Submitted by kaljayee on 29 September, 2009 - 06:49
तुझी वाट आहे घरास या
तुझा ध्यास आहे मनास या
किती सोसले तुझ्यावीना मी
पुरी जाण आहे ह्रुदयास या
परवा न केली मी वादळांची
तुझा धीर होता जीवास या
गेले हजारो जरी येथुनी
तुझी ओढ आहे रस्त्यास या
आहे सुखांची चव खारलेली
तुझे भास आहे डोळ्यांस या
आयुष्य माझे तुला वाहिलेले
तुझे कर्ज आहे जगन्यास या
गुलमोहर:
शेअर करा
छान!
छान!
ग्रेट ! -हरीश
ग्रेट !
-हरीश
गेले हजारो जरी येथुनी तुझी ओढ
गेले हजारो जरी येथुनी
तुझी ओढ आहे रस्त्यास या
वाह्....कालीजयी, मस्त
आहे सुखांची चव खारलेली तुझे
आहे सुखांची चव खारलेली
तुझे भास आहे डोळ्यांस या
>> वा ! मस्त