रवांडातील वंशहत्या (जिनोसाइड) व आज

Submitted by टवणे सर on 27 March, 2017 - 22:53

रवांडामध्ये १९९४साली झालेल्या तुत्सी हत्याकांडाची माहिती आपणा सर्वांना असेलच. समाजाला म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना भडकावून दंगली, जाळपोळ, खुनाखुनी घडवून आणणे हे नेत्यांचे परमकर्त्यव्य इतिहासात अनेकदा पार पाडलेले आहे. तंत्रज्ञानाचा विकास जसजसा होत गेला तसे मनुष्याच्या जन्मजात/मूलभूत क्रूरतेला आवाहन करून तिचा 'योग्य' तो वापर करणे सोपे होत आहे. या विषयाशी संबंधित एक अतिशय सुरेख लेख आहे इन्डियन एक्स्प्रेसमध्ये आला आहे. तो वाचून त्यावर विचार करावा हीच इच्छा.

http://indianexpress.com/article/opinion/columns/lessons-from-rwanda-gen...

माणुस मूलतः क्रुर आहे की नाही, मनुष्याचा प्रवास कमी क्रुर/संहाराकडून अधिक कडे की उलट्या दिशेने याबाबत मते-मतांतरे आहेत. स्टीवन पिंकर सारखे तत्वज्ज्ञ मनुष्याचा प्रवास शांतीकडे होत आहे असे प्रतिपादन करतात तर बहुसंख्य इतर याउलट मत नोंदवतात. मनुष्य मूलतः क्रुर (हेसुद्धा आपण दिलेलेच विशेषण) असून प्रबलाने दुर्बलावर सत्ता गाजवणे ही आपली मूलप्रवृत्ती आहे या मताचा मी आहे. पण असे मत असूनदेखील तुम्ही तुमच्या मुल्यांवर (मोरल्स) विश्वास ठेवून आयुष्य कंठू शकता हा विश्वास इतिहासातील महात्मा गांधींसारख्या थोरांकडे पाहून आपल्याला मिळतो.

Do I contradict myself? Very well then I contradict myself, (I am large, I contain multitudes.) : Walt Whitman

What lies behind us and what lies ahead of us are tiny matters compared to what lives within us. : Henry David Thoreau

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख. धन्यवाद.
Rwanda gives us a warning. Only if we would care to heed.
>> तोच तर खरा प्रोब्लेम आहे. Sad

मी गेली ५ वर्षे रवांडन मूलांसोबत काम करतो आहे. आता तरुण असलेला प्रत्येक जण बालपणी यातून पोळला गेलेला आहे.
पण निरिक्षण मात्र नोंदवावेसे वाटते, सगळं हरवून गेल्यावर देखील त्यांच्यात सूडभावना नाही. त्या दिवसातल्या आठवणी,
त्यांना नकोश्या होतात, शक्यतो ते विषयच काढत नाहीत.
पण या निर्घुण संहाराला केवळ विखारी प्रचार कारणीभूत नव्हता. वसाहत वाद्यांनी जाणून बुजून पेरलेली दुही पण तितकीच
कारणीभूत होती. जर ती नसती तर विखारी प्रचार एवढा प्रभावी ठरला असता का ?

त्यामूळे मला असे वाटते, कि विखारी प्रचार लोकाना आकर्षित करत असेल, तर त्याच्या मूळाशी कुठेतरी असला असंतोष असतोच.
तो असंतोष मग चेतवला जातो.

पण हे देखील खरे आहे कि, कधी कधी तर त्या घटना / व्यक्ती / प्रसंग आपल्या विस्मरणात गेलेल्या असतात. किंवा आपल्या
थेट त्याच्याशी संबंधही आलेला नसतो, कधी तर ते माहितही नसते. पण असल्या प्रचारातून त्याची मुद्दाम आठवण करुन दिली जाते.
( अगदी ताजे उदाहरण म्हणजे गडकर्‍यांचे लेखन )

कुणाला कितपत हे रिलेव्हंट वाटेल, ते सांगता येत नाही. पण सातत्याने मारा होणार्‍या मालिका बघून, घरातील, खास करून सासू सूनांतील
संबंध विखारी बनले आहेत, असे माझे स्वतःचे निरिक्षण आहे. अगदी प्रेमळ असणार्‍या स्त्रिया, गेल्या काही वर्षात प्रचंड विखारी टोमणे
मारु लागल्या आहेत. हा प्रचार आहे का ? कुणाचे काय भले होणार आहे त्यातून ? ? ते मात्र मला माहित नाही.

खरं आहे टण्या. कित्येक चुकीचे समज टोटली अ‍ॅनेकडोटल एविडन्स चा आधार घेऊन लिलया फॉर्वर्ड केले जातात. लेखात उल्लेख केलाय त्या रेडियो स्टेशनसारखी उदाहरण खुप ठळक स्वरुपाची आहेत आणि अमेरिका किंवा अगदी भारतात सुद्धा अशा गोष्टींचा चटकन निषेध नोंदवला जाऊन कारवाई होऊ शकते पण हे व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्ड्सचं वरकरणी अगदी निष्पाप,अनुपद्रवी वगैरे वाटणारं जे रुप आहे ते अत्यंत फसवं आणि त्यामुळेच आणखिन घातक आहे. टेकनॉलॉजिकली अडवान्स्ड असलेल्या सध्याच्या काळात हे माध्यम खुप हानी करु शकतं.
एकेक मेसेज बघितले की अक्षरशः संताप व्हायला लागतो कधी कधी. अगदी subtly मेसेज फॅक्ट्स वरुन मॉरल पॉलिसिंग, सांसकृतिक पोलिसिंग आणि कधी कधी पार प्रोपोगँडा मध्ये कधी शिरतो ह्याचा पत्ता लागत नाही!

रवांडातील भीषण संहाराबद्दल नुकतेच एक आत्मचरित्र वाचले.लेफ्ट टू टेल.करमलेच नाही काही दिवस. क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा माणूस पार करतोय असं एकूणच वाटतं. रोजचा पेपर वाचला तरी असं वाटतं.

कित्येक चुकीचे समज टोटली अ‍ॅनेकडोटल एविडन्स चा आधार घेऊन लिलया फॉर्वर्ड केले जातात. >>> टोटली. काहीही खोट्या क्लिप्स येतात, पब्लिकही खरेच समजते. एखाद्याची बदनामी करताना दहा वेळा खात्री करावी ही किमान कर्टसी दिसत नाही.

कित्येक चुकीचे समज टोटली अ‍ॅनेकडोटल एविडन्स चा आधार घेऊन लिलया फॉर्वर्ड केले जातात. >> +१
फेक न्यूज कशी ओळखायची यावर यु. मिशिगन कोर्स चालू करतंय अशी बातमी हल्लीच वाचलेली. इंटरेस्टिंग मूव्ह वाटलेली मला. एखादी बातमी/ लेख वाचताना त्यातील क्लेम्स वाचून, सेन्सेस ओपन ठेवून, आपल्या मनातले बायासेस त्यात न घालता सत्यासत्यतेची पडताळणी आपण कशी करतो/ केली पाहिजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
http://www.mlive.com/news/ann-arbor/index.ssf/2017/02/fake_news_subject_...

अ‍ॅक्च्युअली गेली १०-१२ वर्षे. महाराष्ट्रात भांडारकर प्रकरणापासून पुढे ७-८ वर्षे खूप चालू होता - ब्राह्मणांविरूद्ध . नंतर तो विरला. सध्या लिबरल विचारांच्या विरोधात आहे. महात्मा गांधींची डान्स क्लिप, ओम पुरी चे पाक मधले कसलेतरी वक्तव्य, ती काश्मिरी मुलगी - बरेच काही.

लोक बिनधास्त कोणालाही देशद्रोही वगैरे ठरवतात कसलीही शहानिशा न करता.

टण्या एक उत्तम लेख ... खरोखर आताची मानवाची क्रूरता पहिली तर आपण प्रगती करतोय कि अधोगती कडे चाललोय हेच कळत नाही. मला तर वाटतं कि इलेक्ट्रॉनिक्स चा शोध लागला आणि जग जरा जास्तच जवळ आले आणि तेच आता धोकादायक ठरू पाहतंय ... अजूनही माणूस यातून काही बोध घेत आहे असे तरी वाटत नाही ... सीरिया हे त्याचे एक ताजे उदाहरण म्हणता येईल ... तिथे काही महिन्यापूर्वी एका वैमानिकाला पिंजर्यात कोंडून जिवंत जाळले होते .. तसेच गरोदर स्त्रियांची हत्या आजही कॉमन आहे ....

व्हॉट्सअप च्या माध्यमातून माथी भडकवणं अगदी घरापर्यंत आलं आहे. आजच आमच्या फॅमिली गृपवर एका भाच्याला खडसावला... आधीच गरम डोकी असलेल्या वयात कसली कसली विषं पेरतात हे लोक.

ब्राह्मण विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध् मुस्लिम, बहुजन विरुद्ध ब्राह्मण काय च्या काय. मित्रामित्रांमध्ये विष कालवले जात आहे. फुकाफुकीच!