संगीत सम्राट निषेध

Submitted by कल्पतरू on 25 July, 2017 - 00:36

झी युवावर रात्री एक कार्यक्रम लागतो. नाव आहे संगीत सम्राट. आदर्श शिंदे आणि क्रांती रेडकर असे दोन जज त्यात आलेल्या स्पर्धकांचं भवितव्य ठरवत असतात. तर याच कार्यक्रमात आदर्श शिंदेच्या काकांची मुलं सुद्धा स्पर्धक म्हणून आहेत. पहिल्या राउंडमध्ये त्यांनी आपली कला दाखवली आणि पुढच्या फेरीसाठी पात्र झाले. आता त्याचा आवाज हा काही सुपर डूपर न्हवता पण असो. दुसऱ्या फेरीत मात्र विचित्रच पाहायला मिळालं. त्या सपर्धाकांनी त्यांच्या आजोबांचं गाणं गायलं आणि या एवढ्या गोष्टीवर आदर्श शिंदे उठून त्याना मीठी मारायला गेला आणि टॉप २४ मध्ये ते सिलेक्ट सुद्धा झाले. आता जे काही गुणवान स्पर्धक बाहेर गेले त्यांच्यासोबत तुलना केली तर यांचा परफॉर्मन्स खूपच सुमार होता हे एखादं शेम्बड पोरगं पण सांगेल. विशेष म्हणजे आदर्श शिंदे यावेळी ताल सूर यावर जास्त काही बोलला नाही. फक्त आपल्या आजोबांचं गाणं गायलं म्हणून १०० पैकी १०० मार्क्स देणं(हा नक्कीच शिंदे परिवाराचा घरगुती कार्यक्रम नाही) आणि नातेवाईक आहे म्हणून त्यांना पुढच्या फेरीसाठी पात्र करणं हे कितपत योग्य आहे???? निषेध असो असल्या मालिकांवर. झी युवाने यात जातीने लक्ष घालावं. आजोबांची गाणी गात राहिला तर पुढे स्पर्धा पण जिंकावणार का हे त्याला??????

Group content visibility: 
Use group defaults

मी हा कार्यक्रम सुरवाती पासून बघितला. यातील काही स्पर्धक खरच खुप छान आहेत. त्यांना जज करताना अनेक वेळा मला असे जाणवले की हे बरोबर नाही झाले. नक्की काय बघून जज स्पर्धकाला निवडतात हे कळले नाही. गेले काही दिवस हा कार्यक्रम बघणे झाले नाही. आत्ता तुमच्या कडून कळाले की ह्यात अंतर्गत सेटींग झालेली आहे. हे खरच खूप वाईट आहे. अश्यामुळे एखादा चांगला स्पर्धक ह्यातून बाहेर होऊ शकतो.
जजने निपक्षपातीपणाने परिक्षण करायला हवे.

निपक्षपातीपणाने

की

नि:पक्षपातीपणा़?

कृपया गैरसमज नसावा. सहजच विचारणा करतोय. माझ्या शिकण्यासाठी!!

निपक्षपातीपणाने

की

नि:पक्षपातीपणा़?
धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल.
"कृपया गैरसमज नसावा. सहजच विचारणा करतोय. माझ्या शिकण्यासाठी!!"
मी गैरसमज करून घेत नाही. आपल्याला पटल तर पटल नाहीतर सोडून द्यायच.... उगा स्वतःच्या जीवाला त्रास करून घेत नाही.

मी पूर्वी बघत होतो हा शो पण आता नाही बघत.
एका एपिसोडमध्ये एका स्पर्धक जोडीने "तूने क्या कर डाल, मर गयी मै... तेरी दिवानी.." हे गाणे गायले. आदर्श शिंदे म्हणाला की त्यांनी त्याच्या अत्यंत फेवरेट गाण्याचे वेरिएशन करुन गायले म्हणून नाही आवडले. त्या दोघांना बाद केले. Sad
थोड्याच वेळात एंकरने आदर्शला हे गाणे गाऊन दाखवायची विनंती केली. तर एंकर आणि आदर्श दोघेही मिळून त्या गाण्याची वेगवेगळी वेरिएशन्स गाऊ लागले. Uhoh

आदर्श शिंदे बरोबर अजुन एक गायक जज म्हणून हवा होता, कारण क्रांती रेडकरचा गाण्याशी काही संबंधच नाही, त्यामुळे निर्णय पूर्णतः आदर्शच्याच हातात आहे. त्याने केलेल्या सिलेक्शन्/रिजेक्शन्ला ती फक्त मम म्हणत असते. (निदान मी पाहिलेल्या एपिसोड मध्ये तरी)

यातला एंकर जरा आगाऊच वाटतो. कोणी गाऊ लागला तर साथ द्यायची सोडून त्याचे गाणे स्वतःच हायजॅक करतो.
शिवाय बाष्कळ आणि पांचट विनोद म्हणजे कहरच

आदर्श शिंदे बरोबर अजुन एक गायक जज म्हणून हवा होता, कारण क्रांती रेडकरचा गाण्याशी काही संबंधच नाही, त्यामुळे निर्णय पूर्णतः आदर्शच्याच हातात आहे. त्याने केलेल्या सिलेक्शन्/रिजेक्शन्ला ती फक्त मम म्हणत असते. (निदान मी पाहिलेल्या एपिसोड मध्ये तरी)<<+११

तो अन्कर तर निव्वळ फाल्तु आहे....

यातला एंकर जरा आगाऊच वाटतो. कोणी गाऊ लागला तर साथ द्यायची सोडून त्याचे गाणे स्वतःच हायजॅक करतो.
शिवाय बाष्कळ आणि पांचट विनोद म्हणजे कहरच.....>>>++++++१११

क्रांती ही नेहमीच 'प्रेक्षकाच्या भूमिकेतून' मार्क देते. मग तिला जज म्हणुन कशाला बसवायचं? प्रेक्षकातच बसु द्या की.
आदर्श हा माजोरडा आहे हे स्पष्ट मत. त्याला स्वता:ला गाण्यातलं काय कळतं हा मोठा प्रश्न आहे. त्याचा स्वत:चा आवाज सुरात लागत नाही. त्याला वाटतं म्हणुन तो कमी-जास्त मार्क्स देतो.

मी हा प्रोग्रॅम नेहमी बघत नाही पण एक भाग पाहिला तेव्हाच कळले कि किती पुअर judgment आहे ....

जसे कि एका स्पर्धकाने एक song जलतरंग वर खूप सुरेख वाजवले होते तर त्याला नाही घेतले .. ... आणि काही लोकांनी मिळून शाळेच्या पोएम्स गायल्या तर त्यांना डायरेक्ट १००% ( जे मला एवढे विशेष वाटले नाही) Sad

माझी बहीण म्हणाली (जी प्रोग्रॅम बघते)कि आदर्श शिंदे गुड looking मुलींना लगेच सिलेक्ट करतो ... Uhoh Angry

तो अँकर म्हणजे रोहित राऊत, लिट्ल चँप्स मधला. रॉक स्टार बनण्याच्या नादात आवाजाची पार वाट लावुन घेतलीये त्याने.

माझी बहीण म्हणाली (जी प्रोग्रॅम बघते)कि आदर्श शिंदे गुड looking मुलींना लगेच सिलेक्ट करतो ... +११११

मधे मी फार बडबड करणा-या रेडिओ चॅनलवर या कार्यक्रमासंदर्भात क्रांती आणि आदर्श ची मुलाखत लागलेली ती ऐकत होते.. त्यात ती तिच्या गायनाच्या अलौकिक अकलेचे जे काही तारे तोडत होती ते ऐकून आधी वाटलं की बाई गं निदान बोलून स्वतःची हॅटाई तरी करून घेऊ नकोस.. मग त्या मुलांचं फार वाईट वाटलं.. पालकांना पण कळत नाही का..? btw मी tv बघत नाही..

मला तर आदर्श शिंदे नावाची कोणी जज होण्याच्या लायकीची व्यक्ती आहे हे देखील हा बाफ वाचूनच कळलं Happy

बाकी असल्या शो मार्फत एखाद्या वशिल्याच्या जेमतेम गुणवत्ताधारकाला फेमस करायला प्लॅटफॉर्म देणे ही चांगली आयडीया आहे.

मोठेमोठे जुने स्टार आपल्या मुलांसाठी ईंट्रोड्यूस करायला होम प्रोडक्शनमध्ये पिक्चर काढतात तसे एखादा रिअ‍ॅलिटी शो काढायचा..

कल्पतरू यांच्या मताशी 100 टक्के सहमत. मी एकच भाग पहिला, ज्यात एक नागपूरकर व्यक्तीने "सूर निरागस हो" हे गाणे गायले. त्या व्यक्तीने हे गाणे अतिशय तन्मयतेने आणि सुरात गायले. काही जागा त्याने वेगळ्या प्रकारे गायल्या ज्या चांगल्या होत्या. मग क्रांतीबाईंना पवित्रतेची जाणीव झाली तर शिंदेंना गायकाचे मन साफ असण्याची! पण या स्पर्धकाला शिंदेंनी बाहेरचा रस्ता दाखवला, का तर त्याने ज्या जागा वेगळ्या प्रकारे गायल्या त्या शिंदेंना आवडल्या नाहीत! जणू काही कोण जास्तीतजास्त चांगल्या प्रकारे एखाद्या गाण्याची नक्कल करतो याची स्पर्धा सुरू आहे. एखादा कार्यक्रम कसा असू नये याचे संगीत सम्राट हे उत्तम उदाहरण आहे.

आदर्श शिंदेच्या चुलत भावंडांनी स्पर्धेत भाग घेतला तरी आदर्श शिंदे त्यावेळी जज असणे बरोबर वाटत नाही. हे प्रोटोकॉलला धरुन वाटत नाही.

कंपनीमध्ये जर तुम्ही कोणाला रेफर केले आणि तुम्ही इंटरव्यू पॅनलमध्ये असाल, तर तुम्हाला इंटरव्यूमध्ये सहभागी करत नाहीत. इथे मात्र जाहीरपणे सगळे प्रोटोकॉल धुळीस लावले आहेत.

संगीत स्पर्धा असो वा इतर नृत्य वगैरे. आजकाल यातले खरे सूर हरपलेत. मागे सारेगामा साठी देवकी पंडित वगैरे सारखे क्लासिकल गायक-गायिका परीक्षक म्हणून होते/ होत्या. आता सगळे नियम स्वतः झीनेच धाब्यावर बसवलेले दिसतायत. आदर्श शिंदेला कुठल्या निकषावर जज म्हणून घेतले. केवळ तो सिनेमा आणी मालिकांमध्ये गातो म्हणून? काय बेस आहे त्याचा? मग त्याच्यापेक्षा जज म्हणून अभिजीत कोसंबी केव्हाही चांगला. निदान तो संगीत क्षेत्राचे पावित्र्य तरी राखुन आहे. नुसते झँग पँग कपडे आणी दागिने घालायचे आणी मिरवत सुटायचे. आदर्श हा मराठीतला बप्पी लहिरी शोभेल.

एक चांगली गोष्ट म्हणजे आ. शि. "महागुरु" सारखे पकवत नाहीत. Proud
निदान 'महागुरूं'कडे बराच अनुभव आहे. बाकिची चर्चा सोडल्यास त्यांचे निर्णय योग्य असायचे.