जयमल्हार

Submitted by अ भि अ भि on 4 August, 2016 - 18:42

जय मल्हार बद्दल मी धागा शोधत होतो पण मला काही तो मिळाला नाही म्हणून मी येथे विचारणा करायला हा धागा उलगडत आहे.

जश्या मला या मालिकेबद्दल शंका आहेत तश्याच इतर माबोकारांना असतील तर त्यांनी येथे त्या मांडाव्यात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे आत्ताशी आठवलं काय दोघींना ???

माझी आजी न चुकता ही सिरिअल रोज बघायची आणि रोजचं पालुपद असायचं 'थांब गं जरा.... आता म्हाळसेला मागचा जन्म आठवणारेय'

किमान आता सगळं आठवलंय तिला तर ते बघायला आजी हवी होती Sad

काल म्हाळसा ने मीच पार्वती आहे असे जाहीर केले. तेव्हा इतरांपेक्षा तिप्पट आकारात प्रकट झाली. नारदमुनी देवीच्या चेहेर्‍याकडे म्हणून वर बघत असताना मागचे इतर गावकरी मात्र समोरच बघत होते. देवी दिसल्याचे ही काही विशेष भाव नाहीत चेहेर्‍यावर!

Pages