माझे रंगकाम

Submitted by बस्के on 15 August, 2015 - 00:17

जेव्हा मला मोठ्या माणसांसाठी असणार्या कलरींग बुक्सबद्दल कळले, तेव्हापासून मी ह्या कल्पनेने फार खुष झाले होते. मला माझ्यासाठी एखादं पुस्तक मिळणार! नाहीतर मी आपली मुलाचीच कलरिंग बुक्स घेऊन बसायचे. मुलाला कितपत इंटरेस्ट आला माहीत नाही पण माझा मात्र चांगलाच टिकला होता. शेवटी एक 'मिस्टीकल मंडल' नावाचे पुस्तक घेतले व मुलाच्या रंगीत खडूंनी रंगवायला सुरवात केली. इतकी मजा आली! छान मन लावून, फोकसने चित्र रंगवत बसण्यात काय धमाल येते!

तुम्ही विचार करत असाल, अरे बापरे, ही रोज चित्रं रंगवणार व इथे चिकटवणार की काय.. तर कदाचित हो. झालंय असं. मला हातात चिक्कार वेळ मिळतो. परंतू अलिकडे माझ्या लक्षात आले होते की मी बराच वेळ वायाच घालवत आहे. हा लेख ह्या सगळ्यावरूनच सुचला होता. भरपूर वेळ, भरपूर रिसोर्सेस हाताशी आहेत, पण काहीच भरीव होत नाहीये आयुष्यात असं चित्र दिसू लागले होते. ( म्हणून चित्रांमध्ये रंग भरू लागले! :biggrin: ) मी किती संकल्प ठरवून एकदाही पाळले नाहीयेत गेल्या वर्षभरात, हे आठवले की चिंताग्रस्त होत होत.
हे सगळं ठरवून नाही हा प्रोजेक्ट चालू केला. उगीच ते मंडलाचे पुस्तक दिसले म्हणून घेतले. व रंगवताना जाणवले, की ही अ‍ॅक्टीव्हिटी अशी आहे की मी मन लावून, फोकसने चित्र पूर्ण करीनच. समहाऊ माझा इतर ठिकाणी दिसणारा आरंभशूर स्वभावापुढे ही कन्सिस्टन्सी मला एकदम रिलॅक्स करून गेली. हाताशी वेळ आला की पूर्वी उग्गच फेसबुकवर सत्राशेसाठ लिंका वाचत बसण्यापेक्षा मार्कर घेऊन चित्रातला छोटासा का होईना कोपरा रंगवायचा, एव्हढं एकंच ठरवले. आश्चर्यकारक रीत्या मला उत्साह जास्त जाणवू लागला. सगळी कामं झटापट होऊन चित्रासाठी १५ मिनिटं काढणं म्हणजे पार्टीच होती. मला वयाची ३ दशकं उलटल्यावर समजले आहे की मी आळशी नाहीये उलट मला सतत काहीतरी करायचे असते, ते काय करायचे हे न कळल्याने उगीच सगळी धरपकड. पण सध्या एकाच हॉबीवर, अ‍ॅक्टीव्हिटीवर मन केंद्रीत केले आहे. आणि मला खूप छान वाटत आहे! Happy

बस्केने हे काय चित्रांची चळत लावली आहे असं वाटत असेल, म्हणून शेअर केली थॉट प्रोसेस. Happy

एनीवे. ही आत्तापर्यंतची चित्रं. दिसामाजी रोज काहीतरी रंगवावे असे करून काही चित्रं एक दिवसात(येऊन जाऊन रंगवत २ तास) ते दोन तीन दिवस(५-६ तास) ह्या कालावधीत रंगवली आहेत.

१) खडू :

color3.jpg

२) मार्कर्सः

color2.jpg

३)रंगीत पेन्सील्सः

IMG_2642(1).jpgIMG_2644(1).jpg

४) जेल पेन्स :

IMG_2695.JPGIMG_2697.jpg

५) मार्कर्सः

color5.1.jpg

६) मार्कर्स

11891405_10153732941192018_6872257540057987995_o.jpg

७)
sg.jpg

हे सिक्रेट गार्डनचे चित्र झाले एकदाचे पूर्ण! काय दमवलंय ह्या चित्राने. इतकं प्रचंड डिटेलिंग आहे.. संपता संपेना. पण ह्या कलरिंग अ‍ॅक्टीव्हिटीचा मेन उद्देश पेशन्स वाढवणे असल्याने पुस्तक भिरकावून न देता, केले एकदाचे पूर्ण. (मात्र शेवटी हातघाईला आलेले अगदी दिसून येतंय. पूर्ण चित्रात रात्रीचा निळसर पर्पल अंधाराचे वातावरण निर्माण करावे म्हणून पेन्सिल घेतली.. अन शेवटी अगदीच घाई केली. फराटे उठले. Sad ते ब्लेन्ड होऊ शकतील. पण आता पेशन्स खरंच संपला! निदान आजसाठी. परत नंतर दुरूस्त करीन चित्र.. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मिसला नव्हता हा धागा...
प्रतिसाद दिला नाही म्हणजे काय..श्या..मीपन ना..
एक नं रंगवली आहे चित्र बस्के.. मलापन घ्यायची इच्छा आहे हे बुक पण म्या लहानच हाय अजुन... बोले तो किड एकदम..
सद्ध्या माझं डूडल वेड वाढलय...डोक काम नसेल करत तर आपली गिचिड्मिचिड सुरु करायची बिंदास..
एक अख्खी वही भरलीए त्याने.. अन दुसरी घेऊन आलीए..
थोपूवर टाकलीएत काही म्हणुन इथे परत टाकू कि नको असं वाटतं.. उगा एका धाग्याची जागा व्यापेल अस वाटत म्हणुन टाकली नाही..
बघु..शायद एक धागा काढेलही...तू चलनेदे बाकी...
नवी चित्र रंगवली कि दे इथं आणि हो रंगसंगती सुरेखच Happy

Pages