आणि तो रडु लागला - परिस्थितीजन्य कोडे

Submitted by मानव पृथ्वीकर on 25 May, 2017 - 15:28

पकोडेच आहे हे. पण फरक असा की यात प्रश्न विचारायचे नाहीत. खाली एक छोटीशी घटना दिली आहे.
त्यावरुन तुम्ही नक्की काय घडले असावे हे ओळखायचे / सांगायचे आहे. उत्तरे अर्थात अनेक असतील. तर आपल्या कल्पनाशक्तीला ताण द्या आणि येऊ द्या तुमची उत्तरे.

खुर्चीत तो वाचनमग्न होता. त्याच वेळी सिगरेट मग्न सुद्धा. वाचता वाचता अधुन मधुन झुरके घेत होता, झुरके घेत अधुन मधुन तो वाचत होता.
मध्येच एका बातमीने त्याचे एकदम लक्ष वेधले. ती वाचून पूर्ण झाल्यावर त्याने झुरका घेण्यास हात पुढे आणला आणि बोटांमधील सिगरेटकडे पाहिले. काही क्षण पहातच राहिला. आणि मग तो रडु लागला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चप्र्स यांची पहिलीच पोस्ट: राईट ट्रॅकवर आहे, मूळ कथेकडे जाण्यास. अर्थात ती मूळ कथा पण अनेक शक्यतांपैकी एक... सगळ्यांनी हाच ट्रॅक पकडला पाहिजे असे नाही.

राया, तुम्न्ही दिलेली पहिली शक्यता सिच्युएशनमध्ये बसते.

१. कदाचित मनोरुग्णालयातुन रुग्ण पळाल्याची बातमी असेल? आणि त्याच्या हातातली सिगारेट पेटवलेलीच नसेल. किंवा लहान मुले पितात ती कँडी सिगरेट असेल.>>> हे मात्र कळले नाही. यात तो का रडेल? अजून संदर्भ हवा.

असामी दोन्ही शक्यता चपखल बसतात.

ऋन्मेष: दिलेल्या माहीतीपलीकडे काही क्लु वापरू शकतो का?... >>> ऋन्मेष हरकत नाही. पण दिलेल्या माहितीचा अजिबात संबंध नाही असेही व्हायला नको.

पेपर मधली स्टोरी वाचता वाचता त्याच्या हातातली सिगरेट जळत राहिली . ती थेट जळून त्याच्या बोटांपर्यंत आली. पण त्याला कळलेही नाही. झुरका घेण्यास हात पुढे आणल्यावर त्याला प्रसंगाचे भान आले आणि तो रडू लागला कारण डायबेटिसमुळे आता त्याच्या हातातली संवेदनाही कमी झाली होती हे त्याच्या लक्षात आले. एक वर्षापूर्वीच त्याचे दोन्ही पाय अ‍ॅम्प्युट करावे लागले होते. आता हातही .... ???? निराश होऊन तो रडू लागला.

............ आणि पेपरात बातमी होती ..... " डायबिटिसवर हमखास उपचाराचा शोध!"

पकोडे-१ धाग्यावरुन झालेल्या चर्चेनुसार परिस्थितीजन्य कोडे प्रश्नोत्तरांशिवाय दिल्या जावे वेगवेगळ्या कल्पना रंगल्या जाव्या असा प्रस्ताव आला. म्हणुन हे कोडे - प्रश्नोत्तरांशिवाय. (म्हणुन याला पकोडे नाव न देता परिस्थितीजन्य कोडे असेच दिले आहे. पकोडे नाव हे प्रश्नोत्तरांच्या कोड्यांसाठी वापरु या.)

तर प्रश्नोत्तरांशिवाय अजून कल्पना येउ द्या.

वाटल्यास नंतर याला प्रश्नोत्तरांच्या खेळाकडे नेता येईल, मूळ कोड्यातील कथानक ओळखण्यास.

पेपर मधली स्टोरी वाचता वाचता त्याच्या हातातली सिगरेट जळत राहिली . ती थेट जळून त्याच्या बोटांपर्यंत आली. पण त्याला कळलेही नाही. झुरका घेण्यास हात पुढे आणल्यावर त्याला प्रसंगाचे भान आले आणि तो रडू लागला कारण डायबेटिसमुळे आता त्याच्या हातातली संवेदनाही कमी झाली होती हे त्याच्या लक्षात आले. एक वर्षापूर्वीच त्याचे दोन्ही पाय अ‍ॅम्प्युट करावे लागले होते. आता हातही .... ???? निराश होऊन तो रडू लागला.

............ आणि पेपरात बातमी होती ..... " डायबिटिसवर हमखास उपचाराचा शोध!">>>>

मामी, सहीच एकदम!!! हॅट्स ऑफ!
तू दिलेल्या उत्तरात पेपर मधिल नक्की बातमी काय याचा संबंध असण्याची आवश्यक्ता नाही. एक बातमी होती जी त्याला गुंतुन ठेवते आणि सिगरेट कडे काही काळा त्याचे लक्ष जात नाही, एवढेपण पुरेसे आहे तुझ्या उत्तरात.

मामी, नेहमीप्रमाणेच झकास<<+११

पेपर मधली ती बातमी म्हणजे डबल ट्रॅजेडी. उपाय असुनही हात पाय कापल्यावर त्याचा उपयोग नाही.

एक दिवस कधीतरी त्या कापलेल्या हातपायांवरही एखाद्या पेपरात उपाय येऊ शकतो... फक्त तोपर्यंत आयुष्यच संपायला आले असेल तर ती आणखी एक ट्रॅजेडी.

चांगला धागा आहे मानवजी. सॉरी जरा उशीरा येणं झालं.
मला ज्या शक्यता मांडायच्या होत्या त्या आधीच मांडलेल्या आहेत. तरी अजून विचार करतो

मला असामी आणि मामी यांच्या शक्यता अगदी चपखल बसणाऱ्या वाटल्या.
असामींची शक्यता क्र. १ सारखीच शक्यता मी मांडण्याकरता आलो होतो.

मैत्रेयी आणि अमितव यांचे तर्कही भन्नाट, out of the box. पूर्ण लांबीच्या कथांची क्षमता असणारे.

ऋन्मेशचे प्रतिसाद वाचून मजा आली. विशेषतः हा :

कदाचित त्याने सिगारेट आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीत प्यायला सुरुवात केली असावी आणि पेपरात तिच्या लग्नाची किंवा मृत्युची बातमी आली असावी. (तसेही दोन्ही एकच) Lol खरंय

Pages