आणि आजही तिने गिफ्ट नाही घेतलं म्हणून काय झाले??
पुढे तिला ते घ्यावच लागेलं..
हया व्हलेटाईनला नसेल घ्यायचं तिला पण पुढच्या व्हलेटाईनपर्यंत मी करत राहीन स्वतःला सिद्ध ..कितीही तिने मला युज का करेना .. कितीही तिने मला आजमावू दे...मी हार नाही मारणार....असं मनं जरी माझं म्हणतं असलं तरी कुठेतरी मी खचलो होतो..
"ती" मला आजमावत होती आणि मी ही आजमावून घेत होतो पण स्वःतला प्रत्येकवेळी किती सिद्ध करणार ना? कदाचित माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असेलही आणि ह्याचा तिला त्रास झाला असेलही पण मलाही भावना आहेत, मर्यादा आहेत.. एखाद्याने आधीच ठरवलं असेल तर मग कितीही परीक्षा द्या कितीही आजमावून घ्या सारं व्यर्थच ..मी भलेही कितीही मनाशी हट्ट केला असेल किंवा कितीही मी जिद्दी असेल तिच्याबाबतीत पण शेवटी मी ही माणूस आहे भावनेच्या भरात कदाचित मी वेडेपणा केला असेलही पण
जबजस्तीच प्रेम नकोय मला तिने माझ्या भावना समजून घ्याव्या मला नीट ओळखावं इतकचं वाटतं होत मला पण आता अजुन ह्या अशाच दिव्यातून जाणं.. हे नाही जमणार मला आणि मी आजमावून घेण आता लगेच सोडलं तर परत ती स्वतःच बोलणार ..
"हेच का तुझं प्रेम?? माझ्यासाठी इतकंही करू शकत नाही का तु"
काय करू नि काय नको असं झालं होत मला. इतरही बरेच कौटंबिक ताण तणाव परत त्यात पप्पांनी "आता परत नापास झालास ना तर सरळ सलूनमध्ये यायचं आणि वस्तरा हातात घ्यायचा तेव्हा तुझं मी ऐकणार नाही" अशी धमकी दिलेली.
खुप टेंशन आलेलं तेव्हा, विरलला भेटून सगळं सांगितलं मनातलं.. त्याने मला विपश्यना साधना करायचा सल्ला दिला आणि मी ही गुगल वर सगळे डीटेल्स चेक केल्या.. जर ही साधना केल्याने काहीतरी चांगल घडवून आणता येणार असेल, एकाग्रता,संयम, मनाची शक्ती वाढत असेल तर काय हरकत आहे..दहा दिवसाचा तर प्रश्न आहे आणि तसंही मला काही दिवस कसालाच विचार करायचा नव्हता लगेच चौकशी करून अॅडमिशन मिळवलं घरीही सांगितलं की,अभ्यासात मन लागावं,एकाग्रता वाढवावी म्हणून जातोय परवानगी मिळणार हे माहित होतचं. प्रेरणाला सांगू की,नको हाही प्रश्न होताच पण पंधरवड्यातच तिला काही न सांगता निघालो मी..
.......................................................................................
तब्बल दहा दिवस त्या आश्रमात राहीलो मी. मोबाईल अलाऊड नाही,कुणाशी बोलणं नाही,बाहेर जायचं नाही की, कुणाला भेटायचं नाही.. जगापासून वेगळाच होतो मी असं म्हटलं तरी काही हरकत नाही पण खुप काही शिकायला मिळालं तिकडे..
तिथून आल्यानंतर प्रेरणाला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याची एक वेगळीच बातमी ऐकायला मिळाली.. मी यायच्या आदल्या दिवशीच अॅडमिट केलंल.. लगेचचं पाहायला गेलो तिला.
गाडी चालवायला शिकताना गाडीवरून पडल्यामुळे गुडघ्याची का त्याखालची हाड मोडलेली आणि त्यामुळे संपूर्ण गुडघ्यापासून पायाला फॅक्चर केललं..
तिला ह्या अवस्थेत पाहिल्यानंतर गहीवरूनच आलं मला पण मी सावरलं स्वतःला जे काही मी आश्रमात शिकलो आतल्या मनाच्या पाॅसिटीव्ह पाॅवरबद्दल.. ते मी तिला शिकवायचं ठरवलं.. ह्याने तिलाच लवकर बरी व्हायला मदत होणार होती..
दिवसभर बेडवरच असल्यामुळे खुप बोअर व्हायचं तिला..सगळे येऊन भेटून जायचे फक्त.. त्यात बोलायला फारसं कुणी नसायचं
तिचे आईबाबा येऊन जाऊन असायचे रात्री बहीण यायची तिच्यासोबत झोपायला..ती ही कामावरून थकून यायची त्यामुळे लगेच झोपायची आणि संपूर्ण दुपार झोपून राहिल्यामुळे रात्री तिला झोप लागायचीच नाही अशावेळी मी फोन करून बोलायचो तिच्याशी.. ज्या काही चांगल्या गोष्टी मला आश्रमात सांगितलेल्या त्या मी सांगायचो तिला..सकाळी काॅलेजला जाताना भेटायचो, बोलायचो, क्लासला काय शिकवलं हे सांगायचो कधी कधी क्लासला थोडं जास्त थांबून सरांकडून न कळलेला अकाऊंट विषय शिकायचो,सराव करायचो आणि मला चांगलं जमू लागलं की तिलासुद्धा हाॅस्पिटलमध्ये जाऊन शिकवायचो तिला ह्याच आश्चर्य वाटायचं पण प्रेम सर्व काही शिकवतं माणसाला त्यात मी चांगला शिकतोय ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही..सारखं सारखं जाऊन येऊन येत असल्यामुळे तिच्या आईवडीलांशीही ओळख झालेली त्यामुळे कधी कधी तिच्या आईला जमत नसल्यास मीच डबा वैगेरे आणून द्यायचो तिला...
हल्ली "ती" माझ्याशी आपुलकीने बोलायची म्हणजे पुर्वीसारखी केवळ माझी मजा घ्यायचीय म्हणून न बोलता मनमोकळेपणाने बोलयची..आधी कधीच न सांगितलेल्या गोष्टी सांगायची कदाचित मला वाटणारी तिची काळजी आणि हाॅस्पिटलमध्ये केलेली मदत ह्यावरून तिला थोडसं जाणवलं असेल...हळूहळू तिच्या मनात कुठेतरी माझ्याविषयी आपलेपणा दिसत होता..
रोज रात्री आम्ही बोलयचो हाॅस्पिटलमधून डीस्चार्ज मिळाल्यानंतरही आमचं बोलणं चालूच राहीलं आणि एकेदिवशी तिने स्वतःच विषयाला हात घातला
" जयेश आय अॅम साॅरी"
मी - "कशाबद्दल?"
" मी तुझी मजा घेत होते, तुझ्या प्रेमाला समजून घेतलं नाही मी उलट तुला मी मुद्दाम काहीही करायला लावायचे..खरं सांगू मला तु मागच्या बॅचवर बसणारा, नापास होणारा "ढ", रस्त्यात मुलीना अडवून त्रास देणारा टपोरी वाटलेलास पण आता कळतयं तु कसाही असलास तरी तु मनाने चांगला आहेस आणि मलाही तु आवडू लागला आहेस पण हे प्रेम नाही तु खुप काही केलंसं माझ्यासाठी कदाचित मीच तुझ्यावर तु करतोस तितकं प्रेम नाही करू शकणार आणि जरी करता आलं तरी तु न्हावी मी मराठा घरचे नाही ऐकणार आणि पळून जाऊन लग्न करणं मला नाही जमणारं..सो त्याबद्दल आय अॅम साॅरी..."
इतकं बोलून ती शांत झाली पुढे काय बोलावं हे मला सुचेना पण कुठेतरी मनाच्या आठवणीत मला काहीतरी आठवत होतं..तेच तिला मी बोलून दाखवलं.
"जेव्हा मी आश्रमात होतो ना तेव्हा शेवटच्या दिवशी मी गुरूजीना सांगितलेलं सगळं..स्वतःला मी पुर्णपणे व्यक्त करून सोपवलं मी स्वःतला..ते काय म्हणाले माहीतेय??"
"प्रेम, क्षमाशिलता आणि इतरांच्या मतांबद्दल आदर ज्यांच्याजवळ आहे ना त्याला प्रेम हया ना त्या रूपात मिळतेच तु प्रेम केलेस तसे तिला तिच्या काही चुकांबद्दल क्षमाही कर आणि तिच्या मताचा आदर राख..तुझं खरं प्रेम असेलही तिच्यावर पण त्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्या मनाचं तुझ्यावर आहे आणि हे मन ज्याने तुला दिलयं ना त्याच तुझ्यावर तु जितकं करतोस ना त्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रेम आहे आणि जो प्रेम करतो ना आपल्यावर तो आपल्याला कधीच त्रास देत नाही तो फक्त प्रेम करत राहतो कुठलीही अपेक्षा न करता..तु ही तसंचं करत राहा प्रेम तिच्यावर... तिच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता..
इतका सुंदर विचार आणि प्रेमाचा अर्थ मला कुणीच सांगितला नव्हता.. आता कळतय मला..मी तुझ्या शरीरावर कधीच प्रेम केलं नव्हतं...तुझ्या त्या आनंदी अवखळ हसण्यावर, निरागस खुश होण्यावर व तुझ्यातल्या त्या धार्मिक व सात्विक वृत्तीवर प्रेम केलं होतं आय मिन अजुनही करतोच फक्त तो आनंदी चेहरा आणि ते सात्विक भाव आयुष्याच्या रहाटगाडग्यात कुठेतरी हरवू नको देऊस..खुश रहा नेहमी.."
इतकं बोलून मी फोन कट केला...
यथावकाश आमची पदवी पुर्ण झाली..मला अगदीच चमत्कार व्हावा असे मार्क्स नाही मिळाले पण पास झालो मी..
"ती" पहील्यापासून टाॅपरच होती. सध्या सरकारी नोकरी करतेय गेल्याच महीन्यात तिची रत्नागिरीला बदली झाली..
आणि मी प्रायवेटमध्ये कामाला आहे सुट्टी असली की सलूनमध्ये पप्पांना मदत करतो ..लाज नाही वाटत आता त्याची. स्वतःच्या वडीलांना त्यांच्या कामात मदत करायला कसली आलीय लाज..
काही लोक "ऐ ग्रुज्यवेट हजाम, बगल का बाल निकाल" असं चिडवतात पण राग नाही येत त्यांचा...गुरूजींनी शिकवलयं क्षमाशिलता असावी अंगात ..इतरांना क्षमा करण्यासारखं दुसरं कठीण आणि महान काहीच नाही ह्या जगात..
कधी कधी रात्री फोन करते ती स्वतःहून..न सांगितलेल्या गोष्टि सांगते..मी ही शेअर करतो..आणखी काय हवं असतं ...प्रेम जरी एकतर्फी असलं तरी ते रिकामं नाही अधुर जरी असलं तरी सुंदर आहे अर्ध्या चंद्रासारखं......फक्त त्या चंद्राची दुसरी बाजू कधीच दिसत नाही आणि हीच बाजु सलते मनात आणि मनात काही ओळी सतत घोळत राहतात..
मन गुंततं..कुठेतरी आदळतं..
भावना फुलतात, संवेदना जागतात..
कधी आनंद तर कधी खुप वाईट वाटतं..
मग नकळत मनात एकचं कोडं उरतं..
"प्रेमात असचं का होतं?
समाप्त..
दोन्ही भागातील भाषेचा बदल हा
दोन्ही भागातील भाषेचा बदल हा मलाही कथेची गरज वाटतो. >>>>
अर्थातच!
मित्रांमध्ये बोलत असताना आपण जसं बोलतो तसंच मैत्रिणींमध्ये असताना बोलतोच असं नाही (काही अपवाद असतात)..त्यातही जर त्या मैत्रिणींपैकी एखादीवर जर आपलं प्रेम असेल आणि हे तिला सांगितलेलं नसेल तर आपण तिच्याशी बोलताना विशेष काळजी घेत बोलतो..हा तिच्या मनात घर बणविण्याचाही प्रयत्न असतो.. दोन्ही भागांत हा भाषेतील फरक जाणवतो तो कथानकाच्या गरजेसाठीच!
जर लेखकाला रोडरोमिओ सारखंच वागायचं असतं तर मागच्याच भागात मुलींच्या छेडछाडीसाठी वापरले जाणारे शब्द नायकाच्या तोंडी आलेले दिसले असते.
सकारात्मक शेवट होणारी सत्यकथा
सकारात्मक शेवट होणारी सत्यकथा भावली. तुमच्या पुढील लेखनास शुभेच्छा अजय जी.
हा प्रतिसाद फक्तं लेखकाप्रती
हा प्रतिसाद फक्तं लेखकाप्रती आहे ईतरांनी त्यावर मतप्रदर्शन करण्याची अपेक्षा आणि गरज नाही.
अशी तळटीप देऊन काहीच परिणाम होणार नाही. ज्यांना तुमचा प्रतिसाद खटकेल ते नक्की त्यावर मतप्रदर्शन करतील.
लेखकाचे लिखाण अभिजात असावे
लेखकाचे लिखाण अभिजात असावे
कुठल्याही (+/-) प्रतिसादामुळे त्यात अनैसर्गिक बदल करु नये असे माझे मत राहील.
आपली स्टाईल ती आपली स्टाईल Happy ह्यावर फक्त विश्वास ठेवून वैविध्य साधता आले तर उत्तमच<<+१११
खर तर पहिल्या भागाच्या वेळेसच
खर तर पहिल्या भागाच्या वेळेसच प्रतिसाद देणार होते, पण आधीचे प्रतिसाद वाचून हिम्मत नाही झाली. अशी घटना माझ्या शालेय मित्रांसोबत झालेली, मुलगी माझी बेस्ट फ्रेंड तर मुलगा शेजारी.. १०वि नंतर त्याने माझ्या मदतीने तिला प्रपोज केले पण तिने प्रेमविवाह करणार नाही असे बोलून नकार दिला, खरेतर त्याची किरकोळ शरीरयष्टी आणि सुमार शालेय प्रगती हे कारण तिने मला दिले,
पण तो १८ वर्ष झालेत तिला वेळोवेळी मदत करतो. आणि तिने नंतर प्रेमविवाहच केला, तो आता mech इंजिनिआर आहे टायगर श्रॉफ सारखी टोन्ड बॉडी आहे.
विपश्यनेचा अँगल न घालता
विपश्यनेचा अँगल न घालता संपवता आली असती तर! असो, छान प्रयत्न.
छान आहे आवडली...प्रेमाचा अर्थ
छान आहे आवडली...प्रेमाचा अर्थ असलेला उतारा आणि शेवटचे दोन उतारे तर खुपच छान संयत लिहिलय .....ते मला विशेष आवडले...
Great
Great
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
तनिष्का ,आपटे सर..
Khupch chan
Khupch chan
मस्त लिहलय आवडली
मस्त लिहलय आवडली
धन्यवाद उर्मिलाजी ,धन्यवाद
धन्यवाद उर्मिलाजी ,धन्यवाद विशालजी..
Pages