लॉजिक म्हणजे काय?

Submitted by अरुणजोशी१२३४५६७ on 3 April, 2017 - 04:44

लॉजिक म्हणजे काय?
लॉजिकला आपण मराठीत तर्क म्हणतो. एखादे विधान वा वागणे वा कृत्य हे लॉजिकल म्हणजे तार्किक किंवा इल्लॉजिकल म्हणजे अतार्किक असते. तार्किक वागणे, विधान मनात, समाजात, कोठेही, अगदी वैज्ञानिक वर्तुळांत स्वीकार्य असते (अपवाद - मात्राशास्त्र). अतार्किक वागण्याची विधानांची खिल्ली उडवली जाते, त्यांना स्वीकारले जात नाही. इथेही भावनात्मक वा ज्याला आपण सेंटीमेंटल म्हणतो अशा वर्तनांचा अपवाद असतो.

पण शेवटी लॉजिक म्हणजे काय?
सर्वच तत्त्वज्ञानांची, म्हणजे अगदी विज्ञान धरून सर्वच तत्त्वज्ञानांची एक गोची आहे कि त्यांना कोणतेही सत्य केवल संदर्भात (अबसॉल्यूट काँटेक्स्टमधे) सिद्ध करता येत नाही. सिद्धतेच्या पद्धतीच्या अनंत उणिवा आणि मर्यादा आड येतात. गृहितकांच्यांच सिद्धतेच्या मर्यादा आड येतात. (खालचा उतारा ज्यांचं ते क्ष्रेत्र नाही त्यांनी वरवर वाचला तरी चालेल.)

हा विषय वैज्ञानिक नाही, पण आपण उदाहरण वैज्ञानिक घेऊ. आपण म्हणतो पाण्याच्या बाष्पीभवनाचे तापमान १०० डिग्री सेल्सिअस आहे. इथे हे विधान केवल सत्य मानण्यात अनंत अडथळे येतात. प्रथमतः हे विधान नीट लिहावे लागेल. म्हणजे पाणी म्हणजे संपूर्ण शूद्ध , १००% शुद्ध पाणी. त्यात कसली भेसळ नको. शिवाय समस्थानिकांची (आयसोटोप्स) भेसळ नको. साध्या हायड्रोजनच्या जागी ड्यूटेरियम वा ट्रिटीयम असले तर बाष्पांक वाढतो. ऑक्सिजनचंही तसंच असेल. आता इतकं शुद्ध पाणी मिळणार आहे का?
आता या प्रयोगासाठी बरंच काही सुस्थिर ठेवावं लागेल. म्हणजे वातावरणाचा दाब, पृथ्वीचे गुरुत्वाकर्ष, चुंबकीय, विद्युत क्षेत्रे, अजून काही काही. फक्त काळ तेवढा बदलून कोणतेही प्रयोगकर्ते परिस्थिती वा काँटेक्स्ट तसाच ठेऊन प्रयोग पुन्हा शकतात. दुसरं काही बदललं कि उत्तर बदललं.
वातावरणाचा दाब कसा स्थिर ठेवाल? तत्त्वतः जेव्हा पाणी हळूहळू बाष्पीभूत होतं तेव्हा त्याचे रेणू हवेत जातात तेव्हा हवेचा दाब तेवढ्याने वाढतो. मग दाब स्थिर ठेवण्यासाठी फार मोठी यंत्रणा (आणि तिचे लोचे) आणावी लागेल.
बाष्पीभवन करायचं पात्र कोणत्या आकाराचं घ्यायचं? फ्लेम कशी घ्यायची? पाण्याच्या सर्व रेणूंना समप्रमाणात उर्जा देणे कसे साधायचे? पाण्यात टेंपरेचर पॉकेट्स न बनवता हळूहळू तापमान १०० ला कसं न्यायचं? पॉकेट्स बनली तर आपण निष्कर्ष पॉकेट्सच्या सरासरीवर काढत आहोत आणि कदाचित कोण्या रेणूचा स्वतःचा बाष्पांक १०० पेक्षा वेगळा नव्हताच असे म्हणता येणार नाही.
बरं त्यात धातूत ठेऊन वा अजून कशात ठेऊन तापवलं, तर अत्यंत अल्प प्रमाणात त्या धातूचे रेणू पाण्यात मिसळतात आणि बाष्पांकावर परिणाम करतात.
बरं पाण्याचं तापमान १०० झालंय का हे पाहायला काहीतरी उपकरण लावावं लागतं आणि त्या उपकरणानं नक्की किती उर्जा घेतली आहे आणि त्यांनं दाखवलेलं तापमान आणि प्रत्यक्ष पाण्याचं तापमान यांत तफावत आहे कि नाही आणि किती आहे हे सुनिश्चित करता येत नाही. का? कारण या पाण्याच्या प्रयोगात पुढे जो फॉल्ट येणार आहे तोच फॉल्ट दुर्लक्षुन हे उपकरण, समजा थर्मोइलेक्ट्रिक तापमापक, बनवलं गेलेलं असतं. म्हणजे त्या थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट्ची सिद्धता अशाच मर्यादांच्या आणि गृहितकांच्या बँडबाज्यात झालेली असते. एक राडा तर इथेच झाला. शिवाय पाण्याची रिंडिंग घ्यायच्या आणि दाखवायच्या काळाचाही फरक पडतो. म्हणजे कधी किती तापमान होते हे ते इंस्ट्रूमेंट तत्क्षणी दाखवू शकत नाही. अगदी नॅनोसेंकदांत का होईना गॅप असतो.
बरं पुढे सामान्य तापमानालामाना पण पाण्याची वाफ होते. आपण कपडे नै का वाळवत? मग ते का? तिथं कुठं १०० तापमान असतं. मग शास्त्रज्ञ म्हणतात, वाफ होणं म्हणजे मूलतः रेणूंना जास्त गतीय उर्जा लाभणं. मग वातावरणाच्या हवेमुळे किंवा पाण्यांच्या रेंणूंच्या ब्रावनियन मोशन मुळे एखाद्या रेणूला १०० तापमानाइतकी उर्जा मिळते नि तो सटकतो. म्हणजे शंभर भिकार्‍यांच्या नेहमी उपाशी राहणार्‍या कळपात लोक अचानक दोघांना २-३ भाकरी, भाज्या देतात आणि ते अपार्टमेंटच्या लोकांइतके खाऊन झोपी जातात असा प्रकार.
मग असंच असेल तर बाष्पीभवन हे हळूहळू (ग्रॅज्यूअली) व्हायला हवं नि १०० ला संपायला हवं. तसं होत नाही. त्या त्या तापमानाच्या सॅच्यूरेशन पॉइंट इतकंच बाष्पीभवन १०० ला पोचण्यापूर्वी होतं. आता ९९ डिग्रीला हे बाष्पीभवन संपत यायला हवं, पण अजिबात नाही. १०० डीग्रीला लॅटेंट हिट अबसॉब होईपर्यंत जवळजवळ सारं पाणी पाणीच राहतं आणि १०० डिग्रीला भरमसाठे लेटेंट उर्जा घेतली कि मात्र सगळं पाणी बाष्प झालेलं असतं. इथे ग्रॅज्यूअलनेस का नाही? १०० पर्यंत का वाट बघायची नि मग १ बार प्रेशरलाच सगळं पात्र रितं करायचं? रेणूंमधली बलं कशाची वाट पाहत असतात. त्यांच्यात तो टूगेदर्नेस कुठून आला?

थोडक्यात काय कि पाण्याचे १०० डिग्रीला बाष्पीभवन होते याची "केवल" भौतिक सिद्धता आणि सर्व "केवल" कारणमिमांसा अगदी विज्ञानाला देखील अशक्य आहे.

सत्ये प्रस्थापित करण्यात प्रारंभबिंदूची समस्या येते. वरच्या उदाहरणात "एक बार दाबाखाली १ किलो पाणी १०० डिग्रीला बाष्पीभूत होते" हा जो नियम आहे त्याचे अनेक धागे आहेत. त्यात अनेक शब्द आहेत, नामे आहेत, क्रिया आहेत, विशेषणे नि इतर पार्ट्स ऑफ स्पीच देखील आहेत. आकडे देखिल आहेत. एकके देखिल आहेत. सामान्य जीवनातलं एखादं वाक्य घेतलं तर ते सोपं निघेल असं समजू नका. ती वाक्ये अजूनच किचकट असतात म्हणून विज्ञानाचा स्कोप त्यातली त्यात सोप्या गोष्टींचा असतो. "रामने शामला ५० पैसे दिले." हे विधान अत्यंत किचकट निघेल.

प्रारंभबिंदूची समस्या म्हणजे काय? आता हे विधान केवल प्रतलावर सिद्ध करायचे तेव्हा त्यात वापरलेल्या प्रत्येक नामाची आणि क्रियेची व्याख्या अगोदर द्यायला लागेल. उदा. पाणी म्हणजे हायड्रॉजन आणि ऑक्सिजन यांचे संयुज. मग आता हायड्रोजन म्हणजे काय? ऑक्सीजन म्हणजे काय? सिद्धता द्यायच्या वाक्यातली सर्वच वाक्ये घेतली आणि सिद्धतेचा जो संदर्भ मांडला आहे ती सर्व वाक्ये घेतली आणि सारी गृहितके घेतली नि त्या वाक्यांतल्या प्रत्येक शब्दाचे, संज्ञचे अगोदर स्पष्टीकरण द्यायला लागेल. त्या प्रत्येक वाक्याला सिद्ध केल्याशिवाय शेवटच्या वाक्याची अबसॉल्यूट सिद्धता देता येत नाही. पण या सार्‍या पार्श्वभूमीचा गुंताळा प्रत्येक नव्या शब्दानिशी किचकट होत जातो. हा गुंताळा असा किती किचकट होतो? तर तो जगाच्या झाडून सर्वच संकल्पनांना वेटोळे घालून बसतो. साधे पाण्याचे बाष्पीभवन पण ते सर्व शास्त्रांच्या सर्व ज्ञानाला शिउन येणार, अपुरे मानणार. म्हणून मानवाला केवल ज्ञानाचा अभ्यासच करता येत नाही. कारण भौतिकशास्त्राचा कोणता नियम त्यातली त्यात सहजतेने लिहिता आला तर तो असेल नियमाच्या विधानाच्या अंति पेन उचलेपर्यंत घडलेला अखिल ब्रह्मांडाचा इतिहास!!! हे काही संभव नाही.

म्हणून मनुष्य कोणत्याही बाबीत कसल्याही केवल सत्याच्या सिद्धतेच्या भानगडीत पडत नाही. तो सरळ हजारो, लाखो, करोडो विधाने सत्य मानतो. ती खोडली गेलेलीच असतात पण व्यवहार्य फरक पडत नाही. म्हणजे बाष्पीभवन कसे का होईना, स्टीम इंजिन चालवायचे, भात बनवायचा, इ. खरं असो वा नसो, वैवाहिक लैंगिक निष्ठता पाळायची. आपण जे करू शकत आहोत ते आपण करू शकत आहोत तर त्यांमागचे विज्ञानाचे सारे नियम ऑटोमॅटिक व्यवस्थित चालत असतीलच कि!!!

आता तुम्ही म्हणाल, कि लॉजिक म्हणजे काय ते सांगताना या रामायणाचा काय संबंध? थोडक्यात काय तर संपूर्ण विश्वाचं, विश्वकारणाचं संपूर्ण, संलग्न, ( कंप्लीट अँड कंसिस्टंट) आकलन झालेलं नसलं तर कोणत्याच विधानाला काहीही अर्थ नाही हे मानवाला सबकाँशली माहित आहे. पण ते आकलन त्याच्या प्रत्यक्ष शक्तीबाहेरचं आहे. मग तो काय करतो, दणादणा खूप सारी सत्ये प्रसवतो, गृहितके करतो, संदर्भ सुनिश्चित करतो आणि विश्वाचं कंप्लिट आणि कंसिस्टंट आकलन झाल्याचा एक छोटा माहौल बनवतो.

हा माहौल म्हणजे लॉजिक. यातली सगळी विधानं १००% सत्य असतात. १००% पूर्ण असतात. ती एकमेकांशी काँट्रडिक्ट करत नाहीत. सवत्यानं. एकत्र. यांचं कोणतंही पर्म्यूटेशन , कॉबिनेशन पर्फेक्ट असतं. या विधानांचे सगळे व्यत्यास असत्य असतात. जर एखादा व्यत्यास खरा निघाला तर ज्या कलाकाराने हा माहौल बनवला आहे तो माहौल खराब होतो, यूजलेस होतो. तिथे आपण मग त्या "केवल सत्याच्या माहौलीफिकेशनात" झालेली गडबडी दुरुस्त करून गाडी पुन्हा रुळावर आणली जाते.

तर लॉजिक म्हणजे सुसूत्र सत्य विधानांचा संच. जर केवल सत्याच्या नजरेनं पाहिलं तर जे सत्य आहे ते सुसूत्र असणारच आणि जे सुसूत्र आहे ते सत्य असणारच. पण ती फॅसिलिटी आपल्या "मौहौलिक" लॉजिकाला नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय... पण तसं तर सगळीच शास्त्र, अश्या गृहितकांवरच तर चालतात ना ? आणि हि गृहितकं पण सध्याच्या ज्ञानावरच अवलंबून असतात. म्हणजे रिझल्ट वर परिणाम करणारा आणखी एखादा अज्ञात घटक असू शकतो, तो अजूनही अज्ञात असल्याने त्याची कल्पनाच करता येत नाही आणि त्याला टाळताही येत नाही..

पण सगळी गृहितकं पाळली तर मात्र लॉजिकचा अभ्यास आनंददायी होतो ( रच्याकने.. बहुतेक विनोद हे लॉजिक न पाळल्यानेच होतात. )

छान लेख आहे.
अजून सोप्या भाषेत होऊ शकला असता. पण न झाल्यानेही काही बिघडले नाही..

@ अरुण जोशी, "रामने शामला ५० पैसे दिले." हे विधान अत्यंत किचकट निघेल.>>> ह्याचंही स्पष्टीकरण लिहा ना! वाचायला आवडेल.

म्हणजे रिझल्ट वर परिणाम करणारा आणखी एखादा अज्ञात घटक असू शकतो, तो अजूनही अज्ञात असल्याने त्याची कल्पनाच करता येत नाही आणि त्याला टाळताही येत नाही..>>>>>>>>>>> अद्यापितरी अज्ञात घटकाने काढलेल्या लॉजिकच्या विसंगतीत काही प्रकार केलेला नसतो. म्हणून अज्ञात घटक आणि तो शांत बसून आहे असं म्हणणं म्हणजे अज्ञात घटक नाही असं म्हटल्यासारखं आहे. अज्ञाताचा अभ्यास करण्याचं कौशल्य अजून तरी मानवाला नाही.

छान आहे लेख! लॉजिक इतकी दुसरी सत्य प्रस्थापित करायला अत्यावश्यक पण तरीही अशक्य गोष्ट म्हणजे control (मराठीत काय म्हणतात? नियंत्रित गट?). बरेचदा control group आणि experimental group हे सारखे (identical) ठेवता येत नाहीत. अशावेळी वैज्ञानिक प्रयोगांत statistics ची मदत घेतली जाते.
खऱ्याखुऱ्या आयुष्यात तर काही कंट्रोल नसतोच! अमुक केले तर आणि नाही केले तर ह्या दोन्ही शक्यता एकाच वेळी पडताळून पाहता येतच नाहीत!
पण अशा अनाकलनीय गोष्टी आहेत म्हणून तर जगण्यात, प्रयोगांत मजा आहे!

<<<<< कोणत्याच विधानाला काहीही अर्थ नाही हे मानवाला सबकाँशली माहित आहे. पण ते आकलन त्याच्या प्रत्यक्ष शक्तीबाहेरचं आहे. मग तो काय करतो, दणादणा खूप सारी सत्ये प्रसवतो, गृहितके करतो, संदर्भ सुनिश्चित करतो आणि विश्वाचं कंप्लिट आणि कंसिस्टंट आकलन झाल्याचा एक छोटा माहौल बनवतो. >>>>>>

म्हणून तर आजकालचे लॉजिक, विज्ञान सर्व काही असले तरी फक्त ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या.
जग म्हणजे केवळ माया. तरी पण <<<जगण्यात, प्रयोगांत मजा आहे!>>>

@ अरुण जोशी, "रामने शामला ५० पैसे दिले." हे विधान अत्यंत किचकट निघेल.>>> ह्याचंही स्पष्टीकरण लिहा ना! वाचायला आवडेल.

संदर्भः
१. तारीख ६ एप्रिल २०१७ (आता वेळ म्हणजे काय, वेळेचा कालावधी कसा आणि का बनतो? आय मीन हाऊ इज अ‍ॅन पाँइंट ऑफ टाईम स्ट्रेच्ड इन्टू पिरियड ऑफ टाइम? केवल कालावधी केव्हापासून सुरु आहे? अंक म्हणजे काय? कालावधी अंकांत कसा काय मोजता येऊ शकतो? ०१-०१-०००१ पासून कोणत्या प्रकारे कालावधीतील बदल मोजला आहे ती योग्य आहे काय? काळ अबसोल्यूट असतो का कि अन्य गोष्टींच्या परस्परांतील बदलांचा आरोप काळ म्हणून केला जातो? मग काळाच्या या बिंदूला मागे काय काय झाले आहे समजले आहे?
२. स्थान: राजपथ, दिल्ली. हे स्थान असलेली पृथ्वी, तिची सूर्यमालिका, आणि गॅलॅक्सी या नक्की कोणत्या मार्गाने चालल्या आहे. देण्याच्या वेळी आणि आता वाचताना हे स्थाने विश्वात कुठेकुठे असतील? कोणता एक सुनिश्चित संदर्भबिंदू वापरला आहे ज्यापासून कॉर्डिनेट्स घेतले आहेत? विश्वातला असा स्थिर बिंदू कल्पिता येतो का ज्यापासून राजपथचे कॉऑर्डीनेट्स मांडता येतील? हा बिंदू स्पेसमधे असतो का? स्पेस ही असते का नसते? ....
३.
४.
गृहितके:
१. राम हा एक मानव आहे. मानव म्हणजे काय काय? राम त्यातली कसा वेगळा मानव आहे (नाव वेगळे असलेला रोबोट नसून)....
२. पैसा: अर्थशास्त्र म्हणजे. मूल्य म्हणजे काय? चलन म्हणजे काय? चलन का मानतात?

ब्ला ब्ला

छान लिहिलय. Happy
तरी एक खोट निघाल्यासारखी वाटतेच.. Proud आम्ही लहानपणि शिकलो ते १०० डिग्रीला पाण्याचा उत्कलनबिंदु म्हणतात... बाष्पीभवन नाही...... खरे खोटे देव, तुम्ही अन विज्ञान जाणे.. Lol

लिंटि , ये लगा सिक्सर

खरं सागायचं तर या लेखाचा आणि लॉजिकचा संबंधच अजून लक्षात आलेला नाही. भीती वाटली. समजा अशा पद्धतीने विचार करणा-याला कुणी दमा मिरासदारांचे शिवाजीचे हस्ताक्षर किंवा व्यंकूची शिकवणी वाचायला दिले तर तो या कथांची पिसं काढेल. व्यंकू म्हणजे काय, मास्तर म्हणजे काय. दमा म्हणके कोण...

बाकी मानकीकरण ( स्टँडर्डायझेशन ), वैज्ञानिक उपकरणांची मानकांशी केलेली पडताळणी, संपृक्त बाष्प ( सॅच्युरेटेड स्टीम) इत्यादी संज्ञा विचारात घेतल्यात का ?

बरेचदा control group आणि experimental group हे सारखे (identical) ठेवता येत नाहीत. अशावेळी वैज्ञानिक प्रयोगांत statistics ची मदत घेतली जाते.>> हे तर तागुची आणि डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट आले की..

लहानपणि शिकलो ते १०० डिग्रीला पाण्याचा उत्कलनबिंदु म्हणतात... बाष्पीभवन नाही. पाण्याचे उत्कलन होऊन काय बनते?

बाकी मानकीकरण ( स्टँडर्डायझेशन ), वैज्ञानिक उपकरणांची मानकांशी केलेली पडताळणी, संपृक्त बाष्प ( सॅच्युरेटेड स्टीम) इत्यादी संज्ञा विचारात घेतल्यात का ?
असं लक्षात घेतलेलं नाही असं कोण्त्या विधानावरून जाणवतं?
१. इथे कोणतं मानकीकरण अभिप्रेत होतं आपल्याला जे मी वापरलेलं नाही? हा प्रयोग पाणी आणि १०० आकडे बदलून लोखंड १५०० करा. मी उदाहरण दिले ते योगायोगाने मानकीकरणाच्या संबंधित निघाले. पाणी १०० डीग्रीला उकळते हा नियम नाही, ते गृहितक आहे. व्याख्याच तशी आहे. म्हणून लोखंड घालून पहा. सगळा संदर्भ तशास तसा लागू पडेल.
२. उपकरणांची मानकांशी केलेली पडताळणी म्हणजे कॅलिब्रेशन. इथे मानक देखील एका प्रयोगातून जाते. त्याचे अजून अचूक एक मानक असते. असं कुठवर होणार. मग गृहितक!
३. संपृक्त बाष्पाचा आणि लेखाचा काय संबंध? समजा प्रयोगाच्या वेळी १ बार प्रेशर आणि २५ डिग्री तापमान आहे. मग? संपृक्त असो नैतर नसो.

सपना, लेख बाष्पीभवन आणि लॉजिक यांच्या पैकी कशावर आहे असे वाटते. आता तापमान हे पाण्याचे बेंचमार्कचे दिवस गेलेत. https://www.quora.com/Does-the-temperature-of-matter-increase-uniformly-... इथले , नो , नॉट जनरली ने चालू होणारे उत्तर वाचा.
जर कोणत वाटर थर्मामीटर असतं तर त्यात चूक राहिली असती. असो.

>>>> पाण्याचे उत्कलन होऊन काय बनते? <<<<< आमच्याकडे चहा बनतो... Proud

बाकि तुम्ही माझ्या पोस्टी फारशा सिरियसली घेऊ नका हो, (इकडे माबोवर कुणीच घेत नाहीत)
तुमचा लेख छानच आहे. पण लॉज्जिक ऐवजी, "सत्य" म्हणजे काय असा प्रश्न विचारला तरी त्यालाही/त्यालाच वरील विवेचन लागु पडेल, कारण बरीच सत्ये व्यक्ति/परिस्थिति व काल सापेक्ष असतात, एकाचे सत्य ते दुसर्‍याकरता असत्य असू शकते. असो, तो मोठाच गहनविषय आहे, तुलनेत तुम्ही बराच सोपा करायचा प्रयत्न केला आहे. Happy
>>>> तर लॉजिक म्हणजे सुसूत्र सत्य विधानांचा संच.<<< या वाक्याद्वारे तुम्ही शेवटी "सत्याच्या" जाणिवेशी थोडा संबंध जोडलाच आहे.
लक्षात घ्या, मी सत्याला "जाणिव" असा शब्द वापरतो आहे. व जाणिवेचा संबंध अंतर्मनाशी /सिक्स्थ सेन्सशी असतोच असतो. तो जर सत्याधारीत असेल, तर अशा जाणिवेद्वारे केलेले अंदाज्/उच्चारलेले शब्द अचूक खरे ठरतात.
अर्थात, जाणिवा/अंतर्मन वगैरे गोष्टॉ प्रयोगशाळेत सिद्ध झालेल्या नसल्याने जी लोक या बाबी मानितच नाहीत, त्यांना माझ्या वरील विवेचनाचा काय की तुमच्या लेखाचा काय, एक शब्दही कळणार नाही.

बरं.
खरं म्हणजे उदाहरणांमुळे गोंधळच जास्त झाला. इथे फार तर वैज्ञानिक संज्ञा चुकीच्या गृहीतकावर आधारीत आहे असे तुम्ही सिद्ध केलेय असे समजू. पण मग त्याचा तार्किकबुद्धीशी काय संबंध हे कळत नाही. गृहीतक चुकीचे असणे आणि लॉजिकल असने याचा प्रस्परसंबंध काय हे मला तरी झेपलं नाही.

आता या प्रयोगासाठी बरंच काही सुस्थिर ठेवावं लागेल. म्हणजे वातावरणाचा दाब, पृथ्वीचे गुरुत्वाकर्ष, चुंबकीय, विद्युत क्षेत्रे, अजून काही काही. फक्त काळ तेवढा बदलून कोणतेही प्रयोगकर्ते परिस्थिती वा काँटेक्स्ट तसाच ठेऊन प्रयोग पुन्हा शकतात. दुसरं काही बदललं कि उत्तर बदललं >>>

जोशी सर,
पाण्याचा उत्कलन बिंदू ९९.९८ डिग्री से आहे असे आता मानले जाते (असे दिसते) . तुमच्या वरील विधानात दिलेले कंट्रोल्ड पॅरामीटर्स हे प्रयोगशाळेमधले आहेत. त्याला मानकीकरण म्हणतात. आदर्श परिस्थितीत घेतलेली निरीक्षणांवरून ते पा-याच्या स्तंभाशी कॅलिब्रेट (मराठी?) केले जाते. काही कारणाने त्यावेळी १०० डिग्री से. हा आकडा मिळाला असावा. म्हणूनच १०० डिग्रीचे गृहीतक प्रचलित झाले.

पाण्याचे बाष्प होण्याची प्रक्रिया ही या बिंदूच्या कितीतरी अलिकडे होण्यास सुरूवात होते. १०० डिग्री से ला आदर्श परिस्थितीत सॅट्युरेटेड स्टीम मिळते असे असावे. मलाही नीटसे माहीत नाही. हे बरोबर आहे का हे सांगा. उंचावर उत्कलन बिंदू खूप खाली असतो. पण आपल्याला ते लक्षात नाही घ्यायचे. व्याख्या करताना समुद्रसपाटीपासूनची उंची, वातावरणीय दाब ( हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत) वगैरे गृहीत धरलेले असते. जर यातल्या एखाद्या बाबीमधे फरक झाला, उदा. ससपासूनची उंची तर गणिताने उत्कलनबिंदू काढता येतो. उंचावर जाऊनही १०० डिग्रीला उत्कलन बिंदू असतो असे समजणे हे अवैज्ञानिक आहे असे मला वाटते.
या वॅल्ह्युज चुकीच्या गृहीतकावर आधारीत आहेत असे लक्षात आले तर त्या दुरूस्त केल्या जातात, याला विज्ञान म्हणतात. त्या व्हॅल्युजना चॅलेंज करता न येणे हा वैज्ञानिक दृष्टीकोण नव्हे एव्हढेच लक्षात आणून द्यायचे होते. विज्ञानात सुधारणेला नेहमीच वाव असतो.

विज्ञानात सुधारणेला नेहमीच वाव असतो.
अर्थातच. पण विज्ञानाचं आणि केवल सत्याचं नातं फार तर फार असिंप्टोटिक असू शकतं. करीबियां बढेंगी लेकिन मिलन नही होगा टाईप.
================
पाणी उकळणे म्हणजे काय? त्याचं दिलेल्या तापमानासाठी व्हेपर प्रेशर आणि वातावरणाचं प्रेशर एक होणे, जर प्रेशरच्या भाषेत सांगायचं. http://www.wiredchemist.com/chemistry/data/vapor-pressure
============
सामान्य १ बार दाबाच्या वातावरणात जेव्हा (वातावरणाचे) तापमान ४० डिग्री असेल तेव्हा देखील पाण्याचे काही व्हेपर प्रेशर असतेच. म्हणून आर्द्रता असते. पण पृथ्वी म्हणजे सर्वत्र जल व त्यावर वातावरण असं स्थिर आणि संतुलित चित्र नाही. म्हणून दिलेल्या तापमानाच्या सॅच्यूरेशनला पोचायचे एवॅपोरेशनचे आणि तापमान बदलाचे खेळ चालू असतात. म्हणून आर्द्रता ही नेहेमीच मॅक्स नसते. तिथे रिलेटिव ह्यूमिटिडी येते. जर सॅच्यूरेशन्ला स्थिती असली तर तापमान थोडेसेही उतरले तर पाऊस पड्तो.
====================
मी नोकरी पेशानं फायनाशिअल, कॉर्पोरेट आणि काँट्रक्ट इ इ पाहणारा माणूस आहे हो, दया करा.

लक्षात घ्या, मी सत्याला "जाणिव" असा शब्द वापरतो आहे. व जाणिवेचा संबंध अंतर्मनाशी /सिक्स्थ सेन्सशी असतोच असतो. तो जर सत्याधारीत असेल, तर अशा जाणिवेद्वारे केलेले अंदाज्/उच्चारलेले शब्द अचूक खरे ठरतात.
अर्थात, जाणिवा/अंतर्मन वगैरे गोष्टॉ प्रयोगशाळेत सिद्ध झालेल्या नसल्याने जी लोक या बाबी मानितच नाहीत, त्यांना माझ्या वरील विवेचनाचा काय की तुमच्या लेखाचा काय, एक शब्दही कळणार नाही.>>>>>>>>>>> +१००००
शब्दांचे घोळ टाळू. सत्य म्हणजे एक विधान. लॉजिक म्हणजे सत्यांचे सत्य आंतरसंबंध.
आणि आपण म्हणता तसे सत्य पाहण्यास जाणिव असलेला दृष्टा हवाच. त्या दृष्ट्याचं वर्णन करायचंच नाही ही टेक्निकली चूक पोझिशन आहे.
===========
प्रतिसाद आवडला.

इथे फार तर वैज्ञानिक संज्ञा चुकीच्या गृहीतकावर आधारीत आहे असे तुम्ही सिद्ध केलेय असे समजू. >>>>> अजून कोणत्या तत्त्वज्ञानाची केवल सत्य सिद्ध करण्याची पद्धत द्या. तिच्यातल्या चूका काढून दाखवेन. शेवटी मानलं ते सत्य, मानली ती सत्ये, मानले ते त्यांतले संबंध आणि मानलं ते लॉजिक - सगळा माहौलिक प्रकार, खोटा, निखलास खोटा.
==================
वरील विधाने देखिल, पॅराडॉक्सिकली, माहौलिक सत्ये!!! काय करतो काय!!!!!

अहो सर
मला मेलीला काही एक कळत नाही. पतवंडं कॉलेजला गेली कि त्यांची घरी राहीलेली पुस्तके चोरून वाचत असते मी. त्यातच जुना आजार उफाळून आला कि मग मायबोलीवर येऊन वाद घालत बसते. आता बरं वाटतंय म्हणा.
पण तुमचा आत्मविश्वास आवडला. असा आत्मविश्वास पूर्वी अल्बर्ट आईनस्टाईनकडे होता ( हे सुद्धा चोरून वाचलेलं आहे. इथे लगेच लिंक द्या म्हणतात. आता मी या वयात कुठून लिंक देऊ ? )
जपानच्या बुलेट ट्रेनचा शोध देखील एका तिकीट खिडकीवरच्या बुकींग क्लर्कने लावला. तुम्मच्याही हातून काही गौरवास्पद कामगिरी व्हावी या शुभेच्छा देऊन इथे थांबते.
(पुस्तके जागच्या जागी ठेवते पतवंडं उठायच्या आधीच )

>>>> मी नोकरी पेशानं फायनाशिअल, कॉर्पोरेट आणि काँट्रक्ट इ इ पाहणारा माणूस आहे हो, दया करा. <<<<< Lol
हे आवडले.... या हिशोबाने तर आमच्यावर हाराभर दया करावी लागेल, कारण पेशाने आम्ही नोकरदार कारकूंडे आहोत Proud

हा विषय चांगला आहे पण यावर लिहायला जितकी शांतता, वेळ व सुसूत्रीपणा हवा तितका इथे ऑफिसमध्ये वा घरी उपलब्ध होतच नाही Sad पण हा विषय मनाच्या कोपर्‍यात नोंदवून ठेवला आहे, पुढील मनन चिंतनाकरता.... ते करायला बाकी कोणत्याच बाबींची अडचण होत नाही Happy

आमच्या काळी काही मुलींना शाळा बिळा नव्हत्या. त्यामुळं घरातली पुरूषमंडळी जे बोलतात तेच कानावर पडायचं. पण नंतर मुलं शिकली, त्यांची शाळा करता करता थोडं फार समजलं. मग नातवंडं आणि आता पतवंडं. अशी आयुष्यभर शाळा झाली. तरी पण बायकांनी शिकू नये हे मनावर ठसलेलं असल्याने पुस्तकं चोरून वाचावी लागतात. आता घरात कुणी काही म्हणणार नाही हे माहीत आहे. पुढच्या पिढ्यांचे विचार प्रगत आहेत. ते आता आमच्या वेळे प्रमाणे एकत्र राहतही नाहीत. तर ही अशी पार्श्वभूमी असल्याने काही चुकलं माकलं तर चूक पदरात घाला. इतक्या वर्षाचा अनुभव आणि कानावर पडलेलं यामुळे असे विषय आले की पुन्हा शिकण्याची इच्छा जागृत होते म्हणून तुमच्या लेखावर एव्हढा आगाऊपणा केला हो.

मला जे काही वाटतं त्यानुसार तर्कट, तर्कशास्त्र म्हणजे अचूक कारणमीमांसांची तत्त्वे किंवा तत्त्वप्रणाली. हा शब्द आता संगणकात पण वापरतात म्हणे. त्यामुळं गोंधळ उडतो माझ्यासारख्यांचा. आता अचूक किती, तर ज्याच्या त्याच्या आकलनाइतकी. त्यामुळे ज्याचे त्याचे तत्त्वज्ञान त्याच्या आकलनाप्रमाणे. पण याला त्यापेक्षा अचूक तर्कशास्त्राने छेद जातो. पूर्वीच्या काळी अशाच तर विद्वतसभा भरायच्या आणि रंगायच्याही. अगदी परस्परविरोधी तर्कटं असली तरीही बराच काळ कुणीच कुणाला हार जात नसे. वादविवाद होत. हे सर्व चालू असतांना दोन्ही बाजूंचे पलिते, दिवट्या तेवत्या ठेवल्या जायच्या.

पण अशी एक वेळ यायची एखाद्या पक्षाचं तर्कट भारी पडू लागायचं. म्हणजेचं त्यांचं तर्कशास्त्र हे जास्तीत जास्त अचूक कारणमीमांसामागील तत्त्वांवर आधारलेलं असायचं. ज्याचं तर्कट अचूक तेच लोकांना पटतं. दुस-या पक्षालाही ते पटायचं आणि त्यांच्याकडे प्रतिवादाला कारणे, कारणमीमांसा शिल्लक राहत नसे. कारण त्यांची तत्त्वप्रणालीतल्या चुका ठळक झालेल्या असत. मग त्या पक्षाची हार होत असे आणि ते पलिते विझवून निघत.

म्हणून तर्कशास्त्रामागचे तत्त्व काय आहे ते जास्तीत जास्त अचूक असण्याकडे कल असला पाहीजे. एकाच व्यक्तीने दोन परस्परविरोधी विधाने करताना जर त्यामागील तर्क्ट अचूक नसेल किंवा तर्कटात सातत्य राखले नसेल तर काय होते ?

शामचे वय दहा आहे. राम त्याच्यापेक्षा मोठा आहे
पेंद्या दोन वर्षाचा आहे म्हणजे राम त्याच्याहीपेक्षा मोठा आहे म्हणून
राम पेंद्यापेक्षा मोठा आहे हा तर्क योग्य होईल का ?

इथे निश्चित किंमतीऐवजी व्हेरिएबल्स घेऊयात.

क्ष ची किंमत १७ पेक्षा जास्त आहे म्हणजेच क्ष ची किंमत ४ पेक्षा जास्त आहे.
जर क्ष > १७, तर क्ष > ४
म्हणून क्ष > ४

जर हे योग्य नसेल तर कारणमीमांसेमागील तत्त्वांमधे काही गडबड आहे का हे पाहीले पाहीजे. नाही का ? गृहीतकं अचूक असतील तर त्यावरचा निष्कर्ष बरोबर यायला हवा.

उदा.

टिंगू भारतात राहतो. म्हणून
टिंगू युरोपात राहत नाही.
त्यामुळे टिंगू सध्या युरोपात नाही.

हे तर्कट योग्य आहे का ?

विज्ञान पण असंच असतं हो. ज्या पक्षाचे पलिते विझतात त्या तत्वांचा ते त्याग करतं किंवा त्यातल्या चुका सुधारून घेत असतं. म्हणजे मला आपलं असं वाटतं हो. मी काही शाळेबिळेत गेलेली नाही. त्यामुळे किती महत्व द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवू शकता. पण जर तुम्हाला दखलपात्र वाटलं तर माझा मेलीचा सन्मान होईल हो..

Pages