ऑनलाईन कुंभारगिरी

Submitted by गजोधर on 11 May, 2017 - 07:14

नमस्कार,

अँड्रॉईड प्लॅटफॉर्म च्या जादूच्या पेटार्‍यातून काय काय गमतीजमतीचे अ‍ॅप्लिकेशन मिळतील हे सांगता येत नाही. अशीच प्लेस्टोर वर भटकंती करताना "Let's Create! Pottery Lite" नावाचे अ‍ॅप्लिकेशन सापडले. या अ‍ॅप्लिकेशन मधे तुम्ही स्वतः कुंभार बनून मातीची भांडी तयार करु शकतात. जसे कुंभार फिरत्या चाकावर एक मातीचा गोळा ठेवून त्याला आकार देत जातो. आणि मडके, पसरट भांडे, सुरई, पिण्याचे उभे मडके, इ. विविध प्रकार आपण बनवू शकतो. त्याला रंगरंगोटी करून ऑक्शन ला ते विकू द्यायचे. आणि आलेल्या पैशातून ( अ‍ॅप्लिकेशन मधले पैसे) तिथे उपलब्ध असलेले रंग, डिझाईन्स विकत घ्यायचे. जितकी चांगले मडके आणि त्याचे रंग डिझाईन बनवाल तितके जास्त पैसे आपल्याला मिळतात.

एकंदरीत सुट्यांमधे लहान मुलांच्या (मोठ्यांसाठी) एक क्रिएटीव्ह गेम्/अ‍ॅप्लिकेशन आहे.

फक्त तुम्ही बनवलेले फायनल मातीच्या भांड्याचा स्क्रिनशॉट घ्यायला लागतो. अ‍ॅप्लिकेशन मधे तो Automatic SAVING ऑप्शन नाही आहे. तसेच या अ‍ॅप्लिकेशनचा दुसरा वर्जन २०० रुपये भरून पुर्ण घेता येतो. त्यात सग़ळे ऑप्शन मिळतात

त्यांची वेबसाईट :- http://www.potterygame.com/gallery

प्ले-स्टोर अ‍ॅप्लिकेशन लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=pl.idreams.potterylite

फुल्ल वर्जन अ‍ॅप्लिकेशन :- https://play.google.com/store/apps/details?id=pl.idreams.pottery

मी काही बनवलेले भांडी इथे देत आहे. (सध्या सुरुवात आहे)

new colage1.jpg
..
.
new colage 2.jpgkumbhar new.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरे वा,
सुट्टीत मुलीला बिझी ठेवायची सोया झाली Happy

मला हे इतके आवडायचे की मि २१० भरुन प्रो व्हर्जन पण घेतले होते.
फार मजा येते.
जास्तीत जास्त (काल्पनीक)पैसे मिळवायला पण मस्त वाटायचे.माझा आतापर्यंत चा रेकॉर्ड ५७५ रु आहे.

प्रो व्हर्जन घ्या
सुंदर डिझाईन आहेत, ग्रीक, आफ्रिकन, इजिप्त वगैरे
भाण्दी मस्त बनतात आणि चांगल्या काल्पनीक किमतीत विकली जातात.
आणि कलेचा हात असेल तर स्क्रीनशॉट मधल्यासारखी खरी पण रंगवता येतेल.

मस्त जाई..
प्रोव्हर्जन मधे माती सुद्धा बदलता येते. त्यात भांडे एकदम क्लिन चकचकित बनते

मस्त रे गजा ! आता कळलं Wink Lol
खुप मस्त पॉट्स बनवले आहेस. मी घेतलं अ‍ॅप डाउनलोड करायला.

Digital doily हे अँप सुद्धा मस्त आहे. आपल्याला हवे ते डिजाईन बनवत येते, क्रिएटिव्हिटी पूर्ण तुमची, अँप मदत करते डोक्यातले डिजाईन कागदावर उतरवायला. स्वतःला हवे ते डिजाईन बनवा, प्रिंट घ्या आणि पेंट पण करा... रेडिमेड डिजाईन वल्याही अँप्स आहेत जिथे ऑनलाइन पेंटिंग करता येते. एकूण वेळ कसा घालवायचा, एकटेपणा कसा टाळायचा हे प्रश्न पडत असतील तर भरपूर उत्तरे तयार आहेत।.

कलर कॉबिनेशन वापरून तुम्ही नविन रंग तयार करू शकतात. उदा. सोनेरी रंग देण्यासाठी सर्वप्रथम गडद पिवळा रंग लावा. ( भांड्यावर जास्त वेळ हात फिरवल्याने रंग गडद होत जातो. त्यानंतर लाल रंग सिलेक्ट करून लाल रंगाचा हल्का हात त्यावर द्यावा.

new colage1.jpg
.
.
.
.
new colage 2.jpg

सुंदर बनवलेत
किति इ पैसे मिळाले? मला यांचे प्राइसिंग अल्गोरिदम्स काम कसे करतात हे ब्रेक करायचेय एकदा.

४००-४५० पर्यंत गेले.
बहुदा तुम्ही जितके महागाचे डिझाईन वापरतात तितके जास्त पैसे मिळतात.

तसं नाहीय.
मी अती सुंदर महागाचं इजिप्तिशियन डिझाईन वापरुन पण भंगार कलरस्किम वापर्लि(काहीतरी काळे आणि मजेंटा,डिझाईन काळ्यात लपले) आणी एकूण प्रॉडक्ट येडंबिद्रं दिसलं तर इ पैसे कमि मिळतात.
काहीतरी चांगला अल्गोरिदम मागे आहे.

प्रयोग करुन पहा.
साधी १५ रु ची डिझाईन वापरुन सुंदर क्लासी प्रॉडक्ट आणि महागाची डिझाईन वारुन इजिप्त मध्ये चायन, मध्येच जपानी वगैरे वापरुन एखादे भयंकर भांडे.
भांडी करायला वेळ मिळाल्यास डेमो देईन.

रंगसंगती सुसंगत असायला हवे. नुसता काळा रंग वापरून सुद्धा जास्त पैसे मिळतात. त्या साईट्सवर रंगसंगती बघा त्यावरून लक्षात येईल

पैसे मिळाले तरी कॅटेगरी ओपन व्ह्यायला वेळ लागतोय.म्हणजे आता माझ्याकडे ५९४ रुपये जमा दाखवत असले तरीही मला जपानिज, फ्लॉवर वगैरे कॅटेगरीतून खरेदी करता येत नाही. लाइन बाय लाइन च खरेदी करता येतेय. आफ्रिकन संपली तर ओर्नामेंट्स मध्येच खरेदी करावं लागतेय .त्यासाठी मिनिमम १००० रुपये जमा हवेत . दुसऱ्या कॅटेगरीत खरेदी करता येत नाही .

Pages