मेलीय माणुसकी जगला तो बिचारा आहे

Submitted by निखिल झिंगाडे on 3 August, 2017 - 03:31

देवाच्याच दारी सोन्याचा उंबरा आहे
मेलीय माणुसकी जगला तो बिचारा आहे

चांदणी रात्र आहे वाहतो वारा आहे
चंद्र जरी या नभी साक्षीला तारा आहे

लागली आग आहे वाढतोय पारा आहे
जळतोय बळी तरी वसूलीला सारा आहे

फेडीचा तगादाच सावकारी पाश आहे
मदतीने सरकारी ही अश्रूंच्या धारा आहे

धुंवाधार झाला इथे तिथे दुष्काळ आहे
वादळाने विस्कटला उरला पसारा आहे

सोसवलाच नाही धक्का विश्वासघाताचा
राख झाले जीवन हे शिल्लक निखारा आहे

Group content visibility: 
Use group defaults