आर्टीफिशियल स्वीटनर अर्थात शुगर फ्री आरोग्यासाठी घातक, का?

Submitted by नलिनी on 26 April, 2017 - 08:05

आर्टीफिशियल स्वीटनर अर्थात शुगर फ्री हे साखरेऐवजी पर्याय म्हणून वापरावे का?
तर नाही.

आर्टीफिशियल स्वीटनर अर्थात शुगर फ्री हे आरोग्यासाठी का बरं घातक असते? त्याचे आहारवर कोणते विपरीत परीणाम होतात?

आपण जेव्हा शुगर फ्री नावाने मिळणारे आर्टीफिशियल स्वीटनर आहारात घेतो तेव्हा आपल्या शरीराला एक सूचना पाठविली जाते की आता शरीरात ठराविक प्रमाणात साखर येणार आहे. सूचनापर हुकूम शरीर तयारीला लागते. साखर येणार म्हटल्यावर ती पेशींना पाठवायला हवी तर त्यासाठी इन्सुलिन हवे. मग तेवढ्या प्रामाणात इन्सुलिन तयार केले जाते. वेळेत जर साखर / कार्बयुक्त खाद्य शरीराला पुरवले नाही तर
तयार झालेल्या इन्सुलिनला जर साखर मिळाली नाही तर काय होते? रक्तातली साखर झपाट्याने कमी होते ज्याला आपण हायपोग्लायमिया म्हणतो. हायपोग्लायमिया ची लक्षणं दिसायला लागताच साखर / कार्बयुक्त खाद्य शरीराला पुरवायला हवे अन्यथा कोमात जावून मृत्यू संभावतो.
जरी जास्तीच्या इन्सुलिनने रक्तातली साखरेची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत कमी झाली नाही तरी सातत्याने जास्तीचे इन्सुलिन तयार झाल्याने इन्सुलिन तयार करणार्‍या पेशी निष्क्रीय होतात / नाश पावतात.
जास्तीचे इन्सुलिन म्हणजे जास्तीची अनावश्यक भूक, जास्तीचे खाणे, चरबी रूपात साचून लठ्ठपणा येणे यालाही कारणीभूत ठरतो.
आर्टीफिशियल स्वीटनर हे हळुहळू अनेक रोगांना आमंत्रण देते. त्यापैकी काही,
मधुमेह
मायग्रेन
हृदय विकार
पोटाचे / सांध्याचे विकार
डिप्रेशन
स्मरण शक्ती कमी होणे
दिसायला कमी होणे
ब्रेन कँसर सारखे विकार
झोपेची समस्या
मागच्या महिन्यात व्हिडीओ पाहण्यात आला. नेहमीचे शीतपेय विरूद्ध (झीरो) बीना साखरेचे शीतपेय. त्यात त्यांनी दोन्ही प्रकारचे शीतपेय बराच वेळ उकळले. नेहमीच्या शीतपेयात जळालेली साखर होती तरे झीरो मध्ये अगदीच नगण्य जळालेली साखर होती म्हणून ते कसे उत्तम आहे हे सांगणार तो व्हिडॉओ होता. त्यात साखर नव्हती म्हणजेच त्यात आर्टीफिशियल स्वीटनर असणार.

काहीही शुगरफ्री म्हटलं तर त्यापासून हातभर लांबच रहावे हेच आरोग्यासाठी उत्तम आहे.

हे कोणकोणत्या पदार्थातून आपण आपल्या न कळत घेत असतो? ह्याविषयी अधिक चर्चा होण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या फॅमिली फिजिशिअन ने अज्जिबात वापरू नका सांगितले होते हे स्वीटनर्स प्रकार. माझ्या सासर्यांना हाय शुगर आहे ते चहात घालतात याच्या गोळ्या एकदा जस्ट मी चव घेऊन पाहिली म्हटले बघू कसं लागतं तर नेहेमीच्या साखरे पेक्षा मिट्ट गोड लागत होता चहा. त्यांना खूपदा सांगितलेय हे नका घालू पण ऐकत नाहीत.
कुठेतरी वाचले आहे की स्वीटनर्स पेक्षा अर्धा चमचा नेहेमीची साखर घातलेली चालते.

बाकी मला फारसे माहित नाही. वाचायला आवडेल चर्चा.

चांगला विषय आहे. पण कृत्रीम साखर म्हणजे नेमकि कोणती, त्यातले घटक काय, ब्रँड कोणते हि माहिती सुद्धा अ‍ॅड करा. सुक्रलोज हा प्रकार साखरेपासुनच बनवतात, तो शरीराला घातक (अर्थात माफक प्रमाणात सेवन केलं तर) नाहि असं म्हणतात...

नैसर्गिक रुपात (म्हणजे ताजी किंवा सुकवलेली पाने ) स्टीविया चांगले असे मत आहे
https://wellnessmama.com/1482/stevia-safe-or-healthy/

पण ती पाने आता दुकानात मिळेनाशी झालीत. त्या ऐवजी त्याच नावाच्या गोळ्या
मिळतात, त्या करण्यासाठी जी प्रक्रिया करतात, त्याने मूळ गुणधर्म कितपत टिकतात,
याबद्दल शंका आहे.

ती पाने मात्र सुंदर स्वाद देतात. बाकिची स्वीटनर्स कडवट लागतात, तशी लागत नाहीत.

थोडेसे अवांतर आहे, पण शुगर फ्री म्हणून विकल्या जाणार्‍या अनेक पदार्थात खजूर,
अंजीर वगैरे वापरलेले असतात. त्यातही साखर असतेच.

साताठ वर्षांपूर्वी माझ्या आईला जेव्हा मधुमेह झाल्याचं निदान झालं होतं तेव्हा तिची बेस्ट फ्रेंड हेच म्हणाली होती की तू हवं तर एक वेळ थोडीशी साखर वापर पण शुगर फ्री च्या गोळ्या नको. त्यांनी किडनी आणि इतरही अवयवांवरती वाईट परिणाम होतो म्हणून. आम्ही त्या मावशींवर जाम वैतागलो होतो. कारण डॉक्टर लोकांनी शुगर फ्री वापरायला सांगितलं होतं.
पण आजकाल त्या गोळ्यांच्या साईड इफेक्ट विषयी फार ऐकायला मिळतय. काहीतरी तथ्य असेल!

स्टीविया घरी कुंडीत लावला होता, त्याची सुकलेली पाने गोड लागायची. आजोबांना मधूमेह असल्यामुळे त्यांच्या चहात ही सुकलेली पाने वापरून बघितली. चहाला उग्र वास यायचा व पानांचे प्रमाण वाढवूनही चहाला म्हणावा तितका गोडवा येत नव्हता. स्टिवियाच्या पानातून घरच्या घरी अर्क काढता येतो का?

चहा कॉफीत साखर घेण्याची सवय सहज मोडता येते. दहा ते पंधरा दिवस लागतात.
आणि मग चहा कॉफीत साखर असेल तर पिवत नाही. एक घोट घेउन बाजुला ठेवावे लागते.

मानव +1
मी गेले 15 दिवस पूर्ण बिनसाखरेचा चहा पितोय,
त्या आधी 7 दिवस साखर निम्म्यावर आणली होती.
फक्त माझ्या चहात दूध जास्त असते,(सध्या) त्यामुळे तों जास्त कडवट लागत नाही.

आर्टिफिशियल स्विटनर हा बऱ्यापैकी अल्कोहोल फ्री बियर सारखा प्रकार आहे.
दोन्हीचा वापर, हे सोडवत नाहीय हेच दर्शविते.

>>>>>टी बॅग चा चहा प्या. काहीही टाकावं लागत नाही. >>>>
ऑफिस मध्ये टी बॅग्स वापरतो, तिकडे प्रॉब्लेम नाही,
घरी सगळ्यांचा एक्दम होतो, त्यामुळे जास्त दूध घालणे हा थोडा वर्क अराउंड

राज, तुम्ही सुक्रलोज साठी सुचविलेल्या पानावरच खालील माहिती आहे.
Sucralose is about 320 to 1,000 times sweeter than sucrose,[5] three times as sweet as aspartame, twice as sweet as saccharin and three times as sweet as acesulfame potassium. It is stable under heat and over a broad range of pH conditions. Therefore, it can be used in baking or in products that require a longer shelf life. The commercial success of sucralose-based products stems from its favorable comparison to other low-calorie sweeteners in terms of taste, stability, and safety.[6] Common brand names of sucralose-based sweeteners are Splenda, Zerocal, Sukrana, SucraPlus, Candys, Cukren, and Nevella. Canderel Yellow also contains sucralose, but the original Canderel and Green Canderel do not.

>>राज, तुम्ही सुक्रलोज साठी सुचविलेल्या पानावरच खालील माहिती आ<<

हो, कल्पना आहे मला. टोटल इंटेक किंवा पोर्शन इज ए की, इंपॅक्ट कमी म्हणुन भरमसाठ वापरली कि दुष्परिणाम होणारच... Happy

भरमसाठ नाही पण १ ग्रॅम जरी सुक्रालोज वापरले तरी ते ३२० ते १००० ग्रॅम सुक्रोज घेतल्या समान आहे. त्याप्रमाणात इन्सुलीनची गरज भासणार. त्यापेक्षा अर्धा चमचा साखरच काय वाईट?

ucralose is found in many food and beverage products, used because it is a no-calorie sweetener, does not promote dental cavities,[15] is as safe for consumption by diabetics and nondiabetics,[16][17] and does not affect insulin levels.

वरचं वाक्य आहे त्या विकिच्या लिंकमध्ये...

कृत्रीम स्वीटनर मध्ये सॅकरीन असते. शुगर फ्रीच्या गोळ्या . सॅकरीन साखरेच्या अनेक पट गोड असते. मात्र सॅकरीन हे कॅन्सरोत्तेजक आहे.