहीतरी दाखवलय आणि त्यामुळे गंडलाय. गश्मीरचं काम छान आहे असं वाचलं. मला शीर्षकच आवडलं नाही. एकतर मराठी तरी ठेवा नाहीतर इंग्रजी तरी.

हो ना. सगळ्यात कमाल तर भेटली तू पुन्हा. एवढे मोठे मोठे कलाकार असून कोणालाही व्याकरणातली चूक कळू नये. किती विचित्र वाटतं ते एेेकायला.

एखाद वाक्यच्या वाक्य सिनेमाच नाव म्हणून ठेवण्याचा ट्रेंड आलाय आजकाल . . हो गश्मीर चांगलं काम करतो . मला तो कायमच आवडतो . काम चांगलं करतो, दिसतो छान , नाचतो पण छान . हिरो होण्याकरता जे काहीच आवश्यक आहे ते सगळं आहे त्याच्या मध्ये पण नशीब नाही . जास्त सिनेमे पण नाहीत त्याच्या गाठीला Happy

नाव बघुनच पिच्चर बघु नये अस वाटल...
भेटलू तू पुन्हा बघीतला आणि का वेळ अन पैसा वाया घालवला असं झालं..
ढापाढापी तरी किती असावी पिच्चर मधे..वाईट्ट होता..
पुजा सावंतला अभिनय जमत नाही..उगा जब वी मेट करण्याच्या नादात सगळ घालवून टाकलय

काहीही प्रॉब्लेम नसताना नात्यांमधली दरी वाढतेय हि वन लाईन स्टोरी असावी
>>>>>

कठीण स्टोरीलाईन आहे. असे चित्रपट बनवणे अवघड असते. काहीच न दाखवता काहीतरी घडतेय असे भासवणे. फक्त राजश्रीला जमू शकते.

इतके धडाधड मराठी सिनेमे येण्याचं कारण काय? अनुदानं स्वस्तं झालीयेत का?
त्यातले किती चालतात व किती पहिल्याच आठवड्यात श्वास सोडतात ते महत्वाचं.....

इतके धडाधड मराठी सिनेमे येण्याचं कारण काय? >> सैराट असावं. बरेच अमराठी निर्माते पण सरसावले आहेत आणि मराठी असूनही जे मराठी कडे आधी लक्ष देत नव्हते ते पण . सगळे एकदम आले मराठी सिनेमे घेऊन Happy

मला गाणी आवडली ह्या चित्रपटाची.मी पण प्रीव्ह्यु मधे काय प्रोब्लेम असेल हे शोधत होते. जर प्रोब्लेम काहीच नसेल तर चित्रपट पाहुन काय उपयोग अस वाटतय आता ???
गश्मीर साथी टी.व्ही वर आला की पाहिन.

मी स्पृहा चा पंखा आहे. तिच्यासाठी बघणार होतो सिनेमा.. पण प्रमोशन चा अतिरेक झाला. रोज रोज तेच तेच वाचून / ऐकून उत्सुकता निघून गेली सगळी. हे एवढं प्रमोशन करतात तेव्हा मुदलात सिनेमात दम नसतो असंच वाटतं मला. चांगलं कथानक असलेला सिनेमा नुसत्या ट्रेलर वर सुद्धा भरपूर उत्सुकता निर्माण करतो. पण अती मारा होतोय हल्ली. महिनोन्महिने नुसतं प्रमोशनच करत असतात हे लोक आणि मग तो फुसका बार निघतो! ( उदा: जब हॅरी मेट सेजल, के जो चे बरेच चित्रपट ).
हा चित्रपट टी व्ही वर लागेल किंवा यु ट्युब वर येईल तेव्हा बघितला तरी काही प्रॉब्लेम नाही असं दिसतय.

चौरा, फेसबुकवर लोकांनी आपापल्या मित्रमैत्रिणींचं हे आवडत नाही, ते आवडत नाही हे सांगत ह्या पिक्चरच्या टायटल्सचे हॅशटॅग्ज द्यायला सुरुवात केली तेच अति झालं आणि हसू आलं झालं.