कथा आणि व्यथा
इंग्लीश स्कूलचं फॅड
गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?"
तो:"कशाला म्हंजे...? पोरग टाकलं की शाळात"
मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?"
तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला."
मी: "किती पैसं भरलं ?
तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून."
मी:"आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?"
तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू"
मी:" पोराचं काय वय?"
तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा."
मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं "
तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आता हे काय आम्ही सांगायचं का तुम्हाला. उग कशाला याड घेता?"
मी:"गावात शाळा आहे सरकारी.अंगणवाडी आहे बरं सारं फुकाटं उग़ कशाला खर्चात पडतो?"
तो:गावात हाय.सार हाय .फुकाट हाय पण ते मराठी हाय. आपल्याला इंग्रजी पायजे"
मी:"का ?मराठी भाषा आपली मातृभाषा ना रं ? "
तो: कोण शिकतं मराठी ? सा-या मोठया लोकांची पोरं इंग्लीशच शिकत्यात.उग आपल्याला चुत्या काढतेत.आमच्या निल्यानं सांगितल सारं खरं.ते काय कमी शिकलाय व्हयं?ही साळा अख्खी ताब्यातचं दिली की त्याच्या"
मी:"आता हयो निल्या कोण ?"
मी:आमच्या थोरलं पोरग ना ते.लय चाप्टर..!"
मी: "मुकादम पैसं देणाऱ मग कर्ज कशाला?"
तो: " पुस्तकं.कपडे घ्यावी लागतात.त्याचं सात हजारं दयाचेत."
मी:अरे,सारं फुकटंच सोडून का खर्चात पडतो? अजून तर तुझ्या मुलाचं शाळाचं वय नाही ."
तो:सर, ठरलं एकदा .पोरग इंग्लीस स्कूलातचं शिकणार .आमचं जिनं गेलं पाचाटात .त्याला नाय या नरकात येऊ दयायचो. मोठा सायब करणार हाय मी त्याला.घाणं राहू पण इंग्लीशचं शिकू "
मी: "इंग्लीश स्कूल काय सायबाचा कारखाना काय ?"
तो: कारखाना असतो व्हय कुठं ? तुम्ही मही मज्जाच घ्याताव की सर ?"
मी: नाय बुवा तुझी कशाला मज्जा करू. सारं विचारवंत म्हणत्यात मातृ
माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ....!!
(परशुराम सोंडगे,पाटोदा बीड . . . . .9673400928)
. .
वाईट वाटते इंग्रजी शाळेचा
वाईट वाटते इंग्रजी शाळेचा असला अट्टाहास बघून.
कमीतकमी चांगला इंग्रजी तरी
कमीतकमी चांगला इंग्रजी तरी बोलेल पोरगा ..
चांगला देसीजन आहे... सलाम त्या आई बापाला.. कौतुक आहे
English medium angaNwadi or
English medium angaNwadi or sarkaari shaLa chalu zali pahije.
माझी बोलती बंद झाली. एेपत
माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ....!!
<<
सोंडगेसाहेब,
ऐपत नसताना नादारीवर/नाममात्र खर्चात शिकता येऊन सरकारी खर्चाने डॉक्टर/इंजिनियर/आयायटीयन/आयेएस इ. होण्याचे (अमुकतमुककालीन) दिवस कधीच संपले.
आजकाल, त्याच काळच्या शिक्षणाने स्थिरस्थावर होऊन, प्रत्येक गोष्टीत पाश्चात्य बिनडोकपणा आणून, त्याच वेळी आमचा हिंदुस्थान किती भारी व गेल्या सरकारांनी केलेले पाश्चात्यांचे अनुकरण किती वाईट असे डंके पिटण्याचे दिवस आहेत.
शिक्षण महाग करणे हा तर यातला एक अगदी सिंपल भाग आहे. पूर्वी धर्माने शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचणार नाही अशी व्यवस्था केली होती. आज पैशानं तेच करणं सुरू आहे. हळूवार, संयत व अभ्यासूपणे.
जगात १४३ देशांत जीएस्टी असतो. आम्हीही आणू. पण इतका फडतूस अन लोकल कंडिशन्सचा विचार न करता आणू की इथल्या मायक्रो इकॉनॉमीची वाटच लागली पाहिजे.
प्रदुषण नियंत्रण. कायदे अगदी शब्दन शब्द अमेरिकेतून कॉपी-पेस्ट केलेले.
त्याच वेळी जंगले, आदिवासी पट्टे, अगदी अभयारण्यांच्या जमीनी डेव्हलपमेंटच्या नावाखाली कायदेसीरपणे वाटेस लावणे सुरू आहे.
इतरही काय वाट्टेल ते पहा. जिकडे तिकडे विकासच विकास.
तेव्हा, तुमच्या लेखानिमित्ताने आलेला उद्वेग संपेल, तेव्हा मेहमूदचा कुँवारा बाप पहा, असे सुचवितो.
अन मग त्यानंतर तुमच्या नामारावांच्या परिप्रेक्ष्यातून जग पहा. He is willing to work his ass off to be able to give his son a better future. Its his decision. In my opinion, you should help him by expediting his loan rather than trying to tell him, "अंथरूण पाहून पाय पसर"
अमेरिकेत सामान्यांना युनिव्हर्सिटीत जायचं तर अर्ध्याहून अधिक आयुष्य फेडावं लागेल इतकं स्टुडंट लोन घ्यावं लागतं. नाहीतर हायस्कूल "ग्रॅज्युएट" म्हणून कामधंद्यास लागावं लागतं.
आपल्याला आप्ल्या देशाची भगवी आम्रिका नैका करायची?
English medium angaNwadi or
English medium angaNwadi or sarkaari shaLa chalu zali pahije.
>> पण का?
हा अट्टाहास का? मराठी लोकांनी खचाखच भरलेल्या महाराष्ट्रात इंग्लिश भाषेत चाकरी सोडून पोटापाण्यासाठी काहीच सन्माननीय व्यवसाय नाहीत हे पटत नाही.
आरारा ह्यांचा प्रतिसादही पटला नाही. मुल नुसतं इंग्लिश शाळेत गेल्यानं त्याचं भलं होणार आहे हे अझम्पशन आहे त्यात. त्याच्या आकलनाचं काय? शाळेची गुणवत्ता उत्तम होते काय माध्यम इंग्लिश झाल्याने?
मुळात का ह्या प्रश्नाचं उत्तरच फार त्रासदायक आहे. नानाकळा ह्यांचा लेख मला उत्तम वाटला ह्या बाबतीत.
एकंदरीत पुलंच्या " कुंभार हो - गाढवास तोटा नाही " ची वारंवार जाणीव होते सगळीकडे.
<<<मराठी लोकांनी खचाखच
<<<मराठी लोकांनी खचाखच भरलेल्या महाराष्ट्रात इंग्लिश भाषेत चाकरी सोडून पोटापाण्यासाठी काहीच सन्माननीय व्यवसाय नाहीत हे पटत नाही.>>>
खचाखच भरलेले मराठी, महाराष्ट्रात सुद्धा हिन्दी किंवा इंग्रजी किंवा गुजरातीत बोलतात. विशेषतः धंद्यासंबधीच्या व्यवहारात.
गुजराती, यूपीवाले, लोक महाराष्ट्रात येऊन मराठी बोलणार नाहीत. आपल्याला त्यांच्याशी धंदा करायचा असेल तर आपल्याला त्यांची भाषा बोलावी लागते - नाहीतर इंग्लिश!
<<<मुल नुसतं इंग्लिश शाळेत गेल्यानं त्याचं भलं होणार आहे हे अझम्पशन आहे त्यात. त्याच्या आकलनाचं काय? शाळेची गुणवत्ता उत्तम होते काय माध्यम इंग्लिश झाल्याने?>>>
हे प्रश्न योग्य असले तरी अजून मराठीतून बरोबर उत्तर देण्यापेक्षा इंग्रजीतून चुकीचे उत्तर दिले तरी चालेल असे जर असेल महाराष्ट्रात, नि त्यानेच
पैसे मिळणार असतील तर त्याचे भलेच झाले म्हणायला पाहिजे.
सध्या बिचार्याला तोच एक मार्ग माहित असेल, भले करून घेण्याचा.
इंग्रजी नाही आले तरी चालेल अश्या नोकर्या द्यायची व्यवस्था जर कुणि मराठी भाषा प्रेमी लोकांनी केली तर कदाचित असे इंग्रजी शाळेचे महत्व कमी होईल.
तोपर्यंत ही वस्तुस्थिती आहे, तक्रारी, आश्चर्य करण्यापेक्षा, काम करायचे, तर लागेल ती भाषा शिकावी लागते.
झक्की - इंग्लिश न येता उत्तम
झक्की - इंग्लिश न येता उत्तम कमवू शकणारे असंख्य लोक मी आजूबाजूला बघतेय. श्रमप्रतिष्ठा आणि इंग्लिश येणं म्हणजे शहाणं / हुशार ही मानसिक गुलामगिरी सोडली तर खरच जमू शकतं.
ह्या घडीला इंग्लिश भाषा आल्यास फायदा होतो ह्याबद्दल दुमत नाही. पण इंग्लिश भाषा म्हणून येणं आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्लिश ह्यात गल्लत होतेय का?