Submitted by राहुल रेवले on 28 September, 2009 - 02:37
वृंदावनात घुमता । अजूनही बासरी धून।
जागते वक्षावरची। ती कृष्णव्रणांची खूण ॥
उद्दाम स्तनांवर रुतता । त्या कृष्णसख्याचा भार।
हृदयातून अस्फुट फुटला। तो प्रणवाचा हुंकार॥
प्रणयात जागता सूर्य। स्पर्शाने रचला पुल।
द्वैताचे भानही सुटले। मज मोरपिसाची भूल॥
प्रेमाची भरती येता। देहाचे रांजण भरले।
चंद्राचा मज सांगावा। मी दिव्यत्वाला वरले॥
तो अणुरेणूतूनि फुटता। मी माझे मीपण हरले।
तो कृष्ण कृष्ण ना उरला। अन मी राधा ना उरले!॥
गुलमोहर:
शेअर करा
वाह खुप सुन्दर!!!!!!!!!
वाह खुप सुन्दर!!!!!!!!!
छान...!!!!!!!!
छान...!!!!!!!!
छान! शरद
छान!
शरद
सुरेख!!!!!
सुरेख!!!!!
मस्त!
मस्त!
प्रेमाची भरती येता। देहाचे
प्रेमाची भरती येता। देहाचे रांजण भरले।
चंद्राचा मज सांगावा। मी दिव्यत्वाला वरले॥------------------क्या बात है...
काही जुन्या आवडत्या ओळी आठ्वल्या : प्रेम जब अनंत हुवा...रोम-रोम संत हुवा...
'अद्वैता'ला छानच नटवलय !
'अद्वैता'ला छानच नटवलय ! सुंदर !!
सुरेख! कविवर्य सुरेश भट यांचं
सुरेख!
कविवर्य सुरेश भट यांचं "मी मज हरपून बसले ग" आठवलं.
तो अणुरेणूतूनि फुटता। मी माझे
तो अणुरेणूतूनि फुटता। मी माझे मीपण हरले।
तो कृष्ण कृष्ण ना उरला। अन मी राधा ना उरले!॥>>>> सुरेख
वैशु, गिरिश , भाऊ, क्रांती अन
वैशु, गिरिश , भाऊ, क्रांती अन कविताजी मनापासून आभार.
९,१० वर्षांनी कवितेने पुन्हा माझ्याशी सलगी केली... ती तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने
सुरेख.. खुप छान!!!! मनीचे भाव
सुरेख..:) खुप छान!!!! मनीचे भाव सारे कवीतेत तुझ्या उमलले
मस्त कविता. छान.
मस्त कविता. छान.
खुपच छान......
खुपच छान......
तो अणुरेणूतूनि फुटता। मी माझे
तो अणुरेणूतूनि फुटता। मी माझे मीपण हरले।
तो कृष्ण कृष्ण ना उरला। अन मी राधा ना उरले!॥
मस्त आहे...
बासुरी, सानिका, कल्प,
बासुरी, सानिका, कल्प, वेदनगंधा...... आभार.
दोन भाव सुंदररित्या गुंफले
दोन भाव सुंदररित्या गुंफले आहेत. छान.
हॅट्स ऑफ टु यु मित्रा !
हॅट्स ऑफ टु यु मित्रा ! तोडलंस !
अलकाजी, विशाल धन्यवाद!
अलकाजी, विशाल धन्यवाद!
सुरेख! प्रत्येक द्विपदी
सुरेख! प्रत्येक द्विपदी सरस.
उद्दाम आणि प्रणव या शब्दांची जागा दुसरे काही घेईल का या विचारात पडलोय. पण ही माझ्यालेखी तीट.