आमच मिनी अभयारण्य

Submitted by कविता९८ on 11 August, 2017 - 10:25

आमच्या परिसराच नाव अशोकवन.
आणि खरच एखाद्या वनासारख इथे बरीच हिरवळ आहे.
आमच्याकडे रोज सकाळी बरोबर 5.30 वाजता कावळ्यांची हजेरी असते,एका पध्दतीने आमचा गजरच आहेत ते..
बर्याच वेळा घरी येऊन ताटात सुध्दा खातात.
आता फक्त कावळेच नाही तर खारूताई,चिऊताई,पोपट,बुलबुल,मैना असे बरेच पक्षी येतात.
एकदा तर बिल्डींग च्या समोरच्या झाडावर माकड होत.मार्गशीष महिना असल्याने घरात बरीच केळी
होती. सहजच खिडकीवर केळ ठेवलं तर हे साहेब कधी तिथून उतरून कधी आमच्या खिडकीवर आले समजल नाही.
पप्पांना ससुनवघरला ऑन ड्युटी असताना जखमी कासव मिळालेल पप्पा ते घरी घेऊन आले.नंतर ते आम्ही एका संस्थेला दिले आणि त्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला सुखरूप जंगलात सोडलं.खर सांगायचं तर मुड ऑफ असला की त्याच वेळी जर हे सर्वजण असतील तर आपोआप बरं वाटतं.
त्यांना कदाचित आमची भाषा समजते कारण ते ओरडत असतील आणि त्यांना शांत बसा बोलले तर ते गप्प बसतात.
दूध आणि ब्रेड तर या काऊंच आवडतं.जर यांना नाश्ता,दुपारच जेवण द्यायला जरा उशीर झाला तर सरळ वाटी खाली फेकून देतात.
(रागाच्या बाबतीत अगदी माझ्यावर गेले आहेत.)

एक सवय लागली आहे यांची,
रोज न चुकता आमच्याकडे येणारे हे पाहुणे आता हवेहवेसे वाटतात.

तुम्ही पण gallery मध्ये पक्ष्यांसाठी पाणी , दाणे ठेवत जा.
(आम्ही भात ठेवतो,त्यात डाळ भात तर असतोच शिवाय मालवणी कढी वगैरे मिक्स केलेला भात पण असतो.)

IMG_20161125_100625_HDR_1480048860570_1502459927636.jpgIMG_20170529_112656_HDR_1502459869496.jpgIMG_20170501_092054_HDR_1502459884093.jpgIMG_20170623_083716_HDR_1502459842685.jpgIMG_20170614_171908_HDR_1502461324100_0.jpgIMG_20170411_085643_HDR_1502461349101.jpg20170609_212405-BlendCollage.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वा:! मस्तं लिहिलंय. आवडलं. आणि आपलं मिनी अभयारण्यही छान आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला मोठाली बरीच फळझाडं असावीत. म्हणून त्यांच्या आश्रयाने हे पशुपक्षी तेथे येत असावेत. सर्व फोटो सुंदर आलेत. एका फोटोत डॉबरमॅन कुत्राही दिसतोय. मस्तं!!

वा:! मस्तं लिहिलंय. आवडलं. आणि आपलं मिनी अभयारण्यही छान आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला मोठाली बरीच फळझाडं असावीत. म्हणून त्यांच्या आश्रयाने हे पशुपक्षी तेथे येत असावेत. सर्व फोटो सुंदर आलेत. एका फोटोत डॉबरमॅन कुत्राही दिसतोय. मस्तं!!>>धन्यवाद, पण मला कुत्र्याची जात नाही माहित.

बरचं लाडावुन ठेवलयं दिसतयं त्याला
>>माणसांपेक्षा तर बरे आहेत ना.उगाच खोट खोट लाडात ना ते बोलत ना मी.नॉनवेज पण आवडतं त्यांना..मग कधीतरी आमच्याच ताटातून नेतात , मग पुन्हा जेवायला बसावं लागतं.

छान फोटो. अशी बाग आणी प्राणी पक्शी सोबत असणे खरच भाग्याच !!>>धन्यवाद कंसराज

खुपच छान अभयारण्य.मलाही प्राणी पक्षांची आवड आहे .रोज पक्षांना खायला टाकणे व गाई,भूभूला भरवणे चालू असते.

बर्याच वेळा घरी येऊन ताटात सुध्दा खातात.
आता फक्त कावळेच नाही तर खारूताई,चिऊताई,पोपट,बुलबुल,मैना असे बरेच पक्षी येतात.

>>>> जबरच

Wa madtach aahe tumcha abhyaranya nava sarkhach abhay milalay saglyana ☺
Aamchya society madhe bharpur chimnya aahet sakali tar khupach chivchivat chalu asto.
Chaan vatat aavajane ( engraji typo sathi kshamasva)

मस्त फोटो कऊ, पण मलाही कावळ्यांचे आश्चर्य वाटले.

बाकी पक्षी अन प्राणी दोघांची खुप भिती वाटते

Aamchya society madhe bharpur chimnyaaahet sakali tar khupach chivchivat chalu asto.>>त्याच्यासाठी बाहेर दाणापाणी ठेवून बघा अजून छान वाटेल.

मस्त फोटो कऊ, पण मलाही कावळ्यांचे आश्चर्य वाटले.बाकी पक्षी अन प्राणी दोघांची खुप भिती वाटत>>>एकदा सवय लागली त्यांची की मग नाही घाबरणार तुम्ही.

धन्यवाद सायुरी,अक्षयजी,देवकी..

कावळादांपत्य फार मस्त.>>srd तुम्हाला कस समजल??मी रोज निरीक्षण करून मग जवळपास एक आठवड्यात निष्कर्ष काढला की ते कपल आहे

अरे सहीये.. ते पशू पक्षी आणि तुम्ही दोघे..
आमच्या ऑफिस कॅन्टीनमध्ये आम्ही कावळ्या चिमण्यांना लाडावून ठेवले आहे. आधी ज्याच्या डब्यातली पोळी भाजी शिल्लक राहायची ती त्यांच्यासाठी ठेवायचो. आता मात्र आमचा दहा बारा जणांना ग्रूप जे तीन चार टेबल जोडलेले आहेत त्यावर बसतो, त्यातील रिकाम्या टेबलवर ते जमतात आणि आमच्याच टेबलवर बसून आमच्याच लंच ग्रूपचे सदस्य असल्यासारखे जेवतात Happy

भारी आहे निरूजी
तुमच्या कडे आलेले बुलबुल पण मस्त होते. Happy

मस्त

Pages