फ्रिज आज घ्यावा कि उद्या? प्रासंगिक धागा.

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 June, 2017 - 00:57

फ्रिज आज घ्यावा कि उद्या? प्रासंगिक धागा.

GST उद्या फ्रिजला महाग करणार की स्वस्त?

प्रासंगिक धागा. परवा डिलीट केला तरी हरकत नाही. आज बरेच जण गोंधळात आहे. मी सुद्धा. काही दिवसांपूर्वी फ्रिजच्या धाग्यावर चौकशी केलेली, पण गेले महिनाभर फ्रिज घ्यायला मुहुर्त सापडत नव्हता आणि आता सापडला तो हा...
नुकतेच एक मित्र बोल्ला की विजय सेल्समध्ये झुंबड उडालीय कारण उद्या महागणार. तर एक जण बोल्ला की त्यांचा पोपट होणार कारण उद्या ईलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार. प्रॉब्लेम असा झालाय जे सरकार समर्थक आहेत ते सगळेच स्वस्त होणार बोलत आहेत. जे विरोधक आहेत ते सगळंच महागणार बोलत आहेत.
उगाच घाईगडबडीत एक दिवसाच्या अंतराने काही मोठा फटका नकोय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डीस्टॉकिंग करण्यासाठी डिलर २०-५० % डिस्काउंट देत आहेत. असे काहि डिस्काउंट मिळत असेल तर लगेच आजच घ्या. टॅक्स चा फार फरक पडणार नाहि.

शोरुम ला डिस्प्ले ला असलेला पिस भरपुर डिस्काउंट ला डिलर बाहेर काढत आहेत. फ्रीज सारखि वस्तु डिस्प्ले ला असली तरी घ्यायला हरकत नाहि.

नको रे घेऊ. काहीतरीच काय.
मग पुढच्या पॉलिसी डिसिजनला धागा काढायला तुला (मोजे आणि हातरुमाल आणि फ्रीज झाल्यावर) आणि काही तरी भलतंच घ्यायचा धागा काढावा लागेल. तसं नको.
नोन डेव्हिल बरा. परत फ्रीज घेऊ का हा धागा काढायची गुन्जाईश ठेव बर.

एक बीएम डब्य्लू , एक हिर्‍यांचा नेकलेस, बिझनेस क्लास ची दोन तिकीटी, एक फायुस्टार मध्ये जेवन हे पण आजच आज्ज्ज्ज्जच करायला पाहिजे उद्यापासून २८% ट्याक्स. असं मी माझ्या साउथ बाँबेतल्या मैत्रिणीला सांगून आलेय. बघू काय करते.

अमा मला खरेच फ्रीज घ्यायचाच होता आणि आहे. हवे तर फ्रिजचा धागा बघा नुकतेच चौकशी केलेली. ही जरा स्पेशल आणि अर्जण्ट केस झाल्याने लवकर आणि अचूक उत्तर मिळायला तसेच जीएसटी जाणकारांचे ईथे लक्ष वेधायला स्वतण्त्र धागा काढला आहे.

प्लीज प्लीज मदत करा..
वर घाईघाईत आगावू धन्यवाद लिहायचे राहिलेय ते आता लिहितो..
संध्याकाळी 7 पर्यण्त निष्कर्श निघाल्यास बरे पडेल..

टोचा,
डीस्टॉकिंग का करत आहेत पण?

डीस्टॉकिंग का करत आहेत पण? >>>>>

कारण जो माल आत्ता स्टॉक मधे आहे त्याची कराअकारणी जुन्या पद्धती ने झाली आहे. हा जो ट्रांझीयंट माल आहे त्याच्या वर जुन्या टॅक्स चा ऑफसेट वगैरे कसे मिळतील ह्या बाबतित गोंधळ आहे. व्यापारी शक्यतो असली रिस्क घेउ इच्छित नाहीत.

उद्या जीएसटीचा इन्वॉइस तरी तयार होऊ शकेल कि नाही अश्या भिती पण आहेत. त्यामुळे सर्व माल मोकळा करायचा असे बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे.

ओह. म्हणजे नोटाबंदीसारखंच सुनियोजित प्रकरण दिसतंय जीएसटी. हॉटेलं पण आज रात्री साडे अकरा ला बंद होणार म्हणे.
इतकं टेन्शन तर y2k च्यावेळीही नव्हतं आलं.

गर्लफ्रेंडचा मुद्दा लक्षात ठेवून डबलडोर हवा.
( हरिपुत्तरमधला डंबलडोर नव्हे)

# जुना नवा ट्याक्स आणि नवा जिएसटी याचा डिलरला काय फरक पडणारे? तो वाढीव गिह्राइकाच्या डोंबलावर थापणारच. ओफसेट करून उरलेला भरतील.

ऋ, फ्रिजचा रंग गर्लफ्रेंडला तिच्या कारला मॅचिंगचा हट्ट असेल तर मात्र घाई कर.कमी पिसेस उरले असतील.

असं केलं तर?
डबल डोअर चा एकच मोठा घेण्याऐवजी दोन लहान घ्यायचे. एक आज जुन्या स्टॉकमधला आणि एक नविन येणार्या GST वाल्या स्टॉकमधला..म्हणजे दोन्ही 'प्रासंगिक' अनुभव!! Wink

अमा मला खरेच फ्रीज घ्यायचाच होता आणि आहे>>घे की मग. आज चांगला दिवस आहे. फ्रिज जगातून पळून नाही जाणारे, कोन्चा ब्रँड हवा आहे. आपण चेअर्मनला फोन किंवा ट्वीट करू. फ्रिज हजर. मला बरोबर यायला पण आवडले असते. मला असली खरेदी फार आवडते. तुमच्या एरिआतल्या विजय सेल्स किंवा कोहिनूर, रिलायन्स ट्रेंड्स मध्ये जा हपीस संपले की. गर्दी फार असेल आज असे वाट्ते.

सुटले ऑफिस.. गर्ल फ्रेण्डलाही बरोबर नेतोय..
विजय सेल्स किंवा कोहिनूर, रिलायन्स ... या तिन्ही ठिकाणी सेल डिस्काऊण्ट चालू आहे का.. मला ते रिलायन्स नाव ऐकूनच काहीतरी चोर फिलिंग येते.. तिथे नाही जाणार.. पहिले विजय सेल्स ट्राय करायचा विचार आहे.. किंवा वेळ मिळाल्यास दोन तीन ठिकाणी चक्कर टाकतो.. आज बारापर्यण्त उघडी असतील का दुकाने?

ghetalA kA?

घेतला का? कोणत्या कंपनीचा? कितीला? किती फरक पडला?
किती उत्सुकता माबोकरांना ऋन्मेषच्या फ्रीजबद्दल.
आणि तो लिहायला लागला की वरुन त्याला बोलतात.

किमतीत किती फरक पडला हे जाणून घ्यायला आख्खी मायबोली उत्सुक आहे >>> Rofl जणु काही ऋन्म्याच्या दुसर्‍या लग्नाचीच उत्सुकता .

आणि तो लिहायला लागला की वरुन त्याला बोलतात.
>>>>
हे वरून बोलतात वाचून मला आमच्या जुन्या चाळीतली दहीहण्डी आठवली. आम्ही खाली मैदानात खेळायचो आणि वरून चाळकरी पाणी टाकायचे. प्रेम म्हणतात याला Happy

आज पुन्हा जाऊन किंमत विचारायचा सल्ला भारी आहे, पण उगाच पोपट झालाय हे समजले तर जीव जळणार नाही का? त्यापेक्षा चांगले डील मिळवलेय असे जे सध्या वाटतेय त्या धुण्दकीत राहू द्या की ..

येनीवेज, आताच विकेंड साजरा करून परतलो आहे, दमलो आहे, उद्या नक्की थोडक्यात वा सविस्तर काहीतरी लिहितोच. सविस्तर लिहीले तर मात्र स्वतण्त्र धागा काढणार हा, आधीच सांगून ठेवतो..

अमा आपल्या आणि माझ्या गर्लफ्रेंडच्या आवडीनिवडी जुळतात. आताच तिने माझ्याकडून फ्रिजच्या नावावर आईसक्रीम पार्टी उकळली. वर तोण्डाला लावायला म्हणून पिझ्झा खाला.. लसूणी पावासोबत..

Pages