गौताळा अभयारण्य

Submitted by sariva on 29 March, 2017 - 06:30

रविवारी गौताळा अभयारण्यात जाऊन आले. मस्त झाली ट्रीप.विशेष म्हणजे एक पक्षी प्रेमी/सर्प मित्र आमच्याबरोबर होते.
दुसरे चांगले वनस्पती अभ्यासक होते,त्यामुळे छान माहिती मिळाली.गौतम ऋषींचे वास्तव्य येथे होते,म्हणून गौताळा नाव.
पाचुंदा,गोंदण,मिसवाक/पिलु,वावळ,केवड्याचे बन,नैसर्गिक पणे भरपूर आलेला अडुळसा,अजान वृक्ष,धावडा,मोई,चारोळी,खैर,अर्जुन,बेहडा, डोंगरी आवळा,मुरुडशेंग,लोखंडी,
करवंदाचे 2 प्रकार,मोह,काकड,जंगली बदाम,कंडोळ,अंजन,
महोगनी,रानजाई,कावळी,
आणि 3-4 वनस्पती पाहिल्या.नावे आठवत नाहीत.विचारावी लागतील.एक छोटेसे सुतार पक्षाचे cute पिल्लू,घुबट,टकाचोर,पीतकंठी चिमणा, हॉर्नबिलही होते. इतर पक्षी मी कॅमेरात पाहिले.
हा सालई गुग्गुळ

२ बेहडा

चिल्ला

पळस पळसपापडी सह

मुरुडशेंग

काकड

निसर्गाचा चमत्कार

काटेसावर

कांडोळ

कौशी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे काय...
एकच फोटो...
मोठ्या आशेने आली होती ना मी...
लवकर लवकर येऊदे प्रचि..

नवे फोटो आत्ता दिसले...
मस्तच गं सरिवा.. सहसा मोठ झाल्यावर काटेसावरीचे काटे दिसेनासे होतात...इथे तर एवढ्या मोठ्या झाडाचे अजुनही ठळक दिसताहे.. मस्तच