Submitted by santosh watpade on 24 July, 2017 - 04:05
भिजतात पावसाने गावामधील पोरी
गंधाळल्या कणांनी भरते घरात दोरी
पुसला जरी कितीही वाफाळतो भिलावा
दिसतात व्रण गुलाबी टाचेवरी बिलोरी...
भिजतात पावसाने गावामधील पोरी
वेल्हाळतात नजरा कोठेतरी टपोरी
सरवा पुनवर्सूचा मातीत खोल मुरतो
झंकारतात त्यांच्या कायेवरी सतारी...
भिजतात पावसाने गावामधील पोरी
असतो मनात त्यांच्या आपापला मुरारी
पाऊलवाट अल्लड ओलांडुनी मनाची
जातात भेटण्याला काळोखल्या दुपारी...
भिजतात पावसाने गावामधील पोरी
सुकवून अस्तरांना खोळंबतात दारी
बंदिस्त पाखरांना घेता न ये भरारी
मन धावते तरीही भरल्या नदीकिनारी...
-- संतोष वाटपाडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच! बंदिस्त पाखरांना घेता
मस्तच!
बंदिस्त पाखरांना घेता न ये भरारी
मन धावते तरीही भरल्या नदीकिनारी... >>> +१११
सुंदर
सुंदर
अबोध भावविश्वाचे अनवट
अबोध भावविश्वाचे अनवट शब्दचित्र !
मस्तच.
मस्तच.
वाह
वाह
छान आहे. पूर्ण समजली असे नाही
छान आहे. पूर्ण समजली असे नाही, पण वाचताना आवडली.
छान आहे
छान आहे
भिलावा
बिलोरी...
सरवा
या शब्दांचे अर्थ सांगा ना
भिलावा = बिब्बा
भिलावा = बिब्बा
बिलोरी = काचेप्रमाणे
सरवा = पिक कापणीनंतर उरलेल्या पिकाच्या काड्या,फळे इत्यादी
धन्यवाद मित्रांनो....
मस्त !
मस्त !
सुरेख , आशय आण शब्द दोन्ही
सुरेख , आशय आण शब्द दोन्ही आवडले