'वाचू आनंदे' पुस्तक मालिका

Submitted by धनश्री. on 17 July, 2008 - 16:00

कोणाला ' वाचू आनंदे' बद्द्ल काही माहीत आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'वाचू आनंदे'मध्ये 'पहिलीपासूनच्या विषयांचे सार आहे' हे माधुरीताई आणि नंदिताने वाचलं तर काही धडगत नाही. या दोघींनी अतिशय मेहनतीने हे पुस्तक तयार केलंय ते पाठ्यपुस्तकं आणि शाळेचा अभ्यास याशिवाय मुलांनी काहितरी उत्तम आणि सकस वाचावं म्हणून. निवडक पुस्तकांतील उतारे, लेखकाची माहिती.. जोडीला सुंदर चित्रं, त्या चित्राबद्दल महिती असं या पुस्तकांचं स्वरूप आहे. हे पुस्तक वाचून मुलं पुस्तकं वाचतील, कलांचा आस्वाद घेण्याचा निदान प्रयत्न तरी करतील, हाच त्यांचा उद्देश आहे. कृपया त्याचा शालेय अभ्यासक्रमाशी संबंध लावू नका.

"वाचू आनंदे " ही चार पुस्तकांची मालिका अप्रतिम आहे. बाल गट -१ & २ आणि कुमार गट १ & २ असे चार भाग. प्रत्येक भागाचे मूल्य ७५ रु (फक्त)- ज्योत्सना प्रकाशन आणि राज्य मराठी विकास संस्था यांचे संयुक्त प्रकाशन. chinoox नी लिहील्याप्रमाणे संपादन: माधुरी पुरंदरे आणि साहाय्य: नंदिता वागळे. चित्रांचे मुद्रण सुरेख . कृष्णधवल असून सुद्धा जराही रसग्रहणात बाधा येत नाही. कविता, गद्य साहित्यातील उता-यांची निवड वादातीत आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावाच आणि मुख्य म्हणजे मुलांना वाचून दाखवावेच.
ह्या मालिकेने मुलांना (आणि आपल्याला )रसग्रहणाची दृष्टि विकसीत करता येईल. बाल गटाच्या भागाच्या blurb वरचा हा मजकूर : पुस्तकं आपल्याला कल्पनेच्या जगात घेऊन जातात, स्वप्न दाखवतात ; पण त्याच बरोबर आपण पहात असलेलं, ज्यामध्ये आपण जगत असतो ते जगही समजून घ्यायला शिकवतात. शब्दांमधून जसं जग दिसतं, जाणवतं तसच रंगरेषांमधूनही जाणवतं आणि तेही तितकंच मनोहारी असतं. शब्द आणि रेषांचं जग बरोबरीनं अनुभवता आलं तर आपलं जगाकडे पाहणं अधिक सुंदर होतं. म्हणूनच 'वाचू आनंदे'...
विषयवार सुद्धा ईतकी सुंदर निवड केली आहे- उदा- बालगट एक मधील Themes- निसर्ग, प्राणिसृष्टी , बालपण, कुटुंब , बालगट २ मधील Themes - घर-गाव-प्रदेश, रस्ते-प्रवास, शिक्षण, व्यवसाय/समाजजीवन, कला, भाषा, कुमारगट १ & २ मधील Themes त्याच परंतू उतारे अजून समृद्ध - at a more abstract level of understanding. उदा- बाग २- घर- ईरावती कर्वे- 'वेड लागलेलं घर', कुग २- 'घर'- महेश एलकुंचवार- 'वाडा'...
Anthology च्या मर्यादा सांभाळून सुद्धा कविता आणि उतारे अचूक निवडले आहेत, क्वचित गरज लागेल तेव्हा एक दोन ओ़ळीत कथेचा/कादंबरीचा/काय घडुन गेले ह्याचा संदर्भ दिला आहे..

मराठीतील मानदंड-इतकं सर्वसमावेशक काम आधी पाहिलं नव्हतं.पुन्हा पुन्हा वाचावी अशी ही मालिका..