जाता सातार्‍याला . . . . .

Submitted by जिप्सी on 26 September, 2009 - 11:54

मराठेशाहिच्या राजधानीच ठिकाण असलेले सातारा हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असुन किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे तर आहेच पण भटकंतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अशा या शहरापासुन फक्त काहि कि.मी. अंतरावर असलेल्या काही ठिकाणांची हि भटकंती.

=================================================
अजिंक्यतारा किल्ला
=================================================

=================================================
=================================================
सज्जनगड
सातार्‍यापासुन १०-१२ किमी अंतरावर असुन नियमित बससेवा उपलब्ध.
=================================================

=================================================
=================================================
परळी धरण
सातार्‍यापासुन २५ किमी अंतरावर.
=================================================

==================================================================================================
ठोसेघर धबधबा
सातार्‍यापासुन १०-१५ किमी अंतरावर.
=================================================

=================================================
=================================================
चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प
ठोसेघर धबधब्यापासुन साधारण ३ किमी अंतरावर (पुढे)
=================================================

=================================================
=================================================
यवतेश्वर मंदिर

कास तलाव
=================================================
सातार्‍यापासुन २५-२७ किमी अंतरावर. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम

==================================================================================================
कासचे पठार
कास तलावाच्या साधारण ३ किमी. आधी
=================================================

=================================================
=================================================
पावसाळ्यात फुललेला सातार्‍याचा निसर्ग
=================================================

=================================================
=================================================
ढोल्या गणपती मंदिर (वाई)
=================================================

=================================================
=================================================
काशीविश्वेश्वर मंदिर (वाई)
=================================================

=================================================
=================================================
सातारा शहर

सातारी कंदी पेढे
=================================================

==================================================================================================

गुलमोहर: 

दादा,
कदी परत्यक्ष भ्येटलात तर तुमच्या आवडीपरमानं ग्वाड न्हायतर वशाट खायाला घालायला आवडंल मला. लय भारी फोटु काढल्यात. जुन्या आटवनी ताज्या केल्यात. Happy

आपले गाव बघून मस्त वाटले.छान फोटो..पावसाळ्यात यवतेश्वराला जाण्यासारखी दुसरी मजा नाही.उलटे धबधबे तिथेच फक्त दिसतात.आता भारतवारीमधे एवढे काही होतच नाही.तरी २ वर्षा पूर्वी ऐन पावसाळ्यात चाळकेवाडी ला जाउन आलो..धुक्यामुळे अगदी १ फुटापलिकडे पण दिसेनासे झाल्यावर शेवटी गाडी वळवली.

प्रतिसादाबद्दल आभार!!!
मृदु, उलटे धबधबे म्हणजे काहि ठिकाणी वार्‍याचा जोर हा एवढा असतो कि धबधब्याचे पाणी खाली जाऊन परत वार्‍याचा जोराने वर येतात.
एम्बीजपान बरोबर ना????

अगदी अगदी...यवतेश्वराला जाताना गाडी वाटेत थांबवून हे दृष्य पाहिल्याशिवाय पावसाळा सार्थकी लागायचा नाही :-)..शाळेच्या वर्षा सहली मधे सर तिकडे जाऊन द्यायचे नाहीत म्हणून हट्टाने परत बाबांना गाडी काढून घेऊन जायला लावायचे..आणि कॉलेज मधे असताना घाटच्या रस्त्यावर चढायला नाही म्हणणार्‍या स्कुटीला तसेच दामटून चढवायचे!!

मस्त सहल झाली सातार्‍याची.
योगेश तुमच्या पाऊलखुणामध्ये सातार्‍याचे फोटो पाहिले आणि प्रतिसाद देण्याचा मोह आवरला नाहि. छान आहेत सगळे फोटो.
हे सगळे पावसाळ्यातले/पावसाळा झाल्यानंतरचे फोटो आहेत ना.

व्वा! मजा आली फोटो बघुन जुन्या आठवणीन्ना उजाळा मिळाला
कधी जमले तर चारभिन्तीचा फोटू, झालच तर धावडशीच्या ब्रह्मेन्द्रस्वामीन्च्या मठाचा फोटू, खिन्डीतला गणपती, जरण्डेश्वर, अशा गोष्टी टाका. Happy सातार्‍यातील अनेक तळ्यान्चे फोटू देखिल जमले तर घ्या काढून, कमानी हौद, फुटके तळे, मन्गळवार तळे इत्यादी
मला कास ला कधी जाता आले नाही Sad

mast re

झक्कास रे योग्या...

मी परळी धरण सोडून बाकी पाहीले आहे मागे... आठवणी जाग्या झाल्या...
>पेढ्यांचा फोटो मस्तच!
>>एखादा तोंडात टाकावासा वाटला
अगदी...

मस्तं वाट्ले आपला गाव पाहुन.. एकदम फ्रेश आणि सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या
पेढे अगदी मस्तच !! बरेच वर्ष झालीत खाऊन.... कंदी पेढे नं. १ !!

योगेश तुमच्या पाऊलखुणामध्ये सातार्‍याचे फोटो पाहिले आणि प्रतिसाद देण्याचा मोह आवरला नाहि. छान आहेत सगळे फोटो.>>>> धन्यवाद अमित, पुन्हा एकदा हा धागा प्रसिद्ध केल्याबद्दल Happy सगळे फोटो हे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात काढले आहेत.

लिम्बुदा दोनच दिवसाचा दौरा असल्याने जास्त फिरता आले नाहि पण मेरूलिंग धावडशी, संगम माहुली, पाटेश्वर, जरण्डेश्वर, खिन्डीतला गणपती पाहायची इच्छा आहे. पुन्हा जायला काहितरी निमित्त पाहिजे ना Happy

कास पठारावरील फुलांचे फोटो http://www.maayboli.com/node/10824 येथे आहेत.

वाह .. योगेश कंदी पेढ्या सकट फोटो टाकून अप्रतिम भेट दिलीत.. लहानपणी मामा खिशातून काढून देत असत आम्हाला . .अजूनही माझे एक काका आहेत त्यांच्याकडे कधी हि पेढे सापडतात. माझं आजोळ सातारा हे सगळं अजूनही जसच्या तस आहे मनात . .. भर पावसाळ्यात घाटात जायला आम्हाला खूप मजा यायची पण डायव्हर चा जीव जायचा .. पवनचक्क्या मात्र बघितल्या नव्हत्या ..

कधी जमले तर चारभिन्तीचा फोटू, झालच तर धावडशीच्या ब्रह्मेन्द्रस्वामीन्च्या मठाचा फोटू, खिन्डीतला गणपती, जरण्डेश्वर, अशा गोष्टी टाका. स्मित सातार्‍यातील अनेक तळ्यान्चे फोटू देखिल जमले तर घ्या काढून, कमानी हौद, फुटके तळे, मन्गळवार तळे इत्यादी>>>> चारभिंती आता छान केल्या आहेत म्हणे.. फुटकं तळ तिथून वर गेले कि माझ्या आज्जीचं घर .. Happy ..हेहे ती नावं ऐकून पण मस्त वाटतंय..

आधीच्या फोटोंवर वॉमा नसल्याने, ते टाकुन पुन्हा सातारा रीलोडेड Happy
नविन काही फोटोंसहित Happy

Pages