Submitted by अनन्त्_यात्री on 13 August, 2017 - 02:43
जोवर ना ती रिमझिमणारी
श्रावण सर मज चिंब भिजविते
तोवर माझे पाऊसगाणे
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
जोवर ना ती तेज दुधारी
कट्यार दु:खाची मज भिडते
तोवर माझे शोकगीतही
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
जोवर ना मज दुमदुमणारी
हाक अनाहत ऐकू येते
तोवर रचिले सूक्त जरी मी
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
प्रतिभेचे लखलखते लेणे
जोवर या झोळीत न येते
तोवर स्फुरला मंत्र जरी मज
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
केवळ सुंदर..... _____/\____
केवळ सुंदर.....
_____/\____
Shashankji, thanks for your
Shashankji, thanks for your comment!
निव्वळ अप्रतिम!!! ___/\___
निव्वळ अप्रतिम!!! ___/\___
मला आपला हेवा वाटू लागलाय कविवर्य
अप्रतिम !
अप्रतिम !
सुरेख !
सुरेख !
राहुल, प्रतिसादाबद्दल
राहुल, प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
दत्तात्रयजी, प्रतिसादाबद्दल
दत्तात्रयजी, प्रतिसादाबद्दल आभार!
_तृप्ती_ प्रतिसादाबद्दल आभार!
_तृप्ती_ प्रतिसादाबद्दल आभार!