तुमचा बातमीचा विश्वासार्ह सोर्स काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 August, 2017 - 13:56

हल्ली एखादी नवीन वादग्रस्त घटना घडली की ती मला तरी पहिले व्हॉटसपवरच समजते. मग तिचा शोध घेतला जातो. शोध घेताना परस्परविरोधी अश्या बरेच बातम्या सापडतात. काही ठिकाणी तर चक्क व्हॉटसपवर फिरणारया खोट्या पोस्टच शहानिशा न करता छापल्या आहेत असे वाटते. आता हा निष्काळजीपणाही असू शकतो किंवा ते कोणाच्यातरी दबावाखाली वा विकले गेल्याने खोटी बातमी देत असावेत.

ताजे उदाहरण देतो.
गोरखपूर ऑक्सिजन कांड - नवाकाळमध्ये बातमी वाचली. घरच्यांना सांगितले. सारेच हळह्ळले. बातमी या दुर्दैवी घटनेच्या मानाने फारच थोडक्यात दिल्याने आणखी डिटेल शोधायला गूगल केले. पहिलीच लिंक आली की काल दिवसभर गोरखपूरला अमुक तमुक झाले अश्या अफवा पसरल्या होत्या. लिंक चेक केली आणि घरच्यांना सांगितले की अरे हळहळ व्यक्त करू नका, असे काहीही झाले नाहीये. या व्हॉटसप फेसबूकच्या अफवा आहेत नुसत्या... घरच्यांना हायसे वाटले, दोनचार शब्द मलाही सुनावले.
अर्ध्या तासाने आणखी सर्च करून मी त्यांना सांगितले की अफवा नसून खरेच लहान मुले दगावलीत Sad

पुढे कन्फर्म झाल्यावर मायबोलीवर धागा काढला. पण दिवसभरात बरेच उलटसुलट कानावर पडत होते. फार कश्याला ईथेही बरेच उलटसुलट बातम्यांच्या लिंक दिल्या गेल्या. फेसबूक व्हॉटसपवर लगेच विश्वास ठेवायचा नाही हे बेसिक मी पाळतो. पण सर्च केल्यावर न्यूज चॅनेलचा मुखवटा धारण केलेल्या कित्येक लिण्का उलटसुलट बातम्याच देतात. एखाद्या चुकीच्या बातमीवर विश्वास ठेवून आपण ईथे धागा काढायचो आणि पुढे ते काहीतरी वेगळेच प्रकरण आहे असे समजायचे. यावरून माझी चुकी नसताना किंवा मी चुकीच्या सोर्सवर विश्वास ठेवला ईतकीच चुकी असताना शिव्या खाऊन झाल्या आहेत. असो, त्या मी मनावर घेत नाही. पण खरी बातमी काय ते समजणे हा प्रत्येकाचा हक्कच आहे.

तर आजच्या या विश्वासार्हता गमावलेल्या भारतीय मिडियाच्या जगात खरी बातमी तुम्ही कुठून मिळवता. तुमचा खरी बातमी मिळवायचा विश्वासार्ह सोर्स काय आहे?

तसेच कोण आहेत ज्यांच्या बातम्या नेहमी एकाच चष्म्यातून असतात? जे एखाद्या पक्षाचा नुसता उदो उदो करतात किंवा नुसता द्वेष करतात? कोण तटस्थ असते, कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर चटकन विश्वास ठेवू नये? तुम्ही एखाद्या बातमीची शहानिशा कुठले सोर्स वापरून करता हे जाणून घ्यायला आवडेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण पोस्टट्रुथ च्या जमान्यात आहोत. तेव्हा सोर्सचा विश्वास ठेवू नये. काहीच महिन्यांपुर्वी यच्चयावत सर्व आघाडीच्या बातमीदारांनी दुबईत दाउद ची संपत्ती जप्त केल्याची बातमी दिली होती... ती इतकी खोटी होती की दोन तासात तिचे धिंडवडे निघाले.

व्हॉट्सप नको की मेनस्ट्रीम नको. विश्वास ठेवू नकाच. फक्त माहिती घ्यायची. आणि स्वतः प्रोसेस करायची. त्यातून बातमी मागची पुढे न आलेली बातमीही कळते.

फक्त माहिती घ्यायची. आणि स्वतः प्रोसेस करायची.
>>>>
प्रोसेस करायची म्हणजे नक्की काय कसे?
म्हटले तर व्हॉटसपवरून मी तेच करतो. माहीती घेतो आणि मग शोधकामाला लागतो. एखादी जुनी फेक माहिती असेल, मिथ असेल तर खरेखोटे सहज होऊन जाते. पण ताज्या घडामोडीबाबत काय करावे?

शांत बसावे, धागे काढून अजून पेटवू नये. आपले मत, भावना, विचार कुणाला नाही कळले तर काहीही बिघडत नाही. ज्यांना कळायचे त्यांना कळते, ज्यांना नाही त्यांना मुळीच नाही.

पाहिजे तर विचार करावा, मंथन करावे शक्य असल्यास

आशुचँप +१
'कुठला सोर्स खरा' हे ही जर इतरांना विचारावं लागत असेल तर स्वस्थ पडी खावी आणि शांत बसावे. १-२ दिवसांनी समजते. नाही समजले तर समजे पर्यन्त वाट बघावी. चौफेर वाचावे. नक्की समजेल.

पण ताज्या घडामोडीबाबत काय करावे?

>> आशुचँप ने म्हटल्याप्रमाणे शांत बसावे. जर बातमी आपल्यावर परिणाम करणारी नसेल तर टेन्शन घेऊ नये. जसे की तुम्ही मुंबैत बसलाय आणि इकडे नाशिकला महापूर आल्याचे टीवीवर दणाणा बातम्या चालतायत, तर तो पूर मुंबैला येऊन तुम्हाला बुडवणार नसल्याने शांत बसावे. नंतर कळतंच की दाखवायला बातम्या नसल्याने टीवीवाले 'नेहमीसारखे गोदावरीत सोडलेले पाणी' नाशिकचा महापूर म्हणून दाखवत आहेत.

हां, पण समजा तुमचे आयडीबीआय मध्ये खाते आहे आणी व्हॉट्सप आला की ही बॅन्क बुडाली, पैसे डूबले... तर पहिले बॅन्केत फोन लावावा व कन्फर्म करुन घ्यावे. मध्यंतरी हा आयडीबीआय बुडाल्याचा चा मेसेज फिरत होता तेव्हा एका व्हॉट्सप ग्रुपवरच्या खुद्द आयडीबीआयच्या बॅन्क मॅनेजरने ही न्युज खोटी असल्याचे व बॅन्क सुरक्षित असल्याचे सांगितले तरी इतर सदस्य त्या कर्मचार्‍यावरही विश्वास ठेवत नव्हते हा प्रचंड मनोरंजक प्रकार होता.

आशूचॅम्प, धागा काढणे न काढणे हा वेगळा विषय झाला.
किंवा खरे तर मायबोलीवर धागा काढून खरे खोटे करणे हा मला चांगला पर्याय वाटतो. अर्थात हा धागा काढण्यामागचा मूळ हेतू नसला तरी प्रतिसादांमधून शहानिशा होते. ईथे कोण कोणत्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून लिहितो किंवा कोण तटस्थ आहे याचा अंदाजही काही दिवसात येतो त्यामुळे कोणाच्या मताला काय कसे घ्यावे हे देखील समजते.

आशुचाम्प Rofl
@नाना पटलं.

नानाकळा, पूराची वा बॅन्क बुडाल्याची वा एखाद्या सिनेकलाकाराचे अफेअर असल्याचे वा कोणाचे तरी दुखद निधन झाल्याचे वगैरे बातम्या तुम्ही म्हणता तसे सावचितपणे खरया खोट्या करता येतात, आणि होतातही...

प्रॉब्लेम राजकीय एंगल असलेल्या बातम्यांना होतो. खरे तर आपल्याला त्या राजकीय चिखलफेकीशी घेणेदेणे नसते. आपल्याला फक्त खरी घटना जाणून घेण्यात रस असतो. पण त्या घटनेचा संबण्ध सरकारशी असेल वा त्याचे राजकीय पडसाद उमटणार असतील तर मात्र ईतक्या उलटसुलट बातम्या ईतक्या प्रचंड वेगाने फिरू लागतात की अवघड होते. आणि थांबावे म्हटले तरी पुढेही खरी बातमी काय हे खात्रीने सर्वांनाच समजेल असेही यात नसते. शेवटी लोक सत्याचा शोध घेणे सोडतात किंवा विसरतात..

प्रॉब्लेम राजकीय एंगल असलेल्या बातम्यांना होतो.

>>> एकच सांगतो. खरी घटना जाणून घेणे अ श क्य. जिथे राजकारण अंतर्भूत असते तिथे खर्‍या खोटेपणाचा नाद सोडलेला बरा.

खैरलांजी असो की कोपर्डी इथे राजकिय अ‍ॅन्गल आल्याने खर्‍या घटना, माहिती दाबल्या गेली, बदलल्या गेली. अशी लिस्ट तर मागच्या दहा हजार वर्षांची तयार होईल ज्यातले सत्य कधीच बाहेर येत नाही.

नाना अगदी परफेक्ट.

एक करेक्शन - दुखद निधन असा शब्द वापरू नये. निधन हे दुखदच असते, निधनामुळे कुणी आनंदी झाला असला तरी जाहीरपणे तसे लिहीत नाहीत.

ज्या गोष्टीशी आपले घेणेदेणे नसते, त्या गोष्टीबद्दल माहीती करून घेण्यात रस असणे आणि सत्याचा शोध घेणे यात मला वाटते कमालीचा फरक असतो. पहिल्या गोष्टीला मला वाटतं भोचकपणा म्हणत असावेत. आणि आपल्या देशात अशाच भो वर्गाची संख्या बेसुमार असल्याने वृत्तवाहिन्या, सोशल मिडीयावर अशा बातम्या वेगाने पसरतात. वाचणारे आणि विश्वास ठेवणारे आहेत म्हणून तर लोक लिहीतात.

ज्या गोष्टीशी आपले घेणेदेणे नसते, त्या गोष्टीबद्दल माहीती करून घेण्यात रस असणे आणि सत्याचा शोध घेणे यात मला वाटते कमालीचा फरक असतो. पहिल्या गोष्टीला मला वाटतं भोचकपणा म्हणत असावेत. >> का बरं? देणेघेणे आहे की नाही हे कसे ठरवायचे? आणि नसेल तर भोचक का लगेच? गम्मतच आहे.
ती अर्भके गेली तर मला देणेघेणे असलं पाहिजे का नसलं पाहिजे ? ट्रंपने रशियाशी संधान बांधले, भारतात बीफ बॅन केले, मुख्यमंत्र्यांच्या विमानाला अपघात झाला, साउथ कोरिआने ग्वाम वर (जर) हल्ला केला या आणि अशा बातम्यात मी देणेघेणे कुठे ठेवू याचा अल्गोरिदम क्रुपया द्यावा.

अमितव डायरेक्ट शेवटचा प्रतिसाद वाचण्यापूर्वी बाकी पण वाचत जावे. मी लिहीलेले मूळ वाक्य कुमार ऋ याचे आहे. त्यामुळे तुमची गंमत काय आहे ती त्याच्याशी चालू ठेवा. त्याला कुठल्या गोष्टीशी देणेघेणे आहे अथवा नाही याच्याशी आणि तुमच्या वाटण्याशी मला काही देणेघेणे नाही.

मी संपुर्ण धागा वाचलाय. अर्थात नजर चुकीने काही राहिले असू शकते कारण कु. ऋ. चे प्रतिसाद सम्पुर्ण वाचण्याचे मनोधैर्य माझ्यात नाही. पण तरी खालील पैकी नक्की कोणते वाक्य त्या माबोवरील सर्वज्ञानी व्यक्तीने म्हटले आहे?

>>ज्या गोष्टीशी आपले घेणेदेणे नसते, त्या गोष्टीबद्दल माहीती करून घेण्यात रस असणे आणि सत्याचा शोध घेणे यात मला वाटते कमालीचा फरक असतो. पहिल्या गोष्टीला मला वाटतं भोचकपणा म्हणत असावेत. आणि आपल्या देशात अशाच भो वर्गाची संख्या बेसुमार असल्याने वृत्तवाहिन्या, सोशल मिडीयावर अशा बातम्या वेगाने पसरतात. वाचणारे आणि विश्वास ठेवणारे आहेत म्हणून तर लोक लिहीतात.>> ?

अरे मी कुठे काय असे म्हटले
उलट राजकीय एंगल असलेल्या बातमीशी आपले घेणेदेणे असतेच. म्हणून तर त्या आपल्यापर्यंत खरया स्वरुपात पोहोचू नयेत याची संबंधितांकडून काळजी घेतली जाते.

srd धन्यवाद

<<<<<
जिथे राजकारण अंतर्भूत असते तिथे खर्‍या खोटेपणाचा नाद सोडलेला बरा.
>><><

हे मत राखून असणारे आणि या मताशी सहमत असणारे प्रत्यक्षात स्वत: तो नाद सोडतात का?

आपापल्या आवडीनुसार म्हणजे स्पोर्ट्स, करमणूक,मोबाइल,रेल्वे विमान प्रवास,ट्रावल,पर्यटन वगैरेसाठी निरनिराळ्या वेबसाइट्स धुंडाळून चांगल्या बुकमार्क करून ठेवतो ब्राउजरात. ( स्पीडडाइअल.)
पेपरांचे मोबाइल अॅप्सपेक्षा सदरांचे बुकमार्क्स उपयुक्त असतात.
टिव्हि चानेलमध्ये:-
एनडिटिव्ही,
सिएनबिसी आवाज,
अलजजिरा ( कत्तारचा चानेल)
एबिसी ओस्ट्र्रेलिया

बीबीसी
पीटीआय
यूएनआय
सरकारी राजपत्र आणि वेब्साईट्स

शांत बसावे, धागे काढून अजून पेटवू नये. आपले मत, भावना, विचार कुणाला नाही कळले तर काहीही बिघडत नाही. ज्यांना कळायचे त्यांना कळते, ज्यांना नाही त्यांना मुळीच नाही.
पाहिजे तर विचार करावा, मंथन करावे शक्य असल्यास >> आशुचॅम्प किती हौस तुला पालथ्या घड्यावर पाणी घालायची. भरणार आहे का तो कधी.. Proud

खर सांगु .. वादग्रस्त आणि अचानक घडलेल्या बातमी साठी (क्रिकेट, फुटबॉल, निवडणुका सारख्या गोष्टी सोडुन) मायबोली. आणि त्यात वादग्रस्त आणि सनसनाटी बातम्या ऋन्मेऽऽष च्या धाग्यापासुन. मग ते demonetization असो नाहीतर गोरखपुर मधली मुले दगावलेली बातमी असो, मला ही बातमी पहिल्यादा इकडेच माहिती पडली.

<< प्रत्यक्षात स्वत: तो नाद सोडतात का?>>
या प्रश्नाचे उत्तर काहीहि दिले तरी तुमचा पुनः प्रश्न - यावर विश्वास कसा ठेवायचा? हे खरे सांगतात की खोटे?
असे तुमचे सतत प्रश्न.

<<चुकीच्या सोर्सवर विश्वास ठेवला ईतकीच चुकी असताना>>
अहो "इतकीच" काय? हीच तर भली मोठी चूक.
आणि असे बघा - तुम्ही जर दुसर्‍या सोर्सवर विश्वास ठेवला असता तर दुसर्‍या कुणितरी तुम्हाला शिव्या दिल्या असत्या!
एकूण काय - उगीच जाहीर सभेत जाऊन सर्व जनतेचे मत काय असे विचारलेत तर तुम्हाला निरनिराळी मते मिळतील - की परत तुमचा प्रश्न - कुणावर विश्वास ठेवू?

तर असले काहीतरी करत बसण्याचा कंटाळा येत नाही का?
बुद्धिबळे, ब्रिज, किंवा टेनिस, फुटबॉल असले काहीतरी उद्योग लावून घ्या मागे. तिथे बोललेले खरे की खोटे हे तुम्हाला आपोआपच कळेल.
बाकी गोरखपूर ला काय झाले यातले सत्य काय हा जर एव्हढा मोठा प्रश्न वाटत असेल, तर स्वतःच तिथे जाऊन बघा - स्वतः पाहिल्यावर तर कळेल ना खरे की खोटे?

एस आर डी, आणि बिपीनचंद्र
धन्यवाद Happy

दक्षिणाजी, आपला विश्वासार्ह सोर्स जाणून घ्यायला आवडेल Happy

साहिल शहा, हो मलाही बरेच बातम्या मायबोलीवरच पहिल्यांदाच समजतात. त्याचे ऋण फेडायला मी माझ्या धाग्यामुळे काही बातम्या लोकांना समजतील हे बघतो Happy

नंद्या४३
"
बाकी गोरखपूर ला काय झाले यातले सत्य काय हा जर एव्हढा मोठा प्रश्न वाटत असेल, तर स्वतःच तिथे जाऊन बघा - स्वतः पाहिल्यावर तर कळेल ना खरे की खोटे?
"
गोरखपूरला जाणे शक्य आहे. पण प्रश्न एका गोरखपूरचा नाही. बातम्या जगभरात घडत असतात. प्रत्येक बातमी जाणून घ्यायला आपण त्या त्या जागी जाऊ शकत नाही. उद्या मोदींनी त्यांच्या परदेश भाषणात काय म्हटले हे तिथे प्रत्यक्ष जाऊन जाणून घ्यायचे म्हटल्यास मला नोकरी सोडून जगपर्यटनाचा पास काढावा लागेल. हि राजकीय कॉमेंट नाही, यापेक्षा समर्पक आणि चपखल (की चपलख?) उदाहरण दुसरे पटकन सुचले नसते.

<<<पण प्रश्न एका गोरखपूरचा नाही. >>>
बरोबर आहे, पण मला असे म्हणायचे आहे की -
उगीच जाहीर सभेत जाऊन सर्व जनतेचे मत काय असे विचारलेत तर तुम्हाला निरनिराळी मते मिळतील - की परत तुमचा प्रश्न - कुणावर विश्वास ठेवू?
तर असले काहीतरी करत बसण्याचा कंटाळा येत नाही का?

गोरखपुरला दुर्घटना ही बातमी आहे, कुणामुळे कशामुळे झाली याची मते व्यक्त होतच राहतील. नंतर कोर्टात निर्णय होईल काही वर्षांनी.

Pages