तुम्ही आहात का सुपरटेस्टर????????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 20 March, 2017 - 05:54

माणुस हा असा प्राणी आहे जो फक्त पोट भरण्यासाठी खात नाही,जे खातो त्याची चव कशी आहे याचा सखोल विचार करणारा माणुस हा एकमेव प्राणी असावा.पण प्रत्येक माणसाला एखाद्या पदार्थाची चव सारखीच लागते असा आपला समज आहे.पण तो खरा नाही.याचा शोध म्हणावा असा प्रकार १९३१साली लागला. डॉ.ए.एल.फॉक्स हे अमेरीकन वैज्ञानिक आपल्या dupont chemistry lab मध्ये काम करत असताना अपघाताने त्यांच्या हातून PTC(phenylthiocarbamide) हे रसायन लॅबमध्ये पसरले ,लॅबमध्ये या केमिकलचा धुरळा उडाला.फॉक्स यांच्याजवळ थांबलेल्या त्यांच्या सहकार्याला तोंडात खूप कडवट चव जाणवली ,पण फॉक्स यांना कोणतीही चव जाणवली नाही.फॉक्स यांच्या सहकार्याने ही चव PTCची आहे हे खात्रीने सांगितले.
या प्रकारानंतर फॉक्स यांनी अनेकांना PTC ची चव घ्यायला सांगितले ,काहींना अत्यंत कडवट ,काहींना थोडीशी कडवट तर काहींना ते केमिकल चवहीन वाटले.यावरुन फॉक्स यांनी अंदाज बांधला की प्रत्येकाचे चव घ्यायची क्षमता वेग वेगळी असते.
१९९० साली लिंडा बर्टोशुक या संशोधीकेने यावर एक सखोल अभ्यास केला ,PTC हे केमीकल काही प्रमाणात विषारी असल्याने तिने PROP(6n propilthiouracil) या नवीन केमिकलचा वापर करुन संशोधन केले.या अभ्यासाअंती असे आढळुन आले की २५% लोकांना PROP खूप कडवट लागते ,यांना सुपरटेस्टर असे नाव दिले गेले.या लोकांच्या जीभेचा अभ्यास केल्यावर असे आढळले की यांच्या जीभेवर चव संवेदक खूप जास्त प्रमाणात असतात,या संवेदकांना इंग्रजीत fungiform papillae असे म्हणतात,सामान्य भाषेत यांना taste buds असेही म्हणतात.हे मशरुमच्या आकाराचे जीभेवरचे उंचवटे सहज मोजता येतात.ज्यांना PROP कमी कडवत लागते त्यांच्या fungiform papillae ची संख्या मध्यम असते,यांना मेडियम टेस्टर्स म्हणतात .ज्यांना PROP चवहीन लागते त्यांच्या जीभेवर अत्यंत कमी चव संवेदक असतात.अश्या लोकांना नॉन टेस्टर्स म्हणतात .
सुपरटेस्टर्स हे कडवट पालेभाज्या ,गोड पदार्थ ,अतितिखट खाणे टाळतात,त्यामुळे ते बर्याचदा तब्येतीने स्लीम असतात.जी लहान मुले पालेभाज्या अजिबात खात नाहीत ते सुपरटेस्टर्स असण्याची शक्यता असते.त्यांना फोर्स करुन उपयोग नसतो.
याउलट मेडीयम टेस्टर्स व नॉन टेस्टर्स हे अनेक पदार्थ ,पालेभाज्या ,गोड,अतितिखट आवडीने खातात,त्यामुळे ते हेल्दी असतात.
आता,आपण कोणत्या कॅटेगरीत आहोत हे कसे समजणार?.यावर PROP paper टेस्ट करता येते.यामध्ये आपल्याला एक कीट मिळते ,यात PROP या केमीकलने युक्त असा पेपर मिळतो,तो जीभेवर ठेवल्यावर आपल्याला त्याची चव कशी लागते वा लागत नाही यावरुन आपण सुपरटेस्टर्स ,नॉन टेस्टर्स की मेडीयम टेस्टर्स आहोत हे कळते.
भारतात हे कीट मागवता येत नाही.पण अमेरीकेत राहणार्यांना सहज मागवता येईल.
दुसरा पण सोपा उपाय आहे.जीभेवरचे उंचवटे अर्थात fungiform papillae मोजणे.यात निळ्या रंगाचा फूड कलर आपल्या जीभेवर पसरवायचा ,हा रंग उंचवट्यांवर लागत नाही ,त्यामुळे उंचवटे गुलाबी रंगाचेच राहतात व निळ्या ब्यागराऊंडवर उठुन दिसतात.एका कार्डबोर्ड वा पुठ्ठ्यावर ७मीलीमीटर व्यासाचे वर्तुळ कापून घ्यायचे.जीभेवर हे वर्तुळ ठेवून या वर्तुळात कीती उंचवटे अर्थात taste buds आहेत हे कुणाला तरी मोजायला सांगायचे ,भिंगाचा वापर करु शकता.
tongue-buds-schematic.jpg
जर ३५ पेक्षा जास्त उंचवटे(taste buds) असतील तर तुम्ही सुपरटेस्टर आहात
जर १५ ते ३५ दरम्यान उंचवटे असतील तर तुम्ही मेडीयम टेस्टर आहात.
जर १५ पेक्षा कमी उंचवटे असतील तर तुम्ही नॉन टेस्टर आहात.
सुमारे ४०% भारतीय नॉन टेस्टर्स आहेत.मी स्वतः सुपरटेस्टर आहे.
आंतरजालावर खादाडी हा एव्हरग्रीन विषय आहे,त्याच्या जवळ जाणारा हा विषय आहे म्हणून हा प्रपंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वेगळा विषय. Happy

सिंजी तुम्ही सुपरटेस्टर आहात तर वाईन टेस्टरचा कोर्स करा.वाईनटेस्टर्सना खुप डिमांड आहे. अर्थात त्याला कुठले टेस्टर लागतात चेक करा.

छान आणि नवीनच माहिती कळाली.

आता संध्याकाळी आरशासमोर आ वासुन भिंग घेऊन उभारायला हवेच हवे.>>> हो ना! मलाही घरी कधी जाईन आणि आरशात जीभ बघेन असं झालंय. तसंही मला जिभेला शेवटचं बघून कित्येक वर्षे लोटलीत. जसं आकाशाखाली आपण कित्येक वर्षे वावरतोय, पण वर मान करून आकाशाचे शेवटचे निरीक्षण कधी केलेय ते आपल्याला आठवत नाही.

ईंटरेस्टींग माहिती. टेस्ट बडस बाबत माहिती होतेच. आणखी डिटेल्स समजले. धन्यवाद !

अवांतर - शीर्षक पटकन वेगळेच वाचले. तुम्ही आहात का सुप्पर्रस्टार्ररर Happy

मस्त माहिती , ह्या क्रायटेरियावरुन मी बहुतेक नॉनटेस्टर असावा . कडु कारलं , थोड्या प्रमाणात प्रचंड तिखट मी खाऊ शकतो.

छान माहिती.
चवीचा आणि वासाचा पण संबंध आहे ना ? यासंबंधात एक लेख वाचल्याचे आठवतेय. बहुतेक डॉ. वर्षा जोशी यांनी लिहिलाय.

यात अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे. सहनशक्ती व संयम.

उदाहरणार्थ - डॉक्टरांनी आपल्याला भूल देऊन बधिर केले आणि त्यानंतर आपल्यावर शस्त्रक्रिया केली तर आपल्याला वेदना जाणवत नाही. याउलट काला पत्थर मध्ये अमिताभ डॉक्टरांनी भूल न देता त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी असे सुचवितो. त्याला वेदना होतात पण त्या तो सहन करतो.

याच तत्त्वावर एखाद्याला टेस्ट बड्स कमी प्रमाणात आहेत म्हणून त्याने कडू कारले खाणे वेगळे आणि कारल्याची कडवट चव तीव्रतेने जाणवत असूनही संयम व सहनशक्ती दाखवित ते खाणे वेगळे. या सहनशक्ती व संयमाची सवय झाली की आपोआपच काही काळाने चवही जाणवत नसावी. तेव्हा इथे वाचकांनी आपण स्वतः नॉन टेस्टर आहोत की सहनशील हे आपल्या सवयींवरुन ठरविण्यापेक्षा प्रत्यक्ष लेखात वर्णन केल्याप्रमाणे चाचणी करुन पाहावे.