शीतपेय आणि आपले आरोग्य

Submitted by नलिनी on 26 April, 2017 - 07:37

आपल्याला नेहमीच वाचनात / ऐकण्यात येते की शीतपेयं आरोग्यासाठी हाणीकारक आहेत, पण कसे?
साधारण एक कॅन शीतपेय प्यायले तर काय होते ते पाहू -
साधारण १० टिस्पून साखर शरीरात जाते. एवढी साखर एकदाच खाल्ली तर ओकारीच व्हायला हवी पण त्यातले phosphoric acid तसे होऊ देत नाही.
पुढील १० - २० मिनिटात एवढ्या प्रमाणात आलेल्या साखरेसाठी त्याच प्रमाणात इन्सुलीन शरीरात सोडले जाते. लिव्हरचे काम वेगाने वाढते आणि ही रक्तात सोडलेली साखर चरबीत साठवायचे काम करावे लागते. रक्तातले साखरेचे प्रमाण वाढते, बीपी वाढतो, pH बदलतो म्हणजे बघा शरीरावर केवढा ताण पडतो ते. वाढलेला pH सामान्य पातळीत आणण्यासाठी हाडांमधून आणि दातांमधून कॅलिशिअम घेतले जाते.
आपल्या शरीराकडून आणखी साखरेची मागणी होते ते तर वेगळेच.
ह्याबद्दल असलेली तुमची माहिती , तुमचे मत नक्की वाचायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीतपेयांतली साखर वाईटच. पण त्याहूनही वाईट असते ते कॉर्न सिरप - त्यातही हाय फ्रुक्टोस कॉर्न सिरप (HFCS).

हल्ली बहुतेक विकतच्या गोड पदार्थात HFCS असते. पदार्थ टिकवणे, त्याचा स्वाद खुलवणे, साखरेपेक्षा अत्यल्प प्रमाण लागणे (परीणामी स्वस्त पडणे) असे अनेक फायदे असल्यामुळे त्याचा वापर सर्रास केला जातो. शीतपेयांबाबत लोक थोडेसे जागरुक रहायला लागले आहेत पण HFCS फारसे कुणाला माहीत नसते. अगदी सणासुदीला आपण जे विकतचे श्रीखंड आणतो त्यातही बर्‍याच वेळेला HFCS असते.

श्रीखंड नेहमी घरी करावे, दूध ते श्रीखंड हा प्रवास घरीच व्हावा... विकतच्या श्रीखंडाची परत आठवण येत नाही. चितळे आम्रखंड चा मी दिवाना होतो, सात वर्षे तेच. एकदाच घरी स्वहस्ते केले... त्यानंतर आजवर बाहेरचे अजिबात आणले नाही.

सात वर्षात ओरिजिनल श्रीखंड कसे लागते याची आठवण घालवून टाकली होती चितळे आम्रखंडाने...

Pages