येस बॉस ...

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 27 July, 2017 - 03:05

येस बॉस ...

ह्या बॉस नामक प्राण्याचा अस्सा राग यायला लागलाय ना... एकतर प्री-प्लॅन सुट्टी घ्या असा ह्यांचा फतवा असतो त्यातही भर म्हणून ज्यादिवशी सुट्टी हवीय त्या दिवसाच्या एक आठवडा आधी याना लेखी किंवा मेल द्वारे लिव्ह ऍप्लिकेशन हा प्रकार हवा असतो आणि हा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी नंबरच्या चष्म्यासह वाचता येत असला तरी एम्प्लॉयीचे काकुळती चेहरे बघण्याची याना हौस असतेच तेव्हा यांचा मूड बघून तोंडी लिव्ह ऍप्लिकेशन हि द्यावं लागतंच ते वेगळं... अन कहर म्हणजे सुट्टीच्या आदल्या दिवशी पुन्हा , "उद्या मी सुट्टीवर आहे हां " असं भोळा चेहरा करून सांगावं लागतंच... चला इथपर्यंतच नाटक एम्प्लॉयी ने न चुकता प्रत्येक डायलॉग अन ऍक्शन सह करून झाल्यावरही जेव्हा , "हो ? कधी दिलंत ऍप्लिकेशन, काय कारण?" असा एक नाटकी प्रश्न बॉकडून येतो ना... तेव्हा पूर्ण खात्री होते... होच, म्हणूनच हा बॉस आहे अन तू एम्प्लॉयी ... नाटकातही हाच बेस्ट आहे.... एक पाऊल पुढे इथेही ...

©२०१७: मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे पार्ट्नरशिप फर्म असल्याने दोन पेक्षा अधिक दिवसाची सुट्टी हवी असल्यास मला तर एक नव्हे तब्बल दहा जणांना सगळ सांगत बसाव लागत.

आत्ताच गणपतीची सुट्टी टाकली....

मी सहसा विचारत बसत नाही डायरेक्ट सिस्टम मध्ये अप्लाय करते. ऊगाचच विचारुन डोक्यावर चढवुन नाही ठेवायचे

धन्यवाद सगळ्यांचे.

VB मान्य आहे ...पण कसंय ना... जरी HR , सिस्टम वगैरे असली ना तरी इमिजिएट रिपोर्टींग ज्याला करायचं असत त्याला हे तोंडी सांगावेच लागतं... बॉस लिहिलंय फक्त. अर्थात प्रत्येकाला ते लागू होईलच असं नाही..