पाणीपुरीवाल्यासारखी पाणीपुरी घरच्या घरी कशी करावी?

Submitted by बाहुबली on 26 May, 2017 - 04:02

भारतात पाणीपुरी न खाणारा, पाणीपुरी न आवडणारा माणूस विरळाच!

बाहेर ठेल्यांवर मिळणारी पाणीपुरी चटपटीत, चवदार असते खरी पण तितकीच आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यात वापरलेले पाणी, भांडी अस्वच्छ असतात. फूड इन्फेक्शन होऊ शकते.

हे सगळे टाळण्यासाठी आम्ही घरी एवरेस्टचा पाणीपुरी मसाला वापरून घरी पाणीपुरी करतो तर तिला काही विशेष चव येत नाही.

पाणीपुरीवाले कुठला खास मसाला वापरतात काय? अनेक पाणीपुरीवाल्यांना याविषयी विचारले तर कोणीही काही सांगितले नाही. अर्थातच त्यांचे ट्रेड सिक्रेट का उघड करतील म्हणा.

तर मायबोलीकरांनो,
घरी केलेली पाणीपुरी चटाकेदार होण्यासाठी काय करावे?
यासाठीच्या पाककृती, टिप्स असतील तर सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाणीपुरी मसाल्याशिवाय पाण्यात पुदीना, लिंबूरस, साखर घाला. मिरची, कोथिंबीरही वाटून घाला.
पाणीपुरीचा एक बीबी आहे त्यावर वेगवेगळ्या पाण्यांच्या कृती आहेत.

अरे बाहुबलीला काय अशक्य आहे...तो तर सगळे करु शकतो

आम्ही डी- मार्ट मध्ये मिळणारा ओला पाणीपुरी मसाला घालुन करतो दुसरे काहीही न घालता खुप छान चव येते अगदी बाहेर मिळणार्या पाणीपुरी सारखी

१-२ मिरच्या (बिया काढून), २ मूठ कोथिंबिर, २ मूठ पुदीना, चमचाभर जिरे (किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी-जास्त) , मीठ हे सगळं मिक्सर मधे वाटून घ्या आणि मग अजून पाणी घालून डायल्यूट करून घ्या. आता एव्हरेस्ट चा पाणीपुरी मसाला + चाट मसाला टाका. असं पाणी चांगलं चटकदार बनतं.

सगळं मिक्सर मधे वाटून घ्या>>

दगडावर वाटा.
गोड चटणी - खजुर चिंचेची
रगडा -पांढय्रा वाटाणे उकडून धणे जिरे पावडर लावून करा हा थोडा पुरीत खाली टाकायचा म्हणजे खाली भोक असलेल्या पुरीतून पाणी लगेच गळत नाही.
पुय्रा पाण्यात बुचकळल्या की बाहेरुनही आंबटतिखटगोड चव लागते. नुसते पाणी आत भरून काम होत नाही
रगडा नसेल तेव्हा साधीबुंदी थंड पाण्यात भिजवून वापरायची. पाणी माठातले गार हवे. मिरचांऐवजी काळी मिरी हवी

३ मुठी पुदिना, ४-५ मिरच्या (किंवा सोसतील एवढ्या), चमचाभर जीरं, थोडं आलं, एखादी लसणाची पाकळी, साधं मीठ, सैंधव, पादेलोण, सुहानाचा चाट मसाला आणि अ ग दी थोडी (अर्धा चमचा साखर). सगळे मिक्सरमधून बारीक करा - अगदी गंध होईतो. पाणी घालून पातळ करून घ्या. चव बघून सीझनींग अ‍ॅडजस्ट करा.

गोड चटणीला वाटीभर चिंच आणि १ वाटी खजूर घालून रात्रभर भिजवून घ्या. दुसर्‍या दिवशी सगळा कोळ काढून घ्या. नुसता गूळ असेल तर साधारण तिप्पट गूळ किंवा खजूर असतील तर २ वाट्या गूळ बारीक चिरून घालून गोड पाणी बनवून घ्या. त्यात थोडं मीठ, जीरे पावडर, किंचीतसं तिखट घालून पाणी सारखं करून घ्या, फार पातळ नको. थोडं घट्टसर असू दे.

पाणीपुरीत थोडा शिजवलेला रगडा घालून थोडं गोड पाणी, हवं तेव्हढं तिखट पाणी घालून खा Happy

थण्ड पाण्यातील बुण्दीवाली पाणीपुरी बोर लागते.. फ्याड आहे ते एक नुसते.. मी तर रगड्याचीच खातो आणि त्याला तो गरमही करायला लावतो.

एसारडी यांचे पुरया पाण्यात बुचकळायचे पटेश.

थोडेसे हायजिन आणस्वच्छतेकडे कानाडोळा करता आल्यास उत्तम. निदान तसा माहौल तरी बनवायचा.

गेली दहा वर्षे झाली ही बनवत आहे. अनेक मित्र-मैत्रिणींना आवडली आहे. अमेरिकेत एखदा स्टॉल टाकायचा विचार आहे. नक्की ट्राय करुन बघा.
http://www.maayboli.com/node/58365

सुरुवातीला थोडे कष्ट वाटतात पण आता मी चटन्या फ्रीज करुन ठेव्ते एकदा केले की. मग फक्त बटाटा उअकडून, पाणी बाहेर काढून खायला घ्ञायचे. माझ्या घरात पुर्याचे पाकीट नेहमी ठेवते. Happy

हमखास न चुकणारी अगदी चौकातल्या पाणीपुरीवाल्याची टेस्ट आणायची रेस्पी माझ्याकडे आहे. पण ... Lol
हम नही बताउंगा.

कित्येक वर्षे बाहेर पाणीपुरी खाल्लीच नाही.घरीच करते.
पुदिना,कोथिंबीर्,हिरव्या मिरच्या,आले १ लवंग्,दालचिनी, जरासे धणे,,आले एकत्र वाटून तीचटणी जर्‍याशा पाण्यात गरम करायची.त्यात काळे मीठ आणि साधे मीठ घालायचे. थंड झाल्यावर त्यात थोडा हिंग(कच्चा),चिंचगुळाची चटणी २-३ चमचे,लिंबू पिळावे.त्यात अजून साधे पाणी घालावे.
गोड्या चटणीसाठी चिंच,खजूर्,गूळ, जिरे,मीठ्,तिखट घालून चटणी उकळून घ्यावी.
पुर्‍यात भरण्यासाठी मीठ्,हळद घालून उकडलेले मोड आलेले मूग आणि उकडलेला बटाटा घेते.मला मूग्+बटाटा हे कॉम्बो आवडते.

पूर्वी मी हिरवी चटणी उकळवायची,पण गरम पाण्यात जरावेळ चटणी ठेवली तर स्वाद चांगला येतो.

थण्ड पाण्यातील बुण्दीवाली पाणीपुरी बोर लागते.. फ्याड आहे ते एक नुसते.. मी तर रगड्याचीच खातो आणि त्याला तो गरमही करायला लावतो.>> मलाही फक्त रगड्याचीच आवडते. Happy

मला पाणी पुरी अजिबात आवडत नाही. आयुष्यात ३-४ वेळाही खाल्ली नसेल.
>>>>
एकेकाळी मी सुद्धा असाच होतो. मला तर समजायचेच नाही की पोट भरणारी रगडापुरी, सेवपुरी जवळपास त्याच किंमतीत भेटतेय तर लोकं नुसते नावाला रगडा टाकून पाण्याने भरलेली पुरी कसे काय खातात.. मला ती आर्थिक उधळपट्टी वाटायची Happy
पुढे आयुष्यात एक गर्लफ्रेंड (आताची नाही) आली जी न मोजता पाणीपुरी खायची आणि भैय्या जे मोजेल त्यावर विश्वास ठेवून पैसे चुकते करायची... तिने माझे पाणीपुरीबद्दलचे कन्सेप्टच बदलून टाकले. आता मी चाटवाल्याकडे ईतर काहीही खाईन पण सोबत पाणीपुरी ठरलेलीच..

ज्या दिवशी पाणीपुरी करायची असेल, त्याच्या दोन दिवस आधीपासुनच हात धुवु नयेत. जमल्यास आंघोळही करु नये. केसांना सुवासिक तेल लावावे व अधुन्मधुन केसांतुन हात फिरवत रहावे, त्यामुळे हात एकदम चविष्ट होईल. दोन चार मोजक्या भांड्यांतच सगळी क्रुती करावी (चटण्या, पाणी, रगडा वगैरे). भांडी पाणीपुरी प्रोग्रॅम संपल्याशिवाय घासु नयेत. चमचे अजिबात वापरु नयेत. सगळीकडे बोटेच बुचकळावीत. ओटा, पातेली, प्लेट्स, घाम इ. पुसायला एकच फडके वापरावे. अजुन आठवल्यास लिहेन.

राया Lol

राया प्लस वन
गावच्या पाण्याला जी चव असते ती वॉटर प्युरीफायरच्या पाण्याला नसते, जी चव चुलीवरच्या जेवणाला असते ती महागातली ईलेक्ट्रीक शेगडीला कशी येणार, जे अन्नपदार्थ मातीच्या भाण्ड्यात बनवले जातात ती चव त्यांना महागडा डिनर सेट नाही देऊ शकत..

शेवटी सत्य हेच..
आईच्या हातची चव तुम्हाला बाहेर मिळणे अशक्य..
भैय्याच्या हातची चव तुम्हाला घरी मिळणे अशक्य..
आपण फक्त तुम्ही वर दिलेले उपाय अंमलात आणून त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा Happy

जिकडे तिकडे खाजवून, अंघोळ न करता बरबटबलेल्या हातांनी आणि कळकट भांड्ञात पाणी तयार करावे. मग त्याच हाताने पुरी बुचकळावी आणि तोंडात ती पुरी टाकावी. Proud