तू, मी आणि बेड्या

Submitted by स्वप्नील on 13 August, 2017 - 12:51

तू होतीस, मी होतो
रात्र होती, एकांत होता

मनात वादळ होतं
तप्त देह होता
पण...
समाज बंधनांचं सावट होतं

तुझ्या गजऱ्याचा सुगंध होता
माझ्या श्वासांना त्याचा छंद होता
पण...
तलवार होती अन रक्तही होतं

चंद्रकिरणांची सावली होती
वाऱ्याची झुळूक होती
पण...
तुझी नजर ओली होती
अन..
माझा भ्याडपणा नितळ होता

तू होतीस, मी होतो
रात्र होती, एकांत होता
पण...

- स्वप्निल पगारे

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद! आपल्या समाजात प्रेम करताना किती बंधनं आणि बेड्या असतात ते व्यक्त करण्याचा प्रयत्न. याच बंधनांच्या बेडीत अडकलेल्या प्रेमींची त्या एकांताच्या क्षणी असणारी अवस्था आणि घालमेल व्यक्त करणारी हि कविता.