जबरदस्त "इंदू सरकार"

Submitted by सुजा on 29 July, 2017 - 16:16

फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याच्या इराद्याने " तुर्कमान गेट " या वस्तीवर बुलडोझर फिरवला जातो. वस्तीला आग लावली जाते /जाळपोळ केली जाते या सगळ्या गदारोळात आपली नायिका सापडते आणि अचानक तिला दोन लहान मुलं दिसतात. भेदरलेली/घाबरलेली . एकटीच . त्या जाळपोळीत त्यांचं रक्षण करण्यासाठी नायिका धावून जाते आणि त्या छोट्या मुलांच्या चक्रव्ह्यूहात जी काही अडकते आणि खऱ्या खुऱ्या चित्रपटाला सुरवात होते. नायिकेचा नवरा सरकारी ऑफिसर असतो . त्याने मुलांना घरात ठेऊन घेण्यासाठी नायिकेवर बंदी घालणं. त्यानंतर नायिकेचा मुलांच्या पालकांचा शोध घेणं पण पालक न सापडणं या सगळ्या जंजाळात नायिका इतकी पुरती अडकून जाते कि नवर्याच्या " मी किव्वा मुल " या पैकी कोणाची तरी एकाची निवड कर या धमकीला न घाबरता नायिका मनापासून मुलांच्या बाजूने कौल देते आणि मध्यंतर होतो. . नायिका स्वतः अनाथाश्रमात वाढलेली असल्याने मुलांचे पालक न सापडणं / त्या दंग्यात हरवणं हा तिच्याकरता जिव्हाळ्याचा विषय ठरतो. त्याच सुमारास विदयमान सरकारने " आणीबाणी " डिक्लेयर केलेली असल्याने त्याच्या विरोधात नायकेचा लढा हाच तर संपूर्ण सिनेमाचा गाभा ठरतो.

कथानकाला आणीबाणीचा फक्त संदर्भ घेतलेला आहे पण प्रत्यक्ष कथानक आणीबाणी च संपूर्ण चित्रण करणार नाहीये हे माझ्या साठी जरा नवीनच होत तरी सुद्धा आणीबाणीच्या संदर्भाला/ त्या वेळी घडलेल्या घटनांना ( नसबंदी ) मुळ कथानकात ज्या बेमालूम पणे मिसळले आहे त्याला तोडच नाही . ते फक्त आणि फक्त मधुर भंडारकरच करू जाणे . मधुर भांडारकर हा एक अतिशय हुशार डिरेकटर आहे . हे या सिनेमातून परत एकदा सिद्ध होत. कलाकारांची अचूक निवड हे त्याच्या सिनेमाचं बलस्थान असत. ते चोख झालेल आहे. नील नितीन मुकेशचा " चीफ" जबरदस्त छाप सोडतो. नायक (तोता रॉय चौधरी) आणि नायिकेची (कीर्ती कुल्हारी) काम पण उत्तम झाली आहेत फक्त नायिकेचं "तोतर" असणं का दाखवलं आहे ते मात्र समजत नाही किव्वा त्याची खरं तर जरुरीचं नव्हती . तीच "तोतर" असंण काही काही प्रसंगाना बाधा मात्र आणत असं असूनही कलाकारांची काम उत्तम झाली आहेतच .

संवाद हा अशा सिनेमाचा आत्मा असावा आणि तो या सिनेमात आहे पण. "घर बदलनेसे सिर्फ पता बदल जाता है लेकिन नसीब नही बदलता "अशा संवादातून समजत कि घरातून बाहेर पडल्यामुळे नायिकेचा फक्त पत्ता बदललाय पण नशीब नाहीच. अशा या आपल्या नायिकेचं नाव आणि आडनाव आहे " इंदू सरकार "झटका लागला ना ? तिच तर मधुर भांडारकर ची खासियत आहे Happy .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, बघायला हवा Happy
मधुर भंडारकर कडून अपेक्षा जरा जास्त असतात.. अभ्यास वगैरे करून येणारा दिग्दर्शक आहे

आणिबाणी दरम्यान घडलेल्या प्रमुख घटना जसे संजय गांधी यांचे झोपडपट्टीमुक्त शहरे (तुर्कमान गेट समोरिल झोपडपट्टी बुलडोजर लावून हटवणे याचाच एक भाग होता) , सक्तीची नसबंदीची , बडोदा डायनामाईट केस या व अश्या इतर घटना जर माहित असतील किंव्हा वाचल्या असतील तरच वरिल चित्रपट पाहताना पडद्यावर सुरु असणार्‍या प्रसंगांचा ताळमेल बसेल. अन्यथा सामन्य प्रेक्षकांना पडद्यावर जे काय सुरु आहे त्यातले काहिच कळणार नाही.

इंदु सरकार , घरची बाग मध्ये गेलीयं.
प्रोमोज तर आवडले होते याचे.
अशा या आपल्या नायिकेचं नाव आणि आडनाव आहे " इंदू सरकार "झटका लागला ना ? >>> इंट्रेस्टींग , हे लक्षातच आलं नव्हतं.

श्री दुरुस्त केलाय. काही वेळापूर्वी दोनदा संपादित करूनही घरची बाग समूहातच धागा गेला . आता दुरुस्ती झालेय Happy
आता बघितलं नाही होतंय . काही तरी गडबड होतेय खरी Wink

सक्तीची नसबंदी ??? अरे देवा.. ही का करायचे आणीबाणीला? काय प्रकरण होते हे आणीबाणी.. कोणी काही थोडक्यात समजावेल का?

ते काये ना रुन्मेस , त्यावेळेस साथ आली होती त्यात नसा मोठ्या व्हायच्या आणि त्यांना परत नसा फूटायच्या , त्या इतक्या की अगदी आणीबाणीची वेळ आली होती , मग त्यावर डाक्टरांनी एक जालीम उपाय शोधुन काढला की जी मुख्य नस आहे तिलाच गाठ मारून बंद करायची आणि अशाप्रकारे ती आणीबाणी आटोक्यात आणायची पण लोक ती करून घ्यायला घाबरायची म्हणून सक्तीची नसबंदी केली जायची .
अब समझा ? Wink

अजूनही इंदु बागेतचं आहे >> हो राहूदे आता तिला बागेतच Proud
वेळेस साथ आली होती त्यात नसा मोठ्या व्हायच्या आणि त्यांना परत नसा फूटायच्या , त्या इतक्या की अगदी आणीबाणीची वेळ आली होती >> Lol

थांबा तुमचे नाव त्या बॅशिंगच्या धाग्यावर सांगतो. चेष्टा करता होय माझी..

श्री Lol

सक्तीची नसबंदी ??? अरे देवा.. ही का करायचे आणीबाणीला? काय प्रकरण होते हे आणीबाणी.. कोणी काही थोडक्यात समजावेल का?
Submitted by ऋन्मेऽऽष

>>>>> कोण टाईप करणार तुमच्यासाठी एवढे.. ही घ्या लिंक विकी ची..

https://en.m.wikipedia.org/wiki/The_Emergency_(India)

च्रप्स, गूगाळल्यावर बरीचशी माहीती ईण्ग्रजीत मिळते. आपल्याला मराठी हवी असते म्हणून तर माबोवर येतो.

ऋन्मेऽऽष Pl read
1. Sattandh - By Arun Sadhu & Ashok Jain
2. Delhi te Raibareli - V.S. Walimbe
3. Raibareli ani tyanantar - V.S. Walimbe
These books are in Marathi and will give complete details about emergency . Today there is some problem in Marathi typing with my PC. It is little difficult to get these books but in Mumbai you can manage :-)

हे घ्या मराठीतली लिंक..

https://mr.m.wikipedia.org/wiki/आणीबाणी_(भारत)

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.

मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.

आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते. ( source -Wikipedia )

आणिबाणीतल्या दोन घटना मला आवर्जून आठवतात :
१. ज्या दिवशी ती जाहीर झाली त्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी 'सकाळ' ने त्यांची संपादकीयाची मोठी चौकट कोरी सोडली होती. बाकी सर्व मजकूराने भरलेल्या त्या पानावरचा तो रिकामा चौकोन मला फारच परिणामकारक वाटला.
२. अनंत चतुर्दशीची मिरवणूक गुमान ८ तासांत संपवण्यात आली होती. आता मला दरवर्षी या दिवशी तरी 'आणिबाणी' पाहिजेच असे वाटते !

>>नानाकळांचा नारद मोड ऑन झाला वाटते
त्यांना बहुतेक 'नारदकळा' असा आयडी हवा असेल पण वेमां नी तो राखून ठेवलाय. Wink

हा रिव्ह्यु 'घरच्या बागेत' बसून लिहीला आहे का?.. ही काय गडबड आहे? Happy

नावावरुन आणि आ णीबाणीशी रिलेटेड आहे हे ऐकुन ईदिरा गांधींवर चित्रपट असावा अस वाटल होत.
छान रिव्ह्यु नक्कि बघणार.
ईंदु नाव खुप कॉमन होत का त्या काळात?

आणीबाणीच्या माहितीबद्दल धन्यवाद. बाकी मी शोधतो. ईंदिरा गांधीचे कौतुक याचसाठी होते वाटते.

<<<<<अनंत चतुर्दशीची मिरवणूक गुमान ८ तासांत संपवण्यात आली होती.>>>> तरीही ८ तास... शहर पुणे का?

ईंदु नाव खुप कॉमन होत का त्या काळात?
>>>>>
ईंदुची कल्पना नाही पण बिंदू कॉमन होते.
तसेही बिंदू नावातही ईंदु आहेच..
आणि ईंदु नावातही एक बिंदू आहे Happy

३६ तास... अरे बापरे.. पुण्याच्या ट्राफिकबद्दल ऐकून होतो. पण परीस्थिती ईतकी बिकट असेल असे वाटले नव्हते.